Shahar Varta News - शहर वार्ता न्यूज

  • Home
  • India
  • Thane
  • Shahar Varta News - शहर वार्ता न्यूज

Shahar Varta News - शहर वार्ता न्यूज Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shahar Varta News - शहर वार्ता न्यूज, News & Media Website, Thane.

01/10/2025

अखेर ५ तासाच्या चौकशी नंतर ठामपा अतिक्रमण उपयुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई पोलिसांनी केली अटक….

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Jitendra Awhad

भरत चव्हाण यांची वाढदिवस रद्द करुनपूरग्रस्तांना १ लाख ११ हजारांची मदतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर...
01/10/2025

भरत चव्हाण यांची वाढदिवस रद्द करुन
पूरग्रस्तांना १ लाख ११ हजारांची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द

ठाणे :- भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी वाढदिवस रद्द करून राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख ११ हजारांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाण्यातील दौऱ्यावेळी त्यांच्याकडे धनादेश सोपविण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित सेवा पंधरवड्यात भाजपा, तारामाऊली सामाजिक संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र, अनेक कार्यक्रम रद्द करून ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग स्टिक व व्हिलचेअर वाटप आणि नागरिकांना साखर वाटप असे दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रद्द केलेल्या कार्यक्रमाचे पैसे वाचवून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना १ लाख ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली. त्याबाबत मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेला धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल रात्री सुपूर्द करण्यात आला. या वेळी भाजपाचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांची उपस्थिती होती.
राज्यात आलेल्या पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे, याबद्दल भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी आभार मानले. यापूर्वीही लातूर भूकंप, महाड आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूराच्या वेळी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेकडून मदत पोचविण्यात आली होती. आताही शेतकऱ्यांना मदत देत आहोत, असे ते म्हणाले.

BJP Thane City District Devendra Fadnavis Niranjan Davkhare Bharat Chavan

'राज्यात सर्वाधिक विकास होत असलेले शहर हा ठाण्याचा लौकिक'; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन•खासदार नरेश म्हस्...
01/10/2025

'राज्यात सर्वाधिक विकास होत असलेले शहर हा ठाण्याचा लौकिक'; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

•खासदार नरेश म्हस्के यांनी केले महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक
•गणेशोत्सव आरास स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
•ठाणे महापालिकेचा ४३वा वर्धापन दिन सोहळा

ठाणे (1) : ठाण्याची झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या पंचवीस वर्षात ठाण्यात आमूलाग्र बदल झाला असून आता राज्यातील सर्वाधिक विकसित होत असलेले शहर असा लौकिक ठाण्यास मिळाला आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गडकरी रंगायतन येथे ठाणे महापालिकेच्या 43वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

ठाणे महापालिकेच्या 43व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, यावर्षीच्या गणेशोत्सव आरास स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मीनल पालांडे, एसआरएचे राजकुमार पवार उपस्थित होते.

ठाण्याच्या विकासाचा धर्मवीर आनंद दिघे यांचा विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुढे कायम ठेवला आहे. त्यातूनच महापालिकेने नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले. ठाण्याचा कायापालट झाला आहे, असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. तर, गणेशोत्सव आरास स्पर्धा ही धर्मवीर आनंद दिघे यांनी संकल्पना. गणेशोत्सवात कलाकार आणि कार्यकर्ते घडतात. त्यामुळे त्यास प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. यंदा या स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाला दिशा मिळाली आहे. ठाणे शहर बदलतंय आणि त्यात महापालिका अधिकारी व कर्मचारी यांचाही वाटा असल्याचेही खासदार म्हस्के यांनी स्पष्ट केले.

आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. वर्षभरात जे केले त्याची उजळणी आणि पुढे जे काम करायचे त्यासाठी वचनबद्ध होण्याचा हा दिवस असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी प्रास्ताविकात केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा २०२५चे पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच, या स्पर्धेचे परीक्षण करणारे ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी व किशोर नादावडेकर आणि ठाणे वैभवचे ज्येष्ठ पत्रकार आनंद कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला.
पारितोषिक वितरण समारंभानंतर, ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले. त्याचे सूत्रसंचालन, आयुक्त कार्यालयातील स्वीय सहाय्यक सुनीता पारखी, उप माहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर आणि राजेंद्र पाटणकर यांनी केले.

# 'स्वच्छतोत्सवा'ची सांगता

स्वच्छताही सेवा या पंधरवड्याअंतर्गत सुरू असलेल्या 'स्वच्छतोत्सवा'ची सांगताही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांनी विविध कार्यक्रमात भाग घेतला. तसेच, स्वच्छतेविषयी जागृती करणारे पथनाट्यही सादर करण्यात आले.

# आरास स्पर्धेतील विजेते
या आरास स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सजावटीसाठीचा प्रथम क्रमांक (पारितोषिक - रुपये 25 हजार) शिवसम्राट मित्र मंडळ, गांधीनगर यांना मिळाला. तर, दुसरा क्रमांक (रुपये 20 हजार) - गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा यांना, तिसरा क्रमांक (रुपये 15 हजार) - कोलबाड मित्र मंडळ, कोलबाड यांना तर, उत्तेजनार्थ पारितोषिक (रुपये 10 हजार) - गोपाळ गणेश मित्र मंडळ - आझाद नगर यांना मिळाले.
उत्कृष्ट मूर्तीकारासाठीच्या स्पर्धेत, प्रथम क्रमांक (रुपये10 हजार) - राकेश घोष्टीकर - श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ यांना, द्वितीय क्रमांक (रुपये ७ हजार) - मदन नागोठणेकर- सार्वजनिक उत्सव मंडळ यांना तर, तृतीय क्रमांक (रुपये 5हजार) - मिलिंद सुतार - जय भवानी मित्र मंडळ यांना मिळाला.
स्वच्छतेच्या स्पर्धेत, प्रथम क्रमांक (रुपये 10 हजार) - काजूवाडी वैती नगर रहिवासी मंडळ, काजूवाडी यांना, द्वितीय क्रमांक (रुपये 7 हजार) - शिवगर्जना मित्र मंडळ, उथळसर यांना आणि तृतीय क्रमांक (रुपये 5 हजार) - स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ, सावरकर नगर यांना मिळाला...

01/10/2025
01/10/2025

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा मुंबई विद्यापिठासोबत करार.,.

01/10/2025

नूतनीकरणानंतर विकास कॉम्प्लेक्स पोलीस चौकी नागरिकांच्या सेवेत

ठाणे पोलीस आयुक्तालयातील राबोडी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विकास कॉम्प्लेक्स पोलीस चौकीचे नूतनीकरण आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून करण्यात आले. नूतनीकरण झालेल्या या सुसज्ज वास्तूचे लोकार्पण आमदार केळकर यांच्या हस्ते झाले.

या सोहळ्यास पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, माजी नगरसेविका सौ. नंदा पाटील, माजी नगरसेविका दीपा गावंड, भाजपा शहर उपाध्यक्ष महेश कदम, भाजपा स्लम सेलचे उमेश चोणकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून या चौकीची दुरावस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना राबोडी पोलीस स्टेशन, वृंदावन येथे जाऊन तक्रारी नोंदवाव्या लागत होत्या. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार केळकर यांनी चौकीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला.

“या नव्या वास्तूमुळे विकास कॉम्प्लेक्स, गोकुळनगर, राबोडी, उथळसर परिसरातील नागरिकांना तक्रारींचा निपटारा जलद गतीने होणार आहे,” असे आमदार केळकर यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले...

01/10/2025

ठाणे महापालिका मुख्यालयात मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा

ठाणे महापालीका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यालयात मुंबई acb ची रेड

गेल्या अर्ध्यातासापासून एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून शंकर पाटोळे यांची चौकशी सुरू

अभिराज डेव्हलपर्सच्या अभिजीत कदम यांच्याकडून घोडबंदर रोड या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी असलेला अतिक्रमण हटविण्यासाठी 25 लाखांची मागणी करून 15 लाख रोख आणि 10 लाख रुपये एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यात घेऊन काम न केल्याने अभिराज डेव्हलपरच्या अभिजीत कदम यांनी केली होती मुंबई acb कडे तक्रार...

01/10/2025

नवी मुंबई विमानतळाला अद्याप लोकनेते दि बा पाटलांचे नाव मिळाले नसल्याने खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आक्रमक, "विमानतळाची धावपट्टी उधळून टाकू" गेल्यावेळी दिला होता सूचक इशारा... पुढची रणनीती काय असणार? ठाण्यातून खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांची पत्रकार परिषद ...

भरत चव्हाण यांची वाढदिवस रद्द करुनपूरग्रस्तांना १ लाख ११ हजारांची मदतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर...
01/10/2025

भरत चव्हाण यांची वाढदिवस रद्द करुन
पूरग्रस्तांना १ लाख ११ हजारांची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द

ठाणे, दि. १ (प्रतिनिधी) : भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी वाढदिवस रद्द करून राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख ११ हजारांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाण्यातील दौऱ्यावेळी त्यांच्याकडे धनादेश सोपविण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित सेवा पंधरवड्यात भाजपा, तारामाऊली सामाजिक संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र, अनेक कार्यक्रम रद्द करून ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग स्टिक व व्हिलचेअर वाटप आणि नागरिकांना साखर वाटप असे दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रद्द केलेल्या कार्यक्रमाचे पैसे वाचवून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना १ लाख ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली. त्याबाबत मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेला धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल रात्री सुपूर्द करण्यात आला. या वेळी भाजपाचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांची उपस्थिती होती.
राज्यात आलेल्या पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे, याबद्दल भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी आभार मानले. यापूर्वीही लातूर भूकंप, महाड आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूराच्या वेळी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेकडून मदत पोचविण्यात आली होती. आताही शेतकऱ्यांना मदत देत आहोत, असे ते म्हणाले...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील ठाण्याच्या दुर्गेश्वरीचे घेतले मनोभावे दर्शन…   Thane - ठाण...
01/10/2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील टेंभी नाका
येथील ठाण्याच्या दुर्गेश्वरीचे घेतले मनोभावे दर्शन…

Thane - ठाणे Devendra Fadnavis

01/10/2025

शिवसेनेने आझाद मैदानावरील दसरा मेळावा का केला रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले सत्य...

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलींद नार्वेकर यांनी ठाण्यातील गणेशवाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरास भेट देऊन आई तुळजाभवानीच...
30/09/2025

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलींद नार्वेकर यांनी ठाण्यातील गणेशवाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरास भेट देऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. या प्रसंगी डॉ. जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते.

Thane - ठाणे Jitendra Awhad

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shahar Varta News - शहर वार्ता न्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shahar Varta News - शहर वार्ता न्यूज:

Share