
02/08/2025
पनवेलमधील काळुबाई चायनीज कॉर्नरवर अस्वच्छतेचा धक्कादायक प्रकार उघड, नागरिकांमध्ये संताप.
पनवेल, सुकापुर रोड, आनंदी नगर येथील गटारालगतच्या काळुबाई चायनीज कॉर्नर या दुकानात अस्वच्छ आणि घाणेरड्या पद्धतीने अन्नपदार्थ विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. स्वच्छतेच्या मूलभूत नियमांना हरताळ फासला जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. या धक्कादायक बाबीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
या दुकानात स्वच्छतेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, यामुळे खाद्यपदार्थांद्वारे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी पनवेल महानगरपालिका, फूड ऑफिसर आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तातडीने तपासणी आणि कडक कारवाईची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
"हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. आमच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास याचे परिणाम गंभीर होऊ शकतात," असे स्थानिक रहिवासी संतप्तपणे म्हणाले. संबंधित अधिकाऱ्यांनी या अस्वच्छतेची त्वरित दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.🙏🏼🐯