21/08/2026
मुंबईतील मालाड परिसरात मराठीत OTP सांगितल्यावर कॅब चालक आणि मराठी युवकामध्ये वाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वादानंतर कॅबचालकाकडून आपल्याला मारहाण झाल्याचा दावा संबंधित मराठी युवकाने केला आहे.
या प्रकरणी आपला बोलबाला TV शी थेट संपर्क झाला असून, संबंधित युवकाने बोलताना पोलिसात NC दाखल केल्याची माहिती दिली आहे. तसेच, व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर कॅबचालकांनी संबंधित कंपनीकडेही तक्रार केल्याचा दावा युवकाने केला आहे.