10/10/2025
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आठवणीतले अनंत तरे चरित्र पुस्तकाचे ११ ऑक्टोंबरला प्रकाशन
ठाणे शहराचे त्रिविक्रमी माजी महापौर, माजी आमदार तथा महाराष्ट्र कोळी समाज संघाचे संस्थापक, कार्ला एकविरा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष, शिवसेना उपनेते दिवंगत अनंत तरे यांच्या यशस्वी जीवनावर आधारीत अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरे पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, दि.११ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता गडकरी रंगायतन नाट्यगृह, तलावपाली, ठाणे येथे शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न होणार असून सदर कार्यक्रम दोस्ती फाऊंडेशन व अनंत तरे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
अनंत तरे यांच्या जीवनावरील चरिञ अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरे पुस्तकाचे लेखन त्यांचे स्वीय्य सहाय्यक योगेश कोळी यांनी लिहीले असून दोस्ती पब्लिकेशनच्या माध्यमातुन चरित्र पुस्तक प्रकाशित होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार असून कवी लेखक अरुण म्हात्रे, अभिनेते उदय सबनिस, मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य जयु भाटकर तसेच विशेष अतिथी म्हणून शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, खासदार संजय दिना पाटील, खासदार सुरेश म्हात्रे, धाराशिवचे खासदार ओमराजे निबांळकर, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोळी समाजाचे नेते माजी आमदार रमेश पाटील, आगरी समाजाचे नेते अतुल दि.बा. पाटील, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, धाराशिवचे आमदार कैलास पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, जनादेशचे संपादक कैलास म्हापदी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्व. अनंत तरे यांच्या जीवन चरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्याला राज्यातून कोळी समाजाचे पदाधिकारी, आगरी बांधव, एकविरा देवी भाविक व ठाणेकर रसिक उपस्थित राहणार आहेत.
सदर अनंत आकाश पुस्तकाचे प्रकाशनाचे आयोजन दोस्ती फाऊंडेशन आणि अनंत तरे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने होत असून कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणुन माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे, व्यवसायिक नंदकुमार साळवी, अनंत तरे फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दक्षता अनंत तरे, खजिनदार डॉ. जस्मिन राजके-तरे, पायलट विशाल तरे, मदन भोई, दिलीप जयसिंगपुरे, नवनाथ देशमुख हे असून कार्यक्रमाचे दर्जेदार नियोजन व आयोजन अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरे पुस्तकाचे लेखक, दोस्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश कोळी यांनी केले असून दोस्ती फाऊंडेशनचे उपाध्यक्ष प्रथमेश जाधव, खजिनदार महेश दळवी, सचिव वैभव घोगले यांचे अथक परिश्रम आहेत.
सदर पुस्तक प्रकाशन सोहळ्याला रसिक-वाचक आणि अनंत तरे प्रेमींनी उपस्थित रहावे असे निमंत्रण दोस्ती फाऊंडेशन, अनंत तरे फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. सदर पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अधिक माहिती करीता कार्यक्रमाचे समन्वयक प्रथमेश जाधव ९८१९८४१६६८ यांना संपर्क करावा.