Wajir News

Wajir News Day to day activities from Pune & Maharashtra ! Interesting facts & knowledge & Entertaining content all around
Jay Maharashtra !

Note :- Content we are posting is only & purely for entertainment purpose.

12/08/2025

नमस्कार !

मी किशोर कदम. गेली तीस पस्तीस वर्ष प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळख आहे आणि या दोन्ही क्षेत्रात मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते ,मंत्री ,मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचे आवाहन करीत आहे.

मेजॉरिटीच्या नावा खाली मी राहात असलेल्या सोसायटीमध्ये,रीडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहाती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे. कमिटी मेम्बर्सनी काही महत्वाची कागदपत्र , अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चाकाला सारख्या अत्यंत प्राईम विभागात 33(11) आणि 33(12)B या DCPR खाली आमची इमारत SRA/स्लम डेव्हेलपमेंट खाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे कालच आमच्या लक्षात आले आहे.

कमिटी चौकस नसेल , सोसायटी सभासदांच्या हिताचे पाहत नसेल , PMC आणि बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल तर सामान्य माणसांची राहती घरे एखाद्या ट्रान्झिट कॅम्प सारखी होण्याच्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे आमची (अंधेरी हवा मेहेल सोसायटी चाकाला मुंबई 400093) सोसायटी आहे.

मुर्खांच्या मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. सरकारने मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत , कायद्याला धरून आवाज उठवतात , अन्याया विरोधात कायद्याने लढतात त्यांचा आवाजच एका अर्थाने बंद केला आहे. मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्ख लोक स्वतःच्याच पायांवर धोंडे पाडून घेतात आणि हे त्यांच्या कसे लक्षातही येत नाही याचे उदाहरण म्हणजे आमची ही सोसायटी आहे.

एखादा सभासद जर चौकस असेल , कायद्याला धरून प्रश्न विचारत असेल आणि कमिटी मेम्बर्सला जर त्याच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील , कमिटी मेम्बर्स स्वतः काही अभ्यास न करता पँक आणि बिल्डरवर जर आंधळा विश्वास ठेऊन काम करत असतील तर त्या एका मेम्बरला गाळून वेगळा WTSAP ग्रुप स्थापन करून त्या एका मेम्बरला मुंबई सारख्या शहरात चक्क
बायकॉट केले जाते , त्याच्या पासून सगळी महत्वाची माहिती लपवली जाते , त्याच्या विरुद्ध सर्व सभासदांना भरवले जाते आणि तो सभासद रिडेव्हल्पमेंटच्या विरोधात आहे असे भासवले जाते ,त्याला एकटे पाडले जाते. ही एका प्रकारची शहरी एट्रोसिटीच असते ज्या साठी कायद्यातही काहीच तरतूद नसते ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.मुंबई सारख्या व इतर कोठेही असे सगळे घोळ झाल्या नंतर PMC आणि बिल्डर यांच्या प्रचंड आर्थिक ताकदी समोर मग वर्षानुवर्षे सामान्य माणसाला हतबलपणे लढत बसावे लागते. अशा कितीतरी केसेस आज मुंबई शहरात प्रलंबित आहेत.

या गंभीर समस्येकडे शासनाला तातडीने लक्ष घालण्याची कळकळीची विनंती ,मी सर्व सामान्य माणसांतर्फे करीत आहे करीत आहे.

मी महाराष्ट्राचे मुख्यममंत्री फडणवीसजी , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी , तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन करीत आहे.

किशोर कदम.
कवी सौमित्र.

       #कमवावशिका  #पुणे
08/08/2025

#कमवावशिका #पुणे

प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत  'अंधेरा' या हॉरर जॉनरमध्ये साकारणार दमदार भूमिका!मराठीसह हिंदी चित्रप...
08/08/2025

प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत
'अंधेरा' या हॉरर जॉनरमध्ये साकारणार दमदार भूमिका!

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी, अभिनयाच्या विविध छटांमध्ये रसिकांची मनं जिंकणारी प्रिया बापट आता एका नव्या आणि थरारक अविष्कारात दिसणार आहे. अमेझॉन प्राईमवर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अंधेरा’ या हॉरर सिरीजमध्ये ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या सिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये एकाच वेळी भीती आणि उत्सुकता निर्माण केली आहे. या सिरीजमधून प्रियाने हॉरर जॉनरमध्ये पदार्पण केले असून यात ती पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे.

या अनुभवाबद्दल प्रिया बापट म्हणते, ''मी पहिल्यांदाच हॉरर जॉनरमध्ये काम करतेय आणि हा अनुभव खरोखरच वेगळा ठरला. खूप नाईट शिफ्ट्समध्ये शूटिंग केलं, परंतु स्क्रिप्ट इतकी इंटरेस्टिंग होती की, काम करताना काहीच जाणवले नाही. जेव्हा हे स्क्रिप्ट मला मिळालं, तेव्हा वाचून एकच विचार मनात आला, तो म्हणजे सध्या वाचलेल्या स्क्रिप्ट्सपैकी हे सर्वात उत्तम होतं. ही कथा फार वेगवेगळ्या पद्धतीने उलगडते आणि म्हणूनच ती अभिनयाच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक ठरली. यात अ‍ॅक्शन सिक्वेन्सेस आहेत, भीतीदायक हॉरर सीन आहेत. त्यामुळे कलाकार म्हणून ही भूमिका करताना एक वेगळीच मजा आली. आतापर्यंत मी राजकारणी, वकील यांसारख्या विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, या सिरीजमध्ये मी एका पूर्णतः वेगळ्या प्रोफेशनमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठीत मला जसं प्रेम मिळालं, तसंच प्रेम मला हिंदी प्रोजेक्ट्ससाठीही मिळालं, याचा खूप आनंद आहे. आता हॉरर जॉनरमधून मी प्रेक्षकांचं मन कसं जिंकू शकेन, याचीच उत्सुकता लागली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा प्रतिसाद बघायला मी प्रचंड उत्सुक आहे. आशा आहे, प्रेक्षक या भूमिकेलाही तितकंच प्रेम देतील.''

‘अंधेरा’चं ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कथानक काय आहे? हे रहस्य नेमकं कुठं घेऊन जाणार आहे? मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत, परंतु तोपर्यंत ‘अंधेरा’ची ही थरारक झलक आणि प्रिया बापटचं हॉरर शैलीतील पदार्पण यामुळे ही सिरीज चर्चेचा विषय ठरली आहे.

07/08/2025

ठाण्यातील ताई.. लै भारी!! ठाण्यातील विवियाना मॉल समोरील रोडवर या ताई स्वयंरोजगारासोबत मराठीचाही प्रचार करत आहेत. त्या सर...
07/08/2025

ठाण्यातील ताई.. लै भारी!!
ठाण्यातील विवियाना मॉल समोरील रोडवर या ताई स्वयंरोजगारासोबत मराठीचाही प्रचार करत आहेत. त्या सर्व ग्राहकांशी मराठीतच बोलतात.
अत्यंत कौतुकास्पद!!
#अभिजातमराठी

आता रशियानेही भारताच्या बाजूने भुमिका घेतली असून त्यांनी भारताला धमक्या देऊ नये असे अमेरिकेला ठणकावले आहे.
06/08/2025

आता रशियानेही भारताच्या बाजूने भुमिका घेतली असून त्यांनी भारताला धमक्या देऊ नये असे अमेरिकेला ठणकावले आहे.

भाजपशी कनेक्शन असणाऱ्या आरती साठे मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी !
06/08/2025

भाजपशी कनेक्शन असणाऱ्या आरती साठे मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी !

"भाषेच्या ज्ञानामुळे मला यश मिळालं." पण  काही लोक मुंबईत 20 वर्ष राहूनही मराठी शिकत नाहीत, हे मला अजूनही आश्चर्य वाटतं!"...
06/08/2025

"भाषेच्या ज्ञानामुळे मला यश मिळालं." पण काही लोक मुंबईत 20 वर्ष राहूनही मराठी शिकत नाहीत, हे मला अजूनही आश्चर्य वाटतं!"
- तमन्ना भाटिया.

गणेशोत्सव आनंदाने तसेच धार्मिक भावना न दुखावता आणि राजकारण न करता साजरा करावा एवढीच जनभावना आहे. अमुक मंडळाचा बाप्पा मोठ...
06/08/2025

गणेशोत्सव आनंदाने तसेच धार्मिक भावना न दुखावता आणि राजकारण न करता साजरा करावा एवढीच जनभावना आहे. अमुक मंडळाचा बाप्पा मोठा तमुक मंडळांचा बाप्पा लहान असं होत नाही,बाप्पा हा लहान मोठा नसतोच..परंतु मानाची पहिली पाच मंडळे आपली १०० वर्षांहून अधिकची परंपरा टिकवून आहेत..त्या परंपरेच्या आड आपण न येता तसेच त्यांनीही एक पाऊल मागे येऊन एकाहून जास्त वाद्यपथकं न लावता गणेशोत्सव साजरा केला पाहिजे.
मुळात हा धार्मिकतेचा विषय आहे,ईतर जी मंडळे आक्षेप घेत आहेत ती स्वत: मोठमोठाले डीजे लावून अश्लील गाण्यांवर बिभत्स नृत्यं करत गणपती विसर्जन करतात, यात भावना दुखावल्या पाहिजेत.
कोणतेही वादविवाद न करता,राजकारण न करता उत्सव साजरा झाला पाहिजे यात काही शंका नाही.

दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यासाठी आज (6 ऑगस्ट) जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. कबुतरखान्यावरील ताडप...
06/08/2025

दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यासाठी आज (6 ऑगस्ट) जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन समाजाकडून काढण्यात आली. अनेक महिलांनी कबुतरखान्यात घुसून ताडपत्री बांधलेली काढली. तसेच कबुतरखान्यावर बांधण्यात आलेले बांबू देखील महिलांकडून हटवण्यात आले. दरम्यान, कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या परिसरात वेगाने आजार पसरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घातली होती.

'मराठीत बोलले ना.. ज्याला समजायचं आहे त्याला समजेल..', पत्रकारांना हिंदीत उत्तर द्यायला काजोलचा स्पष्ट नकार ! मराठीमध्ये...
06/08/2025

'मराठीत बोलले ना.. ज्याला समजायचं आहे त्याला समजेल..', पत्रकारांना हिंदीत उत्तर द्यायला काजोलचा स्पष्ट नकार ! मराठीमध्ये साधला पत्रकारांशी संवाद!
नुकताच महाराष्ट्र शासनाचा राज कपूर पुरस्कार काजोल ला प्रदान करण्यात आला.

*हा चेहरा नेमका कोणाचा?**‘दशावतार’च्या गूढ पोस्टरमागे दडलेलं रहस्य १२ सप्टेंबरला उलगडणार!*‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ओशन...
06/08/2025

*हा चेहरा नेमका कोणाचा?*
*‘दशावतार’च्या गूढ पोस्टरमागे दडलेलं रहस्य १२ सप्टेंबरला उलगडणार!*

‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. काळसर रंगाचे रंगवलेले रौद्र रूप, लालसर डोळे आणि विलक्षण कटाक्ष, या सगळ्यातून चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणारी याची उत्कंठा अधिकच वाढते आहे.

सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित ‘दशावतार’ हा चित्रपट कोकणातील प्राचीन दशावतारी परंपरा आणि रहस्यमय पार्श्वभूमी यांचं मिश्रण आहे. पोस्टरमधील चेहरा प्रेक्षकांना अस्वस्थ करतोय, मात्र त्याचवेळी उत्सुकता देखील निर्माण करतोय. हे दिलीप प्रभावळकरच आहेत का? असा प्रश्न पडतो आहे आणि ते नेमके या रुपात काय करणार आहेत याचे कुतूहल निर्माण करत आहे.

सध्या केवळ चेहऱ्याची एक झलक समोर आली असून त्यामागचं खरं रूप, त्याचा संदर्भ आणि कथा अजूनही गूढतेच्या पडद्यात दडलेली आहे.
पोस्टर वरुन दिलीप प्रभावळकर यांची ही वेगळीच भूमिका असणार, याचा अंदाज येतोय पण नेमकी ही भूमिका काय असेल याची उत्कंठा आता अधिकाधिक वाढतेय. अर्थातच हे रहस्य १२ सप्टेंबरला रुपेरी पडद्यावरच उलगडेल.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wajir News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wajir News:

Share