09/08/2024
अंबरनाथच्या स्टेशन परिसरात हेरंब मंदिर असून मंदिरात बुधवारी पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडत दोन चोरटे मंदिरात शिरले. या चोरट्यांनी आधी सीसीटीव्हीच्या वायर तोडल्या. त्यानंतर मंदिरातील कपाट उघडून त्यातून रोख रक्कम चोरली. मंदिरातील अवजारे वापरून या चोरट्यांनी मंदिराच्या चार दानपेट्या फोडल्या. तसंच गाभाऱ्यात लॉकरमध्ये असलेले गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने सुद्धा चोरून नेले. सकाळी मंदिरात पुजारी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी मंदिरात धाव घेत तपासणीला सुरुवात केली या चोरट्यामुळे त्यातील रहिवासी व पुजारी यांना मोठा फटका बसल्यामुळे ती तेथील परिसरातील भीतीच वातावरण निर्माण झाल आहे तरी पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांची तपासणी करावी
DIGITAL THANE NEWS
Follow & share