सिर्फ दर्जेदार मराठी.

  • Home
  • India
  • Thane
  • सिर्फ दर्जेदार मराठी.

सिर्फ दर्जेदार मराठी. this is my own facecam videos and all content is my own facecam content
(1)

18/09/2025
अभिनेत्री अमृता खानविलकर लालबागच्या राजाच्या दर्शनाला 🥰...'चांदीच्या दुर्वा' केल्या अर्पण....नुकतेच अभिनेत्री अमृता खानव...
02/09/2025

अभिनेत्री अमृता खानविलकर लालबागच्या राजाच्या दर्शनाला 🥰...'चांदीच्या दुर्वा' केल्या अर्पण....नुकतेच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी तिने राजाच्या चरणी चांदीच्या दुर्वा अर्पण केल्या.

"या जगात आपण वाढदिवस साजरे करतो आणि अंत्यसंस्कारात रडतो, तिथे आपण एकमेकांशी प्रेमळपणाने वागूया आणि आपल्यासाठी नाही तर त्...
01/09/2025

"या जगात आपण वाढदिवस साजरे करतो आणि अंत्यसंस्कारात रडतो, तिथे आपण एकमेकांशी प्रेमळपणाने वागूया आणि आपल्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी उपस्थित राहूया. ज्या दिवशी त्यांच्याकडे आपल्याला देण्यासाठी काहीही नसेल तेव्हाही त्यांच्याशी संपर्क साधुया. कारण एकदा गेल्यावर ते पुन्हा परत येणार नाहीत... त्यांना कितीही वेळा फोन केला तरी तुम्ही त्यांच्याशी कधीही बोलू शकणार नाही.

आयुष्य आहे तोपर्यंत प्रेमाने जगूया."....अभिनेत्री प्रिया मराठेच्या जाण्याने शर्मिला शिंदे खूप भावूक झाली आहे. मुंबईत पहिल्यांदा ती जेव्हा आली तेव्हा ती प्रिया मराठेच्या घरी गेली होती. तेव्हापासूनचं तिच्यासोबत असणारं तिचं नातं जुळलं होतं. त्यामुळे एकदा आयुष्यातून ती व्यक्ती निघून गेली की ती परत येण्याची वाट बघण्यापेक्षा त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला, भेटा असं मत शर्मिलाने व्यक्त केलं आहे.

"मला भेटायला येऊ नका!"...सेलिब्रिटी मैत्रिणींसाठी प्रिया मराठेचा शेवटचा हट्ट....आजचा दिवस मराठी विश्वासाठी खूपच भावूक ठर...
01/09/2025

"मला भेटायला येऊ नका!"...सेलिब्रिटी मैत्रिणींसाठी प्रिया मराठेचा शेवटचा हट्ट....आजचा दिवस मराठी विश्वासाठी खूपच भावूक ठरला. अभिनेत्री प्रिया मराठेची कॅन्सरशी झुंज अयशस्वी ठरली. दोन वर्षांपूर्वी प्रिया मराठेला कॅन्सरचे निदान झाले होते. त्या आजाराशी तिने दोन हातही केले. गेल्याच वर्षी या आजारातून ती बाहेर पडली असल्याचे सेलिब्रिटी मैत्रिणींना कळाले तेव्हा सगळ्यांनी प्रियाची आवर्जून भेट घेतली. एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेली प्रिया सगळ्यांना आपलीच वाटायची. पण गेल्या वर्षी पुन्हा या आजाराने डोकं वर काढलं आणि प्रिया मराठेने 'मला भेटायला येऊ नका!' असा प्रेमळ हट्ट केला. प्रियाचा हा हट्ट मैत्रिणींनीही आदर राखून पूर्ण केला पण आज या मैत्रिणीने या जगाचा निरोप घेतल्यावर राजश्री निकम, भक्ती रत्नपारखी यांनी हळहळ व्यक्त केली. बिनधास्त, दिलखुलास अभिनेत्रीला गमावल्याच्या भावना यांनी व्यक्त केल्या.

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when सिर्फ दर्जेदार मराठी. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to सिर्फ दर्जेदार मराठी.:

Share