31/12/2022
31 डिसेंबर वर्षातील शेवटचा दिवस
2022 अगदी अविस्मरणीय वर्ष..
बदल निसर्गाचा नियम आहे.ऋतुच्या आगमनासाठी जुन्या पानांना गळून पडावच लागत. आयुष्यातही अगदी तसंच आहे नवीन आठवणींसाठी जुन्या आठवणींना कदाचित पुसावच लागतं...
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक अनुभव आले....परंतु या वर्षी दुर्भाग्य लाभलं याच वर्षी अगदी जवळच्या दोन व्यक्तींना अनंतात विलीन होताना याच डोळ्यांना बघावं लागलं... सर्व गोष्टी सोप्या वाटतात परंतु निरोप घेणे अत्यंत कठीण आणि त्रासदायक असतं तेही अगदी जवळच्या व्यक्तींचा कायमचा निरोप 😭.. हुरहूर,उदासीनता यांनी मन व्यापून गेलय... एवढ्या लांब पल्यांची निरोप घेताना मनाची काय अवस्था झाली असेल ते लिहिण्या इतकं सोपं नाहीय..
सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नसते... निरोप दिला म्हणजे नाते तुटत नसते.. कारण हे धागे हृदयाचे हृदयाशी जुळलेले असतात ते तुटन किंवा तोडणं कदाचित अशक्यच....ही पोकळी कधीचं भरुन न निघणारी आहे...खूप मनापासून प्रयत्न करून ही कित्येक महिने झाले तरीही त्यातून बाहेर पडता येत नाहीये....
ज्यांच्या मेसेज शिवाय आपली सकाळ होत नाही त्यांच्या शिवाय संपूर्ण आयुष्य काढायचे ही कल्पना सुद्धा सहन होत नाही. नियतीने केलेला हा आघात न सोसवणारा आहे. नैराश्य काय कदाचित अनुभवायला मिळाले. मरण निश्चित आहे पण जीवन अनिश्चित कधीही अगदी कोणत्याही क्षणी आपल्याला निरोप घ्यावा लागेल यासाठी मन तयार झालं याचं वर्षी...
पर्सनल प्रोफेशनल अनेक प्लॅन पुढें ढकलावे लागले... या घटनेमुळे अनेक जवळच्या नात्यांची परीक्षा झाली जी नाती पास झाली ती माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकवायचा माझा अट्टाहास राहील....
माझ्यासाठी हे वर्ष खरंच खूप महत्त्वाच आहे कारण या वर्षात मी आतापर्यंतच्या खूप काही महत्त्वाच्या गोष्टी शिकले आणि अनुभवल्या आहेत ज्या मला माझ्या उर्वरित आयुष्यात नेहमी प्रेरित करतील. खुप नवीन नाती जोडली आणि trash/unwanted नाती दुरावली (जे माझ्या मनशांती साठी गरजेचं होतं) खुप सुंदर गोष्टी अनुभवल्या आणि दुःखांचे डोंगरही सहन केले.
काही जगावेगळी नाती मिळाली. माझ्यातला आत्मवश्वास पराकोटीला पोचविण्याचे काम याच वर्षाने केले. माझ्या न पाहिलेल्या स्वप्नातलं चालून आलेली सुखं याच वर्षाने दिली. माझ्या छोट्याश्या अस्तित्वातल वेगळेपणं याच वर्षाने जाणवून दिलं. काही नात्यातल खरेपण आणि काही नात्यातला निव्वळ दिखावूपणा याच वर्षात समजला.
काही अनपेक्षित धक्क्यामुळे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ते ही समजलं.
काही घट्ट नाती अजून घट्ट झाली तर काही परकेपणा न दाखवणारी पण परकी असणारी नाती याच वर्षात परकी केली (मीच)
आयुष्यातले खुप मोठे धडे याच वर्षाने शिकवले.
पैशासाठी माणस तोडणारी लोकं याच वर्षात बघितली. पैसा हे सर्वस्व आहे की नाही हा प्रश्न याच वर्षी पडला.
अमाप पैसा गोळा करणं म्हणजे संपत्ती नाही किंवा श्रीमंती नाही हे याच वर्षापासून सांगन सोडून दिल आहे मी.
शेवटी काय मी जशी होती तशीच आहे आणि तशीच असणार आहे कोणाच्या वागण्याने मी बदलणार नाही नेहमीप्रमाणे नाती जोडणार तसेच स्वतःच्या प्रगतीसाठी दिवस-रात्र एकत्र करणार आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी रक्ताचं पाणी करणारी मी भुंकणाऱ्या कुत्र्यांना ना दाद दिली ना देणार.....
- आरु