14/02/2026
बदलापूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी खुलं झालं निसर्गरम्य 'फुलपाखरू उद्यान'!
बदलापूर: मुलांच्या भावविश्वात निसर्गाचे रंग भरण्यासाठी आदर्श विद्या प्रसारक संस्था आणि आय नेचरवॉच फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'फुलपाखरू बाग' (Butterfly Garden) साकारण्यात आली आहे. या नाविन्यपूर्ण उद्यानाचे उद्घाटन शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी आदर्श विद्या मंदिर, कुळगाव-बदलापूर (पूर्व) येथे दिमाखात पार पडले.
शहरी वातावरणात दुर्मिळ होत चाललेली फुलपाखरे आता मुलांना प्रत्यक्ष पाहता येणार आहेत. निसर्ग संवर्धनाची ओढ निर्माण व्हावी आणि विज्ञानाची गोडी लागावी, या दृष्टीने हे उद्यान अतिशय महत्त्वाचे आहे. विविध रंगीबेरंगी फुले आणि फुलपाखरांनी सजलेली ही बाग मुलांसाठी आनंदाची मोठी पर्वणीच ठरणार आहे.
पालकांनो, मुलांमधील निसर्गप्रेमी जागृत करण्यासाठी त्यांना ही फुलपाखरू बाग नक्की दाखवा!