04/12/2025
राज्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज लागणार होते पण हे निकाल 21 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. आधीच निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत आहे त्यात असे निर्णय संशय निर्माण करणारे आहेत. आता सरकार आणि निवडणूक आयोग हा मुद्दा एकमेकांवर ढकलत आहे पण जेव्हा कोर्टात सुनावणी झाली तेव्हाच सरकारने भक्कमपणे बाजू मांडली असती तर ही वेळ आली नसती. पुढचे 18 - 19 दिवस EVM मशीन गोडाऊन मध्ये असणार आहेत, मागचा इतिहास बघता यात हेराफेरी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असू शकतो !