The Lemon News

  • Home
  • The Lemon News

The Lemon News the lemon news is a media house run by Ramkrushna lambture & entertainment, 24×7 updates and much more Information.

नातं पतीपत्नीचं..... नात्याचा निर्धार पूर्वक सांभाळ         #दलेमनन्यूज   *काय आणि कसं असतो हो पती पत्नीचं नातं?  बऱ्याच...
22/07/2025

नातं पतीपत्नीचं..... नात्याचा निर्धार पूर्वक सांभाळ

#दलेमनन्यूज
*काय आणि कसं असतो हो पती पत्नीचं नातं? बऱ्याच विवाहित जोडप्यांना पती पत्नीच्या मधुर नात्याचा अर्थ तरी माहीत असतो का? अशी शंका येते. दुर्दैवाने आजकाल बरीच जोडपी हे नातं समजून घेण्यात कमी पडतात असंच दिसतं, जे की फार निराशाजनक आहे.*
*पती पत्नी म्हणजे देखणा राजबिंडा नवरा आणि सुंदर सौंदर्यसंपन्न बायको एवढंच मर्यादित नाहीये. नुसतं दिसायला सुंदर असणं म्हणजे सुंदर नातेसंबंध नव्हे !*
*अनुरूप जोडीदार शोधताना एक लक्षात घेतलं पाहीजे की, आपल्या अपेक्षेप्रमाणे सगळं काही मिळेल किंवा होईल असं कधीच असत नाही, कारण या जगात शंभर टक्के परिपूर्ण कुणीच असत नाही, म्हणून आपल्या अपेक्षा शंभर टक्के परिपूर्ण होऊच शकत नाहीत. थोडं फार इकडं तिकडं असणारच, थोडं फार कमी जास्त होणारच हे समजून घेता आलं पाहिजे.*
*सुंदर देखणी गोरीपान मुलगी, किंवा खूप श्रीमंत, पैसेवाला मुलगा म्हणजे सर्वकाही नाही. खूप सौंदर्य असेल, किंवा खूप पैसे असतील म्हणजे एकमेकांवर विशुद्ध प्रेम असेलच याची खात्री देता येत नाही, आणि* *"पैशाने प्रेम विकत घेता येत नाही" बरंका*
*पतिपत्नीच्या नात्यामध्ये आदराची नितांत आवश्यकता असते. दोघांनी एकमेकां विषयी आदर बाळगला पाहिजे आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक आवश्यक प्रसंगी तो व्यक्तही झाला पाहिजे. काय असतो ओ खरंच पतीपत्नीच्या या नात्याचा अनुबंध !! आज तेच मुद्देसूद पणे बघुयात की जरा:*


*★पतीपत्नीने एकमेकांचा स्वीकार जसे आहे तसे या तत्त्वावर करायला हवा.*
*★पतीपत्नीने एकमेकांना पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे.*
*★पतीपत्नीने एकमेकांशी नातं जोडल्यानंतर एकमेकांनी एकमेकांची मनापासून आवश्यक तेवढी काळजी घेतलीच पाहिजे.*
*★पतीपत्नीने आपल्या नात्याविषयी आणि एकमेकां विषयी अभिमान, गर्व बाळगला पाहिजे.*
*★पतीपत्नीने जसे आहे त्या परिस्थितीत, प्रत्येक प्रसंगी आवर्जून एकमेकांचं कौतुक केलं पाहिजे एकमेकांची प्रशंसा , स्तुती केली पाहिजे.*
*★पतीपत्नीने जे आणि जसं आहे तशा परिस्थितीत एकमेकांवर संपूर्ण प्रेम केलं पाहिजे, कुणी जास्त किंवा कुणी कमी असं कधी असत नाही.*
*★पतीपत्नीचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असलाच पाहिजे.*
*★पतीपत्नीने एकमेकां विषयीच्या आवडी निवडीचा आदर केला पाहिजे, आपल्या जोडीदाराला काय आवडतं काय आवडत नाही हे दोघांनीही परस्परांचं सांभाळलं पाहिजे, जपलं पाहिजे.*
*★पतीपत्नीने एकमेकांना सावरून घेत सांभाळलं पाहिजे. दोघेही जे काही कार्य करत आहेत,त्यात एकमेकांना साथ दिली पाहिजे, समर्थन दिले पाहिजे आणि केलेही पाहिजे.*
*★पतीपत्नीने एकमेकांना आपापल्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च स्थानी जाण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, एकमेकांना प्रेरित करत परस्परांचं कौतुक केलं पाहिजे.*
*★पतीपत्नीने एकमेकां मधील चांगल्या गोष्टींचा जसा स्वीकार केला आहे, तसा एकमेकांच्या काही वाईट गोष्टी, सवयी, जोडीदाराच्या आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींचा ही स्वीकार करता आला पाहिजे.*
*★पतीपत्नीने चुकीच्या वेळी एकमेकांना क्षमा करायला, माफ करायला शिकलं पाहिजे.*
*★पतीपत्नीने, नवऱ्याने बायकोवर, किंवा बायकोने नवऱ्यावर , असं एकमेकांवर सगळंच काही सोपवून मोकळं न होता, परस्परांनी समजून घेत समानतेने जबाबदारीचं पालन केलं पाहिजे.*
*खरं सांगू का आजकालच्या जमान्यात अशी सगळंच चांगलं आपल्या मनासारखं असणारी माणसं, सर्वोत्तम, सर्वगुणसंपन्न असणारी व्यक्ती, जोडीदार म्हणून भेटणं खरंच खूप अवघड आहे ओ!*
*तरीही थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने किंवा ईश्वरी कृपेने म्हणा तुम्हाला भेटलेला, मिळालेला, किंवा निवडलेला जोडीदार हा उत्तमच असतो. तो ईश्वराचा आशीर्वादच असतो, किंवा ईश्वराची तीच इच्छा असते. हे समजून घेऊन उभायतांनी ह्या ईश्वरी नात्याचा निर्धार पूर्वक सांभाळ केला पाहिजे.*
*एक पक्कं लक्षात असुद्यात की, पतिपत्नीचं नातं म्हणजे पूर्णवेळची, कायमची, वचनबद्धता असते, कायमस्वरूपी तडजोडही असते, तीच स्वीकारता आली पाहिजे, पूर्णत्वाने निभावता आली पाहिजे !!*
*म्हणूनच आपला निवडलेल्या, मिळालेल्या, स्वीकारलेल्या जोडीदाराला जबाबदारीने, प्रेमाने आपुलकीने आणि काळजीपूर्वक अखेरपर्यंत सांभाळा ! कुणीही कुणाला दुखावू नका, एकमेकांशी प्रामाणिक रहा, समाधानी रहा !!, कारण तुमचा जोडीदार हा ईश्वराने खास तुमच्यासाठी निवडलेला असतो !!*
*लेख संपूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद*
💝
*लेख आवडला तर नक्कीच पुढे पाठवा, नावासह शेअर करा* 😊♥️❤️
*मकरंद दीक्षित, कात्रज, पुणे*

महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन धुरंधर नेते 'अजितदादा' आणि 'देवाभाऊ' यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्राच्या विकासात दिवंगतपास...
22/07/2025

महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन धुरंधर नेते 'अजितदादा' आणि 'देवाभाऊ' यांचा आज वाढदिवस. महाराष्ट्राच्या विकासात दिवंगतपासून ते आतापर्यंतच्या नेत्यांचे मोठे योगदान आहे. यात या दोन्ही मुरलेले मात्तबर व्यक्तींचे नाव घेतलीच पाहिजे‌. त्यांच्या हातून असेच महाराष्ट्राचा विकास होवो, त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो हीच श्री दत्त चरणी प्रार्थना... #दलेमनन्यूज Ajit Pawar DEVENDRA FADANVIS FOR MAHARASHTRA Maharashtra DGIPR

रम्मीमास्टर..... कृषीमंत्रीकृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून को...
20/07/2025

रम्मीमास्टर..... कृषीमंत्री

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून कोकाटे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. - जितेंद्र आव्हाड यांनी एक्स हँडलवरून पोस्टर शेअर करत लिहिले, 'शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी'. भाजपवाल्यांनी कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केलाय. त्यामुळे यांना काम उरलेले नाही, म्हणून ते रमी खेळत आहे-विजय वडेट्टीवार.

कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ ! राऊत म्हणाले....

शेतकऱ्यांना भेटायला कृषीमंत्र्यांना वेळ नाही

अमित शाहांनी 4-5 मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवलंय

डच्चू देण्यास सुचवलेल्या नावांमध्ये कोकाटेंचं नाव

ऑनलाईन गेमिंग अॅपसंदर्भात छत्तीसगडमध्ये कारवाई झाली

महाराष्ट्रातील मंत्र्यांवर मात्र कारवाई होत नाही

→ ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काही अडचण आहे का?

भविष्यातील घडामोडींकडे फक्त लक्ष ठेवून राहा.

उद्यापासून पावसाळी अधिवेशन21 जुलै म्हणजे उद्यापासून केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर के...
20/07/2025

उद्यापासून पावसाळी अधिवेशन

21 जुलै म्हणजे उद्यापासून केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन 21 ऑगस्टपर्यंत चालेल. या बैठकीत सरकारकडून विविध पक्षांकडून सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अधिवेशनात काय होणार याकडे लक्ष असेल.

#दलेमनन्यूज
पावसाळी अधिवेशनात हे मुद्दे गाजणार

पहलगाम हल्ला

- ऑपरेशन सिंदूर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्धबंदी आणि व्यापाराबाबतचे विधान

- बिहारमध्ये एसआयआरच्या नावाखाली मतदानावर बहिष्कार

परराष्ट्र धोरण, सीमांकन

- देशातील दलित, मागासवर्गीय, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याक गटांवरील अत्याचार.

तुम्हाला महाराष्ट्रात राहण्यासाठी कोणते शहर आवडते ...!!टीप : कोणत्या शहराला नावे (वाईट शब्द) ठेवू नये.. आवडीचे कमेंट करा...
20/07/2025

तुम्हाला महाराष्ट्रात राहण्यासाठी कोणते शहर आवडते ...!!
टीप : कोणत्या शहराला नावे (वाईट शब्द) ठेवू नये.. आवडीचे कमेंट करा
#दलेमनन्यूज

Only women I पद्मशाली सखी संघम; पदाधिकारी निवडीसाठी नावनोंदणीhttps://dhunt.in/11aTqZBy The lemon news via Dailyhunt
19/07/2025

Only women I पद्मशाली सखी संघम; पदाधिकारी निवडीसाठी नावनोंदणी
https://dhunt.in/11aTqZ

By The lemon news via Dailyhunt

'पद्मशाली सखी संघम'च्या २५ - २६ वर्षासाठी 'क्रियाशील पदाधिकारी व...

Solapur | उद्या रविवारी पत्रकारांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रासह मार्गदर्शनhttps://dhunt.in/11aXj9By The lemon news via Dai...
19/07/2025

Solapur | उद्या रविवारी पत्रकारांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रासह मार्गदर्शन
https://dhunt.in/11aXj9

By The lemon news via Dailyhunt

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सामाजिक शास्त्रे संकु...

शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी, साहित्यरत्नलोकशाहीर अण्णाभाऊ साठेयांना पुण्यतिथी निमित्त व...
18/07/2025

शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी, साहित्यरत्न

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

17/07/2025

🤣😂 साडेसाती म्हणजे काय ते नक्की पहा 😊😊

Deepfake Scandal | अर्चिता फुकन... पोर्न स्टार असे काहीच नाही.. एआयचा झालेला गैरप्रकारhttps://dhunt.in/117K8sBy The lemo...
16/07/2025

Deepfake Scandal | अर्चिता फुकन... पोर्न स्टार असे काहीच नाही.. एआयचा झालेला गैरप्रकार
https://dhunt.in/117K8s

By The lemon news via Dailyhunt

गेल्या काही दिवसांपासून अर्चिता फुकन हे नाव सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. इन...

भावपूर्ण श्रद्धांजली! डॉ. दीपक जयंत टिळक यांचे निधन #दलेमनन्यूज           लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आणि 'केसरी...
16/07/2025

भावपूर्ण श्रद्धांजली! डॉ. दीपक जयंत टिळक यांचे निधन
#दलेमनन्यूज
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आणि 'केसरी'चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक जयंत टिळक यांचे आज दुःखद निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आज सकाळी 8 ते 11 वाजताच्या दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when The Lemon News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Lemon News:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share