30/10/2025
मी मानवी प्राण्यावर जितके प्रयोग केले आहेत कि मला देखील मानसोपचार शाखेतील वैज्ञानिक म्हणून एखाद्या विद्यापीठाने पदवी द्यायला हरकत नाही.
त्या ताईने मला फोन करुन सांगितले कि तिच्या नवऱ्याला अधूनमधून झटके येतात, तो थोडासा पॅनिक होतो आणि मग कधीतरी हिच्या कानाखाली देतो. या प्रकारात कित्येकदा महिलेचे शोषण होत असते पण महिला नवऱ्यावरील प्रेमाने सगळे अपराध पोटात घालण्याचा प्रयत्न करत असते. मी तिला सांगितले कि यावर पांढऱ्या कोटातील डॉक्टर नाही तर खाकी शर्टातील डॉक्टरच इलाज करु शकतात. एकदाच त्यांची Treatment मिळाली कि तूझा नवरा सरळ होईल. त्याचे सगळे आजार पळून जातील.
तिला ते पटेना आणि तिने वारंवार विनंती केली तेंव्हा मी थोडे नाईलाजाने त्याच्याशी बोलायचे ठरवले, त्याने तिचे लक्ष नाही हे बघून हळूच सांगितले “सर हि आणि माझी आई सतत भांडत असतात मग मीच डोके फिरल्याचे नाटक करतो, त्यानंतर दोघी गपचुप एकत्र होतात.”
मी थोडा विचार केला आणि त्याला सांगितले “मी तूझ्या बाय़कोला सांगतो कि हि पॅनिक अटॅकची केस आहेत, त्यामुळे घरात भांडणे टाळा पण जर परत भांडणे झाली तर तू अंगात आल्यासारखे कर मात्र बायकोला न मारता स्वतःच्याच थोबाडात मारुन घ्यायच्यास.”
त्याची बायको तशी शांत, समजूतदार होती पण आई बरीच खाष्ट, फटकळ, भांडकुदळ होती, त्या काकूंना पटवून दिले कि त्यांच्या मुलाला काहीतरी बाधा आहे, ती टाळायची तर घरात सर्वांना रोज एक खास तीर्थ घ्यावे लागेल. त्यांना सरळ सांगून पुष्पौषधी दिल्या असत्या तर त्यांनी घेतल्या नसत्या पण खोटे बोलून, थोडी भिती घालून त्यांना पुष्पौषधी दिल्या, त्या तीर्थ समजून त्या घेत राहिल्या. काहीतरी खोटे बोला इतकीच युक्ती मी दिली होती पुढे ते खोटे रंगवून सांगण्याचे काम त्या पॅनिक अटॅकवाल्यानेच केले.
त्याच्या आईला पुष्पौषधी चालू केल्यापासून गेल्या सहा महिन्यात त्याला एकदाही पॅनिक अटॅक आलेला नाही.
पुष्पौषधी वापरुन स्वतःचा राग, चिंता, भिती, नैराश्य, वैफल्य, नकारात्मक विचार यांच्यावर नियंत्रण ठेवता येते.
कोणतीही मानसिक समस्या जिथे कळते पण वळत नाही त्यावर पुष्पौषधी उपयोगी पडते.
पुष्पौषधी म्हणजे स्वभावाला औषध
पुष्पौषधी:- 1550/- कुरियर सेवा उपलब्ध
सदर किंमत कधीही वाढू शकते
संपर्क
आदित्य भागवत (मो) 9029581590