Thane Times News

Thane Times News Welcome to Thane Times – Your Trusted Source for the Latest News and Updates in Thane! Stay Connected. Stay Informed. Stay Thane Times.

"ठाणे टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे! ठाण्याच्या ताज्या बातम्या, घडामोडी आणि इव्हेंट्ससाठी आमच्यासोबत रहा.
" Stay informed with Thane Times as we bring you the most current and comprehensive news coverage from Thane and beyond. From breaking news, politics, and community stories to lifestyle, sports, and entert

ainment, we are dedicated to keeping you up-to-date with everything happening in and around Thane. Join our community to engage with local stories, share your opinions, and stay connected with the events that matter to you. Follow us for reliable news, insightful features, and a fresh perspective on the pulse of Thane.

शरद पवारांचे सूचक विधान १२ तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एक होणार होत्या. #राष्ट्रवादी  #महाराष्ट्र
31/01/2026

शरद पवारांचे सूचक विधान १२ तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एक होणार होत्या.

#राष्ट्रवादी #महाराष्ट्र

MPSC विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा वाढीसाठी आंदोलन; पोलिस येताच विद्यार्थ्यांनी गायले ‘जन गण मन’ठाणे | प्रतिनिधीमहाराष्ट्र ...
01/01/2026

MPSC विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा वाढीसाठी आंदोलन; पोलिस येताच विद्यार्थ्यांनी गायले ‘जन गण मन’

ठाणे | प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षांसाठी वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी MPSC विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन केले. आंदोलन पांगवण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता, कोणताही गोंधळ न करता विद्यार्थ्यांनी थेट राष्ट्रगीत ‘जन गण मन’ गायला सुरुवात केली.

अचानक सुरू झालेल्या राष्ट्रगीतामुळे काही काळ वातावरण स्तब्ध झाले. उपस्थित पोलिस कर्मचारी आणि नागरिकांनीही राष्ट्रगीताला उभे राहून आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी शांततेत राष्ट्रगीत पूर्ण करत आपली मागणी लोकशाही मार्गाने मांडली.

विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, परीक्षांतील विलंब आणि कोविड काळामुळे अनेक उमेदवार वयोमर्यादेच्या बाहेर जात असून त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे किमान २–३ वर्षांची वयोमर्यादा वाढ देण्याची त्यांची मागणी आहे.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवत पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू दिली नाही. ही घटना विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध आंदोलनाचे आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून पाहिली जात आहे.

— ठाणे टाइम्स



28/12/2025

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने खळबळ; गरीब महिलेला घराबाहेर काढल्याचा गंभीर आरोप

ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका गरीब महिलेला तिच्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आल्याचा गंभीर आरोप या वक्तव्यानंतर समोर आला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सदर महिला अनेक वर्षांपासून त्या घरात वास्तव्यास होती. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता तिला घराबाहेर काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

दरम्यान, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, संबंधित गरीब महिलेला तात्काळ न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.

या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून, येत्या काळात याचे पडसाद विधिमंडळातही उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुरेखाताई पाटील यांना खारीगाव–पारसिक, प्रभाग क्रमांक ९ मधून जोरदार पाठिंबाठाणे : खारीगाव–पारसिक परिसरातील प्रभाग क्रमांक...
28/12/2025

सुरेखाताई पाटील यांना खारीगाव–पारसिक, प्रभाग क्रमांक ९ मधून जोरदार पाठिंबा

ठाणे : खारीगाव–पारसिक परिसरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये सुरेखाताई पाटील यांना नागरिकांचा उत्स्फूर्त आणि जोरदार पाठिंबा मिळत आहे. स्थानिक नागरिक, महिला वर्ग तसेच युवक मोठ्या संख्येने पुढे येत त्यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत आहेत.

खारीगाव परिसरातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, महिला सशक्तीकरण व सामाजिक प्रश्नांसाठी सुरेखाताई पाटील यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत नागरिकांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे.

“काम करणाऱ्या नेतृत्वालाच साथ” या भावनेतून नागरिक सुरेखाताई पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र सध्या खारीगाव–पारसिक भागात दिसून येत आहे. त्यांच्या साधेपणा, जनतेशी असलेला थेट संवाद आणि प्रश्न सोडवण्याची भूमिका यामुळे त्या नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत.

आगामी काळात खारीगाव–पारसिक परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सुरेखाताई पाटील यांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.

ठाणेकरांचे पाणी वाया! महानगर गॅस ठेकेदारावर गुन्हा दाखल करा – राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधानठाणे : ठाणे शहरात मह...
27/12/2025

ठाणेकरांचे पाणी वाया! महानगर गॅस ठेकेदारावर गुन्हा दाखल करा – राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान

ठाणे : ठाणे शहरात महानगर गॅस पाइपलाइनच्या कामादरम्यान वारंवार जलवाहिन्या फुटत असून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ठाणेकरांवर यामुळे मोठे संकट ओढावले असून संबंधित महानगर गॅस ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मनोज प्रधान यांनी सांगितले की, शहरातील अनेक भागांत गॅस पाइपलाइन टाकताना महापालिकेच्या जलवाहिन्यांचे नुकसान होत आहे. यामुळे रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे, तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणीपुरवठा खंडित होत आहे. “ठाणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत असताना, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया जाणे हे अत्यंत गंभीर आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.

महापालिका प्रशासनावरही प्रधान यांनी टीका करताना सांगितले की, कामावर योग्य देखरेख नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. वारंवार तक्रारी करूनही ठेकेदारावर कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने तात्काळ संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, नुकसानभरपाई वसूल करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक नियम लागू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला असून, ठाणेकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी पक्ष रस्त्यावर उतरेल, असे स्पष्ट केले आहे.

🏗️ क्लस्टर पुनर्विकास विरुद्ध म्हाडा पुनर्विकाससामान्य नागरिकांनी काय समजून घ्यावे?मुंबई व उपनगरांमध्ये जुन्या इमारतींच्...
27/12/2025

🏗️ क्लस्टर पुनर्विकास विरुद्ध म्हाडा पुनर्विकास

सामान्य नागरिकांनी काय समजून घ्यावे?

मुंबई व उपनगरांमध्ये जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. आज दोन प्रमुख पर्याय नागरिकांसमोर असतात — म्हाडा पुनर्विकास आणि क्लस्टर पुनर्विकास (DCPR 33(9)). पण नेमका कोणता पर्याय नागरिकांच्या हिताचा आहे? चला स्पष्टपणे समजून घेऊया.

🔹 म्हाडा पुनर्विकास म्हणजे काय?

म्हाडा (Maharashtra Housing & Area Development Authority) मार्फत जुन्या म्हाडा इमारतींचा पुनर्विकास केला जातो.

म्हाडा पुनर्विकासाचे फायदे

सरकारी नियंत्रण असल्याने कायदेशीर सुरक्षितता

फसवणुकीचा धोका कमी

घर मिळण्याची हमी

🔹 क्लस्टर पुनर्विकास म्हणजे काय?

DCPR 33(9) अंतर्गत एकाच भागातील अनेक जुन्या इमारती एकत्र करून खासगी बिल्डरद्वारे पुनर्विकास केला जातो.

क्लस्टर पुनर्विकासाचे फायदे

मोठ्या आकाराची घरे (405–550 चौ.फुट कार्पेट)

तुलनेने जलद प्रक्रिया (3–5 वर्षे)

बिल्डर विश्वासार्ह नसेल तर प्रकल्प रखडू शकतो

70% रहिवाशांची संमती लागते

कायदेशीर जागरूकता नसेल तर नागरिक फसवले जाऊ शकतात

⚠️ महत्त्वाचा मुद्दा: 300 चौ.फुटाचा गैरसमज

अनेक बिल्डर सांगतात की “क्लस्टरमध्ये फक्त 300 चौ.फुटच मिळतो” — हे पूर्णपणे चुकीचे आहे.

👉 DCPR 33(9) मध्ये 300 चौ.फुटाची कोणतीही मर्यादा नाही.
कायद्यानुसार:

नवीन घराचा कार्पेट एरिया किमान जुन्या घराएवढा असायलाच हवा

प्रत्यक्षात क्लस्टरमध्ये 405 चौ.फुट हे किमान मानक समजले जाते

🧠 नागरिकांनी काय करावे?

कोणत्याही कागदावर घाईघाईने सही करू नये

कार्पेट एरिया लिखित स्वरूपात मागावा

स्वतंत्र आर्किटेक्ट / PMC कडून FSI feasibility तपासून घ्यावी

70% संमती देण्यापूर्वी सर्व अटी स्पष्ट कराव्यात

#ठाणेThaneTimes

साताऱ्यात MD ड्रग्ज फॅक्टरीचा धक्कादायक खुलासा – एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या संबंधात आरोपसातारा: राज्यातील राजकारणात पु...
18/12/2025

साताऱ्यात MD ड्रग्ज फॅक्टरीचा धक्कादायक खुलासा – एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या संबंधात आरोप

सातारा: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद उभा राहिला आहे, कारण साताऱ्यातील सावरी गावात पोलिसांनी MD ड्रग्जचा साठा जप्त केला. या प्रकरणात शिवसेना (उद्धवबाळासाहेब गट) उपनेते सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावावर गंभीर आरोप केला आहे.

सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, सावरी गावात पोलिसांनी एक शेडमध्ये 45 किलो ड्रग्ज सापडले, ज्याची बाजारातील किंमत सुमारे 145 कोटी रुपये आहे. हा साठा तपासत असताना या ड्रग्जशी संबंधित कामगारांना प्रकाश शिंदे यांचा रिसॉर्ट परिसरातून जेवण पोहोचल्याचे आरोप करण्यात आले आहे. प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असल्याचे अंधारे यांनी सांगितले.

सुषमा अंधारेंनी पोलिसांनी FIR मध्ये आरोपींची नावे समाविष्ट न केल्याचा आणि माहिती लपवण्यात आली असल्याचा दावा केला आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या राजीनामा ची देखील मागणी केली आहे आणि सांगितले की जर एखाद्या सामान्य नेत्याचा मुलगा प्रकरणात नाव आला असता तर लगेच राजीनामा अपेक्षित असावा.

दुसरीकडे, प्रकाश शिंदे यांनी या आरोपांचे कडक निराकरण केले आहे आणि स्वःतचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगून आरोप फेटाळले आहेत. पोलिस कारवाई सध्या सुरू असून अधिकृत तपास होत आहे.

Jitendra Awhad Supriya Sule Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Supriya Sule

ठाणे राष्ट्रवादी (शरद पवार गट) तुतारीत उमेदवारीसाठी 300 हून अधिक इच्छुक; डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावर कार्यकर्...
29/11/2025

ठाणे राष्ट्रवादी (शरद पवार गट) तुतारीत उमेदवारीसाठी 300 हून अधिक इच्छुक; डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास

ठाणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) – तुतारी चिन्हाखाली ठाणे जिल्ह्यात उमेदवारीसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. 300 पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज सादर केले असून पक्षात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्षेत्रात सक्रिय असलेल्या विविध सामाजिक, व्यावसायिक आणि तरुण कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत.
पक्षाच्या ठाणे जिल्हा नेतृत्वाबद्दल कार्यकर्त्यांचा वाढता विश्वास लक्षात येत असून विशेषतः डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये सकारात्मकता वाढली आहे.

पक्षाच्या निवड समितीकडून लवकरच अर्जांची छाननी केली जाणार असून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

“ठाणे राष्ट्रवादी तुतारीत उत्साहाचा स्फोट! 300+ अर्ज डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास.”

#ठाणे #शरदपवारगट #तुतारी #राष्ट्रवादीकाँग्रेस

Supriya Sule Jitendra Awhad

सुट्टी जाहीर शेअर करा !! #ठाणे
18/08/2025

सुट्टी जाहीर शेअर करा !!

#ठाणे

10/08/2025

Address

Thane
400602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thane Times News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share