MH 04 Media

MH 04 Media News, Media & Entertainment
(2)

03/08/2026

ठाण्यातील कॅडबरी येथे आज पुन्हा एकदा... ट्रक झाला पलटी..!

03/08/2026

मामाच्या "गोव्याची" पिकनिक थिएटरमध्ये सुसाट..!
दिग्दर्शक 'विजू माने' घेऊन आलेत गोव्याची सफर..

छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारे स्ट्रगलर्स आता मोठ्या पडद्यावरही तितकाच धिंगाणा घालत आहेत. लेखक-दिग्दर्शक विजू माने यांचा "मामाच्या गोव्याला जाऊया" हा धमाल सिनेमा सध्या महाराष्ट्रभर प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
मैत्री, गोवा, भन्नाट कॉमेडी, भन्नाट गाणी आणि भरपूर मनोरंजन यांचं परफेक्ट पॅकेज असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना दोन-अडीच तास सगळी टेन्शन विसरायला लावतो. हसवता - हसवता भावूक करणारा हा अनुभव प्रत्येकाने आपल्या मित्रांसोबत नक्की घ्यावा. जर तुम्हाला टेन्शन फ्री व्हायचं असेल, तर तुमची gang घेऊन जवळच्या सिनेमागृहात जा आणि "मामाच्या गोव्याला जाऊया"सोबत दोन-अडीच तासांची भन्नाट Laughing Therapy नक्की घ्या!

डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढलेल्या ठाकरे सेनेच्या वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामाशिवसेना (उद्...
03/08/2026

डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढलेल्या ठाकरे सेनेच्या वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर राणे यांनी आपल्या पदाचा वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे. कल्याण लोकसभा निवडणुकीत त्यांनी उबाठा पक्षाकडून उमेदवारी स्वीकारत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. वेळेअभावी संघटनेच्या कामाला न्याय देता येत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नसून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सदस्य म्हणून पुढेही कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठाण्याचे मा.महापौर "हरिश्चंद्र श्रीपत पाटील" यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! शुभचिंतक:- प्रवीण रमेश पाटील...
03/08/2026

ठाण्याचे मा.महापौर "हरिश्चंद्र श्रीपत पाटील"
यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
शुभचिंतक:- प्रवीण रमेश पाटील व मित्र परिवार

#शिवसेना
#परिवार

शिवसेना विभागप्रमुख "दिनेश मलपे" यांनी आपल्या जन्मदिनी उपमुख्यमंत्री डॉ.एकनाथराव शिंदे यांची घेतली भेट..!Eknath Shinde -...
03/08/2026

शिवसेना विभागप्रमुख "दिनेश मलपे" यांनी आपल्या जन्मदिनी
उपमुख्यमंत्री डॉ.एकनाथराव शिंदे यांची घेतली भेट..!

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

03/08/2026

मुंब्र्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी..राष्ट्रवादीचे युवा
नेतृत्व- "सौरभ वर्तक" यांनी मांडली आपली भूमिका..!

ठाणे महापालिकेचे मुंब्रा प्रभाग समितीचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त बाळू पिचड यांनी सन्माननीय न्यायालयाची फसवणूक करून अनधिकृत बांधकामाला दिले अभय..?
समाजसेवक सौरव वर्तक यांचा गंभीर आरोप..

मुंब्र्यातील आनंद कोळी वाडा येथील अनाधिकृत इमारतीचे प्रकरण आता सहाय्यक आयुक्त आणि विलास केणी यांना भोवणार… नेमक प्रकरण काय..?

#घोटाळा
#पालिका
#अधिकारी

03/08/2026

रायला देवी तलाव येथे एका इसमाचा बुडून मृत्यू..!
शिवसेना नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी ठाणे महापालिका अधिकारी यांच्या सोबत केला पाहणी दौरा..

#मृत्यू
#घटना

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Vikas Repale
Namrata Bhosale-Jadhav

02/08/2026

दिबांची वारी.. दिल्लीच्या दारी..!
नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील
हे नाव लागलंच पाहिजे यासाठी ०५ ऑगस्ट रोजी...
जंतर मंतर,नवी दिल्ली येथे सकाळी ०९ ते ०५ वा.पर्यंत
सर्व आगरी बांधव,भूमिपुत्र जमणार आहेत..

भिवंडीचे भूमिपुत्र खासदार "सुरेश म्हात्रे" (बाळ्या मामा)
यांच्या पुढाकाराने ही मागणी दिल्ली येथे करण्यात येणार आहे..

#दिल्ली
#महाराष्ट्र
#स्वाभिमान
#दि_बा
#लोकनेते

Address

Thane
400

Telephone

+918655552958

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH 04 Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MH 04 Media:

Shortcuts

Share