Hallabol news network

Hallabol news network Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hallabol news network, Media/News Company, Solapur.

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका रस्त्यावरील अपघातानंतर बोलेरो गाडीमध्ये दुचाकी अडकल...
30/12/2024

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका रस्त्यावरील अपघातानंतर बोलेरो गाडीमध्ये दुचाकी अडकली, आणि ड्रायव्हरने ती गाडी थांबविण्याऐवजी चालवत राहिली. या घटनेत गाडीच्या खाली अडकलेल्या दुचाकीमुळे रस्त्यावरून ठिणग्या पडत राहिल्या, आणि हे दृश्य पाहून लोक भयभीत झाले.

काय घडले नेमके?

ही घटना संभल जिल्ह्यातील मुख्य मार्गावर घडली. एका बोलेरो गाडीने दुचाकीला धडक दिली, ज्यामुळे दुचाकी गाडीच्या पुढील भागात अडकून गेली. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असला तरी, ड्रायव्हरने गाडी थांबविण्याऐवजी ती चालवत राहण्याचा प्रयत्न केला. गाडी चालवताना रस्त्यावर ठिणग्या निघत होत्या आणि हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक धावपळ करू लागले.

घटनास्थळी लोकांची प्रतिक्रिया

रस्त्यावर ही घटना घडताना काही लोकांनी मोबाईलवर या घटनेचा व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की बोलेरो गाडी जोराने चालवत असताना दुचाकी अडकलेली आहे आणि ती रस्त्यावरून ठिणग्या निर्माण करत आहे. काही अंतर गेल्यानंतर स्थानिकांनी गाडीला थांबवले आणि पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांची कारवाई

पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून बोलेरो ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीनुसार, ड्रायव्हरने घाईगडबडीत गाडी चालवली आणि अपघातानंतर थांबण्याऐवजी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेत जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या घटनांवरील चिंता

ही घटना लोकांमध्ये रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यावर चिंतेचा विषय बनली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे वाहनचालकांनी जबाबदारीने वाहन चालविण्याची गरज अधोरेखित होते. अपघातानंतर घटनास्थळावर थांबून मदत करणे हा कायद्याचा आणि नैतिकतेचा भाग आहे.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर मोठ्या प्रमाणात लोक प्रतिक्रिया देत आहेत.

https://youtu.be/IofPr-C8F1o?si=jMxYb9YyLkBA3S-3*जाहिरात व बातमीसाठी संपर्क :-* *९८५०६५३५९०**हल्लाबोल न्यूज नेटवर्क सोला...
13/07/2024

https://youtu.be/IofPr-C8F1o?si=jMxYb9YyLkBA3S-3
*जाहिरात व बातमीसाठी संपर्क :-* *९८५०६५३५९०*
*हल्लाबोल न्यूज नेटवर्क सोलापूर*

#हल्लाबोल #न्यूज #नेटवर्क #सोलापूर मराठी. हिंद्दी #हल्लाबोल #न्यूज #नेटवर्क #नईजिंदगी #सोलापूर ...

19/08/2023

💐💐भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐

सोलापूर शहरातील नावाजलेले संपादक व शिवसेना सदस्य म्हणून सामाजीक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे आमचे मित्र इंडीयन टाईम्स न्यूज चॅनेल चे संपादक मोहसीन भाई शेख यांचा दुखःद निधन झाल.

08/05/2023

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कर्नाटक मधील चित्तापूर येथील भाजपचे उमेदवार मणिकांत राठोड यांच्याविरुद्ध पंढरपुर तालुका पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर कड़क कायदेशीर कारवाई कसरण्याची मागणी केली.*

*यावेळी जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्यासह* मा. नगरसेवक हाजी तौफ़ीक हत्तूरे, आरिफ शेख, विनोद भोसले, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड़, प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे, मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे, प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे, जेष्ठ नेते शकील मौलवी, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, उपाध्यक्ष दीनानाथ शेळके, इलियास शेख, अप्पासाहेब सलगर, कुणाल गायकवाड़, सुभाष वाघमारे, शाहु सलगर, यांच्यासह शहर जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

*अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष पदी यशवंत पवार यांची नियुक्ती*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :- पत्रकार ...
26/04/2023

*अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष पदी यशवंत पवार यांची नियुक्ती*

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :- पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, दैनिक तुफान क्रांतीचे विभागीय उप संपादक, साप्ताहिक कार्यसम्राटचे मुख्य संपादक, आक्रमक व अभ्यासू पत्रकार म्हणून, संपूर्ण महाराष्ट्रला परिचित असलेले, सोलापूर येथील निर्भिड पत्रकार, यशवंत पवार यांच्या सदर कार्याची दखल घेऊन, अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे,संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर, राष्ट्रीय अध्यक्ष रमेश इंदूरकर, राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख शेषेराव सोपने मामा यांनी,सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली,

यशवंत पवार हे,गेली अनेक वर्षांपासून राज्यातील,पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडत असून,शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी अहोरात्र काम करत आहेत,यशवंत पवार यांनी राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी,पत्रकार संरक्षण कायदा,जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना,पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी,मारहाण,पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना, घरकुल योजना, यादीवर नसलेल्या वृतपत्राना पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती,राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची,स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी,या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन,उपोषण,निवेदन व पत्रव्यवहार करून,पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात

*पोलिसांचे प्रश्न सरकारी दरबारात मांडणार*

महाराष्ट्र राज्यातील पोलीसांचे प्रश्न तसेच व अडचणी समस्या आपण राज्यसरकारकडे मांडून पोलिसांचे व महिला अधिकारी यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असे माध्यमांशी बोलताना, आवर्जून सांगितले, त्यांच्या पुढील कार्यास पोलीस हक्क संरक्षक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर राष्ट्रीय अध्यक्ष रमेश इंदूरकर राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे राज्य प्रसिद्धी प्रमुख शेषेराव सोपने मामा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

मा.माहिती आयुक्तांच्या आदेशाला पोलिस आयुक्तांनी दाखवले केराची टोपली; डॉ. प्रिटी टिपरे यांनी चुकीच्या खुलासाच्या शेवटी दं...
18/04/2023

मा.माहिती आयुक्तांच्या आदेशाला पोलिस आयुक्तांनी दाखवले केराची टोपली; डॉ. प्रिटी टिपरे यांनी चुकीच्या खुलासाच्या शेवटी

दंडात्मक कारवाई होऊ नये म्हणून क्षमायाचनाची मागणी केली : माधव रेडडी यांनी दिलेल्या माहितीत आणि खुलासात मोठया प्रमाणात तफावत, शितल कुटूंबियांना कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चौकशीला बोलावले नाही, नैसर्गिक न्यायतत्वाचं व मानवी हक्काचं उल्लंघन करुन एकतर्फी व चुकीचा व दिशाभूल करणारा अहवाल सादर करणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री. कमलाकर पाटील यांचे नाव माहिती अधिकारात उघड. संबंधित पोलिसांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाईचा प्रस्ताव गृह विभाग, मंत्रालय, मुंबई (शासनास) सादर करणे व गुन्हे दाखल करणेस निवेदन.*

*सोलापूर :- येथील पोलिस आयुक्तालय यांनी राज्य माहिती आयुक्त, पुणे खंडपीठ, पुणे यांच्या क्र. रामाआ-अपील क्र.९४४/२०२२/सोलापूर दि. २६-१-२०२३ रोजी च्या आदेशाची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी न करता अवहेलना झाल्याने तसेच पोलिस अधिक्षक, पोलीस उप आयुक्त व सहायक पोलीस आयुक्त व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यां विरुध्दच्या विभागीय चौकशी करुन गंभीर स्वरूपाच्या शिक्षा देण्यास मा. गृह विभाग, मंत्रालय (शासन) व मा.पोलीस महासंचालक,मुंबई हे सक्षम प्राधिकारी असल्याने त्यांच्याकडे तात्काळ प्रस्ताव सादर करणे व गुन्हे दाखल करणे व इतर बाबींसाठी दिनेशसिंग शितल यांनी तक्रार अर्ज तथा निवेदन पोलिस आयुक्त यांना प्रत्यक्ष दिले आहे.*

*सदर तक्रार अर्ज तथा निवेदनात राज्य माहिती आयुक्त, पुणे खंडपीठ पुणे यांच्या क्र. रामाआ अपील क्र. ९४४ /२०२२/सोलापूर दि.२६-१-२०२३ रोजीच्या आदेशाची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करणेस तात्काळ आदेश देणे.*

*माहिती आयुक्तांची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी न करता अवमान व अवहेलणा झालेली असल्याने व करणाऱ्या तसेच तत्कालिन जनमाहिती अधिकारी डॉ. टिपरे यांनी चुकीचा व दिशाभूल करणारा खुलासा मा.माहिती आयोगास सादर केले आहे व विद्यमान जनमाहिती अधिकारी श्री.रेडडी यांनी दिलेली माहितीत भरपूर मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने तसेच तत्कालिन व विद्यमान जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-२, सोलापूर शहर डॉ. प्रिती टिपरे व श्री. माधव रेडडी आणि तत्कालिन व विद्यमान, प्रथम अपिलीय अधिकारी तथा पोलीस उप आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर डॉ. वैशाली कडुकर, विजय कबाडे तसेच तत्कालिन व विद्यमान सहाय्यक जनमाहिती अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स.ब.पो.स्टे. सोलापूर शहर श्री. कमलाकर पाटील व श्री.राघवेंद्रसिंग क्षीरसागर व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कटकारस्थान रचून भारतीय राज्य घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकार केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ पासून वंचित ठेवणारे दप्तर दिरंगाई कायदा २००५ आणि महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९८९ मधील तरतूदीचे तसेच शासनाने पारित केलेले परिपत्रकाचं उल्लघंन, भंग व पायमल्ली करुन कर्तव्यात कसूर केलेली आहे. हि बाब सिध्द होत असल्याने.संबंधित कर्तव्यात कसुर करणाऱ्या पोलिस अधिकान्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ८ प्रमाणे आणि अखिल भारतीय सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६८ च्या नियम व महाराष्ट्र पोलीस नियमावली १९५१ व महाराष्ट्र पोलीस (शिक्षा व अपिल १९५६) संबधित नियमानुसार शिस्तभंगाची तथा विभागीय चौकशी करणे व निपक्षपातीपणे सखोल चौकशी करणे कामी मा. सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई (शासनास) तात्काळ प्रस्ताव सादरकरणे.*

*संबधित पोलिस अधिकाऱ्यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता १५४ १९७ अन्वर्य भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १२० बी, १६६, १६६A, १६७, १७५, १७६, १८८, १९३, १९५अ, १९७,२००, २०१,२१७, ४२०, ४६८, ४७१,५०६ व मकोका, टाडा, लाप्रअ तसेच इतर लागू असणारे सर्व फौजदारी स्वरुपाचे कायद्यान्वर्य संबधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करणेस वरिष्ठ पोलिस निरिक्षक किंवा ठाणे अंमलदार सदर बझार पोलिस स्टेशन, सोलापूर यांना आदेश देणे*

*दिनेशसिंग शितल* ✍️✍️
*मो.नं.८०५५६०६४०४*

26/03/2023

सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांची भाजपवर घाणाघाती टीका*

मुद्दा OBC चा नाही काहीही करून राहुलजी गांधी यांना थांबवायचे आहे, लोकशाही संपवून हुकुमशाही आणायची आहे, भाजपची सत्ता जनताच उलथवुन टाकेल.*

24/03/2023

काँग्रेसने इंग्रजांना घालवले, भाजपला ही सत्तेवरुन घालवेल :- चेतन नरोटे

आपल्या देशात चोराला चोर म्हणणं अवघड झालंय आता. अजुन किती अच्छे दिन पाहिजेत.*

राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या मोदी सरकारच्या निषेधार्थ, सोलापुर शहर काँग्रेसचे आंदोलन*

दिनांक :- २४ मार्च २०२३
सोलापूर प्रतिनिधी
केंद्रातील मोदी सरकारने राहुलजी गांधी यांची लोकसभा सदस्यता रद्द करण्यात केली. या मोदी सरकारच्या हुकुमशाहीच्या विरोधात, आणि राहुलजी गांधी यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन गेट समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.

यावेळी मोदी सरकारच्या विरोधात, राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, चौकीदार चोर है, पहले लढे थे गोरो से अब लड़ेंगे चोरों से, मोदी अदानी भाई भाई देश बेच के मलाई खाई, मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी, मोदी तेरी तानाशाही नही चलेगी, राहुलजी गांधी तुम संघर्ष करो, जो सरकार निक्कमी है वो सरकार बदलनी है, भाजपा हटाओ देश बचाओ अश्या जोरजोरात घोषणाबाजीमुळे परिसर दणाणुन गेला.

यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, अनेक भाजपा नेते महापुरुषांबद्दल, काँग्रेस नेत्यांबद्दल, अपशब्द वापरले असताना सुद्धा आजपर्यंत एकालाही शिक्षा झाली नाही. पण मोदी नावाने अपशब्द वापरले म्हणून काल गुजरात मधील कोर्टाने राहुलजी गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा केली होती आणि अपील करण्यासाठी एक महिन्याची मुदत ही दिली होती असे असताना सुद्धा आज रोजी पंतप्रधान मोदींच्या दबावामुळे लोकसभा अध्यक्षामार्फ़त सचिवालयाकड़ून त्यांची खासदारकी रद्द केली मोदी सरकारच्या या हुकुमशाही निर्णयाविरुद्ध सोलापुरसह देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि जनता आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली आहे. काँग्रेस नेते राहुलजी गांधी भारत जोडोच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद करत आहेत आणि मोदी सरकारच्या भोंगळ, भ्रष्टाचारी, तुघलकी, हुकुमशाही कारभाराराचा फर्दाफ़ाश करत आहेत तसेच मोदी आणि जनतेचे लाखो कोटि पैसा बुड़विणाऱ्या उद्योगपती अदानीच्या संबंध उघड़ केला. यामुळे मोदी सरकार घाबरून गेली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता जाईल म्हणून घाबरून गेली आहे. त्यामुळे राहुलजी गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. या देशात मोदी सरकार आल्यापासुन अनेक मोदी नावाचे व इतर उद्योगपती जनतेचा लाखो कोटी पैसा लुटून परदेशी पळून गेले आहेत, तसेच गुंड बलात्कारी, भ्रष्टाचारी आरोपी उजळ माथ्याने वावरत असताना आपल्या देशात चोराला चोर म्हटले तर शिक्षा होत आहे म्हणून देशभरात जनतेत असंतोष पसरला असून राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारच्या या हिटलरशाही वृती हुक़ूमशाही कारभाराविरुद्ध जनता पेटून उठेल आणि एक नवी क्रांती घडेल काँग्रेस पक्षाने चले जाव म्हणत इंग्रजांना घालवले या मोदी सरकारला ही घालवेल असे म्हणाले.

या आंदोलनात जेष्ठ नगरसेवक मा. बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, शिवा बाटलीवाला, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, माजी महापौर सुशीलाताई आबूटे, आरिफ शेख, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, नरसिंह आसादे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, अंबादास बाबा करगुळे, भीमाशंकर टेकाळे, अँड केशव इंगळे, NK क्षीरसागर, शकील मौलवी, अशोक कलशेट्टी, अंबादास गुत्तिकोंडा, विश्वनाथ साबळे, वाहिद बिजापुरे, हसीब नदाफ, हारून शेख, जेम्स जंगम, सिद्राम अट्ठेलुर, तिरुपती परकीपंडला, गणेश सालुंखे, नागनाथ कदम, सिद्धराम चाकोते, रफ़ीक चकोले, राजन परदेशी, प्रवीण जाधव, विश्वराज चाकोते, अप्पासाहेब बगले, VD गायकवाड, एजाज बागवान, युवराज जाधव, चक्रपाणी गज्जम, प्रवीण वाले, दीनानाथ शेळके, विवेक कन्ना, नासीर बंगाली, मल्लीनाथ सोलापुरे, कुणाल गायकवाड, शिवशंकर अंजनाळकर, नूर अहमद नालवार, सुमन जाधव, अंजली मंगोडेकर, शोभा बोबे, प्रमिला तुपलवंडे, लता गुंडला, संध्या काळे, चंद्रकांत टिकके, राजाभाऊ महाडिक, सुभाष वाघमारे, श्रीनिवास पोटाबत्ती, विवेक इंगळे, महेंद्र शिंदे, आदित्य म्हमाने, धर्मराज गुंडे, इरफान शेख, जितराज गरुड़, शोहेब कडेचुर, वसिष्ठ सोनकांबले, श्रीशैल रणदिवे, अप्पाजी गायकवाड, मुमताज तांबोळी, मुमताज शेख, दुर्योधन मस्के, अप्पासाहेब सलगर, प्राजक्ता घाटे, अनिता भालेराव, आशुतोष वाले, अजिंक्य पाटिल, मनोहर चकोलेकर, रेखा बिनेकर, सुनीता बेरा, सैफन मकानदार, मीना गायकवाड, अकबर शेख, इब्राहिम कलबुर्गी, लता सोनकांबले, शकूर शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

02/03/2023

गॅस दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या स्मृती ईरानी आज सत्तेत असल्यावर शांत का ? मोदींनी दरवाढ केलेल्या गॅस सिलेंडरचा बाराशेचा दर ऐकून वेड्याच झाले असत्या : चेतन नरोटे*

*कुठे गेल्या स्मृती ईरानी म्हणत, गॅस दरवाढी विरोधात स्मृती ईरानींचे मास्क घालुन सोलापुर शहर काँग्रेसचे निदर्शने आंदोलन*

केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपये व व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३५० रुपये असा प्रचंड दरवाढ केली याच्या निषेधार्थ सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापुर येथे स्मृती ईरानी यांचे मास्क घालुन कुठे गेल्या स्मृती ईरानी, आज त्याच स्मृती ईरानी असत्या तर बाराशे दर ऐकून वेड्याच झाले असत्या म्हणत निर्दर्शने आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रतीकात्मक स्वरुपात महिलांनी काँग्रेसच्या काळात गॅस सिलेंडरचे दर तीनशे रुपये असताना रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या स्मृती ईरानींचे मास्क घालुन, आज त्याच पूर्वीच्या स्मृती ईरानी असत्या तर मोदींनी दरवाढ केलेल्या गॅस सिलेंडरचा बाराशेचा दर ऐकुन वेडे होऊन नाचले असते असे प्रतीकात्मक पथनाटय सादर केले आणि मोदी सरकारच्या विरोधात गॅस सिलेंडरचे दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, अब की बार पाकिटमार सरकार, भाग गई रे भाग गई स्मृती ईरानी भाग गई, चौकीदार चोर है अदानी का यार है, गॅस दरवाढ करून अदानीची नुकसान भरपाई करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, दरवाढ कमी झालेच पाहिजे, अश्या जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणानुन गेला.

यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने आधीच प्रचंड महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला आज एक जबरदस्त झटका दिला. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपये व व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३५० रुपये असा प्रचंड दरवाढ करुन देशातील जनतेच्या खिश्यावर दारोडा टाकला आहे. आपल्या उद्योगपती अदानी आणि इतरांचे लाखो कोटी कर्जे माफ करून त्यांची वसूली गॅस, पेट्रोल, डीझेल, महागाई करून देशातील जनतेकडुन वसुल करत आहे. तसेच उद्योगपती अदानीचे झालेल्या नुकसानीचे भरपाई दरवाढ करून करत आहेत. जनतेला पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ या मोदी सरकारने आणली आहे. म्हणून आज रोजी गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात, महागाई विरोधात, जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी, भाजपा आणि स्मृती ईरानी यांनी काँग्रेसच्या काळात केलेल्या आंदोलनाची आठवण करुण देण्यासाठी, गॅस सिलेंडरचे दरवाढ मागे घेण्यात यावी या मागणीसाठी भाजपा नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांचे मुखवटे घालुन निदर्शने आंदोलन केले.

यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, मा. नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, भीमाशंकर टेकाळे, वाहिद बिजापुरे, नागनाथ कदम, महेश लोंढे, बसवराज म्हेत्रे, प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, तिरुपती परकीपंडला, अप्पासाहेब बगले, हारून शेख, भोजराज पवार, नागनाथ कासलोलकर, सोहेब महागामी, नूर अहमद नालवार, संजय गायकवाड, वसिष्ठ सोनकांबले, सुमन जाधव, अरुणा वर्मा, प्रमिला तुपलवंडे, कमरुनिस्सा बागवान, दशरथ गायकवाड, कुणाल गायकवाड, विवेक कन्ना, लखन गायकवाड, इलियास शेख, शकील शेख, बाबुराव क्षीरसागर, माउली जाधव, अंजली मंगोडेकर, शोभा बोबे,शिल्पा चांदने, मुमताज तांबोली, संघमित्रा चौधरी, नागनाथ शावने, मुन्ना वळसंगकर, सुभाष वाघमारे, विवेक इंगळे, VD गायकवाड, चक्रपाणी गज्जम, दीनानाथ शेळके, अनवर शेख, चेतम गोयल, विकास येलेगावकर, नागेश बोमडयाल, रेखा बिनेकर, मनीषा भोसले, प्राजक्ता घाटे, लता सोनकांबले, श्रीकांत दासरी, सुनीता बेरा, चंदू नाईक, शशिकांत शेळके, धीरज खंदारे, बबलु जाधव, महेंद्र शिंदे, आदित्य म्हणाने, किरण राठोड, मनोहर चकोले, सविता सोनवणे, अर्चना गायकवाड़, नीता बनसोडे, चंदा काळे, प्रमिल्स गायकवाड, मुमताज शेख, चंद्रकला निज्मल्लू यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

वस्तु व सेवाकर (जी. एस. टी.) कर चुकवणार्‍या व्यापार्‍यांवर कडक कारवाई करा -  राष्ट्रीय महास्वराज्य भूमी पार्टीची मागणीप्...
13/02/2023

वस्तु व सेवाकर (जी. एस. टी.) कर चुकवणार्‍या व्यापार्‍यांवर कडक कारवाई करा -

राष्ट्रीय महास्वराज्य भूमी पार्टीची मागणी
प्रदेश अध्यक्ष राजेश राऊळ यांच्या नेत्तृत्वाखाली दिले वस्तु व सेवाकर आयुक्तांना निवेदन
सोलापूर (प्रतिनिधी) ः नुकतेच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला

आहे. संपूर्ण भारतात करदात्यांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात जी. एस. टी. कर भरणारी प्रणाली विकसित झाल्याची दिसून येते. जी. एस. टी. करदाते हे भारताच्या अर्थसंकल्पात पहिल्या क्रमांकावर आहेत ही बाब अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे ही कर प्रणाली इतक्या ताकदीने व योग्य रितीने राबविली जाते की, त्यामुळे कुठल्याही व्यापार्‍याला कोणताही गैरप्रकार करता येत नाही. पण शासनाच्या कायद्याची अंमलबजावणी करुन, कर भरणार्‍यांपेक्षा पळवाट करणारी व्यापारी मंडळी जास्त असते. त्याचा पळवाट काढणारा वर्ग हा फार मोठा आहे. आज ही अनेक व्यवसायिक आपले कर वाचविण्यासाठी जी. एस. टी. बिले न देता न घेता व्यवहार करतात. यामुळे काळा पैसा व अवैध मार्गाने वस्तुंचे अवागमन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण व आपली यंत्रणा सक्षम तर आहेच याबद्दल शंकाच नाही पण लोक या बाबत सुध्दा पळवाट काढतांना दिसत आहेत विशेषत 20 लाखापर्यंत जी. एस. टी. कर न भरण्याची सुट आहे असे समजून बरेच व्यापारी आपला व्यवसाय 20 लाखाच्या आतच आहे असे दाखवतात. आता त्याची व्याप्त केंद्र शासनाने 40 लाखापर्यंत केली आहे. मुळात ही गोष्ट चुकीची आहे कारण कंपनीकडून येणारे प्रत्येक उत्पादन हे जी. एस. टी. सह येते त्यामुळे संबंधीत व्यापार्‍याला सुध्दा जी. एस. टी. भरुन व त्याचा परतावा (रिफंड) घेता येऊ शकते पण बरेच व्यापारी असे करतांना दिसत नाहीत. फक्त नियमापुरते व हिशोबा पुरते बिले करणे, व्यवसाय न दाखविणे असे अनेक प्रकार होतांना दिसत आहेत.

विशेषतः लोखंड, पत्रा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल्स, पेपर, मोबाईल स्पेअर पार्टस, स्टेशनरी, रेडीमेड आदी अनेक व्यवसायात हा प्रकार दिसून येत आहे. अशा लोकांवर कडक कारवाई व्हावी, सर्वसामान्य लोकांमध्ये सामाजिक प्रबोधन व जाहिरीती करुन एखादे प्रबोधनात्मक मार्गदर्शन शिबीर भरवून मार्गदर्शन द्यावे. त्यामुळे कर चुकवेगीर थांबेल. त्यास आळा बसेल. त्याउपर एखादा व्यापारी ही प्रणाली समजून सुध्दा अशी चुक करत असेल त्यास कायद्याचा बडगा दाखवून त्यावर कडक कारवाई करावी अन्यथा देशाच्या इतक्या मोठ्या अर्थसंकल्पातून देशप्रगतीस घातक वळण लागेल. प्रामाणिक माणसे सुध्दा कर भरणार नाहीत

अशा आशयाचे निवेदन वस्तु व सेवा कर प्रभारी आयुक्त श्री. गणेश मिसाळ यांना देण्यात आले. हे निवेदन राष्ट्रीय महास्वराज्य भूमी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष राजेश राऊळ यांच्या नेत्तृत्वाखाली देण्यात आले. यावेळी जनक्रांती पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद जगताप, राष्ट्रीय महास्वराज्य भूमी पार्टीचे युवक प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, राष्ट्रीय महास्वराज्य भूमी पार्टीचे वाहुतक जिल्हा अध्यक्ष महिबुब कादरी, जिल्हा संघटक अन्वरअली शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

13/02/2023

हातात हात" घालुन सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकत्र, सकारात्मक चर्चा, महाविकास आघाडीच्या वतीने एकजुटीने भाजपच्या धोरणाविरुद्ध मिळून लढु*

सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या भेटीला राष्ट्रवादी नेतेमंडळी जनवात्सल्य वर, चाय पे चर्चेने दोन्ही पक्षातील गोडवा वाढला.*

दिनांक :- १३ फेब्रूवारी २०२३

आज रोजी सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी हॉटेल लोटस येथे एकत्रित बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली. यापुढे कोणताही वाद न वाढविता दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी "हातात हात घालुन" महाविकास आघाडीच्या वतीने भाजपच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी जनवात्सल्य निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन चाय पे चर्चा करत दोन्ही पक्षातील गोडवा वाढविला

यावेळी सोलापुर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, मा. नगरसेवक आरिफ शेख, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, राष्ट्रवादीचे नेते मंडळी शंकर पाटील, शफी इनामदार, जनार्दन कारमपुरी, तौफीक शेख, प्रमोद गायकवाड, जुबेर बागवान, अँड केशव इंगळे, शकील मौलवी, तिरुपती परकीपंडला, सुशील बंदपट्टे, श्रीकांत वाडेकर, शरद गुमटे, सुनील सारंगी यांच्यासह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Address

Solapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hallabol news network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hallabol news network:

Share