
16/08/2025
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बिलोली येथे भारताच्या ७९ वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण डॉ.वाडेकर यांच्या हस्ते संपन्न.
"१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली गुटखा, तंबाखू, मुक्तीची शपथ"
[ बिलोली प्र - सुनिल जेठे ]
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बिलोली येथे भारताच्या ७९ वा स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण १५ ऑगस्ट शुक्रवार रोजी स.७:३५ वा.आयोजित संपन्न झाला. कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणपती हुल्लाजी वाडेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिनाचा समारंभ संपन्न करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने तंबाखू, गुटखा, सिगारेट, बिडी मुक्तची शपथ व कुष्ठरोग पिडित व्यक्ती मतभेद करणार नाही, मी कुष्ठरोगी व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी सल्ला देऊन मदत करीन, याबाबत शपथ व प्रतिज्ञा घेण्यात आली.
गुटखा, सिगारेट, बिडी मुक्तची शपथ व कुष्ठरोगी व्यक्तीबद्दल समस्या व समाजात गैरसमज असलेला दुर व्हावे म्हणून गुटखा, कुष्ठरोगी व्यक्तीबद्दल शपथ व प्रतिज्ञा घेण्यासाठी सुचना तालुका आरोग्य अधिकारी गणपती वाडेकर यांनी केली.
स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहणासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणपती वाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती पूरी, डॉ.नेहा हाके व अदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.