
12/06/2025
काल कबीर जयंती होती. त्यानिमित ही पुस्तक ओळख 🙏
नुसते शब्द नव्हे, शब्दामागची जाणीव आठवायची असा हा दिवस.
साध्या शब्दांतून जीवनाचे गूढ उलगडणाऱ्या कबीरांच्या सखोल विचारांना नव्या संवेदनांनी स्पर्श करणारे पुस्तक म्हणजे — कबीरबोध."
🌿 कबीरबोध 🌿
लेखिका : वैद्य सुचित्रा कुलकर्णी
प्रकाशक : व्यास क्रिएशन्स
"शब्द साधे, अर्थ खोल...
कबीरांच्या वाणीतून जीवन उमलतं, आणि आपण हळूहळू... थोडे कबीर होतो."
संत कबीरांची साखी — केवळ अभंग नाही, ती अंतर्मुखतेची वाट आहे.
त्यांची भाषा – लोकवाणी. त्यांचे विचार – कालातीत.
आणि त्यांचे शब्द – एकेक आत्मशोधाचा दिवा.
‘कबीरबोध’ हे पुस्तक म्हणजे या दिव्यांची माळ.
प्रत्येक पानात चिंतन, प्रत्येक ओळीत चटका, आणि प्रत्येक अर्थात शुद्ध विचारांची झुळूक.
📖 वाचावं… समजावं… आणि अंतर्मनात उजळून ठेवावं.
#कबीरबोध #संतकबीर #व्यासक्रिएशन्स #सुचित्राकुलकर्णी #साहित्यिकवाचन #मराठीपुस्तक