
07/07/2025
पहिलं प्रेम,पहिला प्रपोज.
(लेखक नितीन चंदनशिवे)
अकरा नंबरची गाडी आली.मी बसमध्ये चढताना सुद्धा तिच्याकडेच एकटक पाहत राहिलो.तिच्या सर्व मैत्रिणी हात हलवून निरोप देत होत्या आणि ती एकदा त्यांच्याकडे आणि एकदा माझ्याकडे पाहत होती.
चार आठ दिवस फोनवर गप्पा झाल्यावर पुण्यातल्या शनिवार वाड्यात रविवारी भेटायचं ठरलं.
अगदी तोच पांढरा शर्ट,पांढरी पॅन्ट, खांद्यावर रुमाल आणि मनाने ठरवलं होतं.आज मनातलं सगळं सांगून मोकळं व्हायचं.हे भाजीपाला विकण्यासारखं सोपं नव्हतं.पण ठरवलं होतं आज डायरेक्ट भिडायचं.मनपाच्या स्टँडवर माझ्या आधी ती येऊन उभी होती.हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातल्यामुळे ती अजून खुलून दिसत होती.तिथून चालत शनिवार वाड्यात प्रवेश करताना का कुणास ठाऊक मी स्वतःला बाजीराव आणि तिला मस्तानी समजत होतो.अर्थात मी बाजीराव होण्याच्या लायकीचा नव्हतो पण ती मात्र मस्तानीपेक्षा काकणभर जास्तच होती.
शनिवार वाडा रविवार असल्यामुळे सगळ्या जोडप्यानी बहरून गेला होता.पाखरं अगदी अंगाला अंग चिकटून बसलेली होती.एका जोडप्याने तर दोघांच्या ही तोंडावर स्कार्प ओढून घेतला होता.आणि तिथल्या तिथंच ते आतल्या आत एकमेकांना पाहत होते.आमची दोघांची नजर तिकडेच आणि मी तिला म्हणालो " स्कार्प नाही आणला का.?" त्यावर ती एकदम कावरी बावरी होऊन माझ्याकडे पाहू लागली.मलाही माझी चूक लक्षात आली आणि दातानेच जीभ चावली.ती म्हणाली मी नाही वापरत तसलं काही.आपण इथं बसूया का म्हणत तिने बसकन मांडली.
दोघांमध्ये जे सामाजिक अंतर असायला हवं तेवढ आम्ही दोघांनीही पाळलं होतं.गप्पा सुरु झाल्या.ती बोलत होती मी एकटक पाहत होतो.अर्धा तास होऊन गेला.दोन चार मुक्तछंद माझेही उधळून झाले होते.मला वेळ घालवायचा नव्हता.मी म्हणलं मला काहीतरी सांगायचं आहे.तेवढ्यात ती म्हणली "भूक लागलीय खूप."आयुष्यात पहिल्यांदा अस वाटलं की जगातील सगळी मिठाई सगळे पदार्थ असं गाड्याभरुन आणावे आणि तिच्यासमोर हजर करावं आणि शनिवार वाड्याच्या मैदानात उभा राहून जोरात ओरडावं,महाराणी केतकी साहिबा काय खाणार आपण यातलं.?(हे पहिल्या प्रेमात होत असतं.अतिशोयक्ती असते पण सत्य असतं हे.)तिचा चेहरा बघितला भानावर आलो आणि म्हणलं काय खाणार?तर ती वेडी डोळे मिचकावत ओठ आतल्या आत मिठत हळूच म्हणली "पाणीपुरी खाऊया."? कल्पनेत आलेल्या सगळया मिठाईच्या गाड्या गायब झाल्या आणि रस्त्याच्या पलीकडे एक मडके घेऊन उभा असलेला पाणीपुरी वाला दिसला.मी त्याच्याकडे नजर टाकत मानेने होकार देऊन चालता झालो आणि ती माझ्या मागे मागे चालू लागली.पाणीपुरी खाताना ती इतकी सुंदर दिसत होत