12/08/2022
https://youtu.be/QIGgo2oBN0Y
: -ठाण्यात हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा , मोठया उत्साहात साजरा ... NEWS
* ठाण्यात हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा , मोठया उत्साहात साजरा
ठाणे : - रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीचा सण आहे , हा एक खास दिवस आहे , बहीण आणि भावाच अतूट नात असत अस हा सण सांगुन जातो , हा हिंदूंचा सण असला तरी आज ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिव मुद्रा प्रबोदिनी यांच्या वतीने हा रक्षाबंधनाचा सण हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्र साजरा केला यावेळी उपस्थित मुस्लिम महिला व मुलींनी हिंदू बांधवाना राख्या बांधल्या तर हिंदू महिलांनी मुस्लिम बांधवाना राख्या बांधल्या , या राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यक्रमात पोलिसांनी विशेष सहभाग घेतला होता , हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने , प्रेमाने , आनंदाने साजरा झाला या वेळी ठाणे पोलीस सह आयुक्त दत्तात्रेय कराळे , खासदार राजन विचारे , आमदार संजय केळकर , निरंजन डावखरे , माजी महापौर नरेश म्हस्के , ऋता आव्हाड , माजी उपमहापौर पल्लवी कदम , शिव मुद्रा प्रबोधिनीच्या वतीने सचिन चव्हाण , सचिन शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते , 2008 पासून हा कार्यक्रम शिव मुद्रा प्रबोधिनीच्या वतीने राबवला जात आहे आणि त्या साठी विशेष मेहनत सचिन चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी घेतली आहे . राष्ट्रीय एकात्मता , दोन समाजात बंधुभाव राहावा , त्यांच्या मध्ये प्रेमाचे आणि सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे या साठी हा कार्यक्रम सर्वत्र राबवणे महत्वाचे असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले ..
: -ठाण्यात हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा , मोठया उत्साहात साजरा ... NEWS * ठ...