Vivek saptahik - साप्ताहिक विवेक

  • Home
  • Vivek saptahik - साप्ताहिक विवेक

Vivek saptahik - साप्ताहिक विवेक प्रखर राष्ट्रवाद व सामाजिक समरसतेचा विचार घेऊन ७५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले एकमेव साप्ताहिक!

नमस्कार,
प्रखर राष्ट्रवाद आणि सामाजिक समरसतेला केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक 'विवेक' गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ अखंडपणे कार्यरत आहे. आपणा सर्व वाचक, दर्शक, वर्गणीदार, हितचिंतकांच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर विवेक ही वाटचाल सुरू आहे. या ७० वर्षांच्या काळात साप्ताहिक विवेकच्या बरोबरीनेच हिंदी विवेक, शिक्षण विवेक, वैद्यराज, PARC (Policy Advocacy Research Centre), विवेक विचार मंच असे अनेक आयाम राष

्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवून 'विवेक समूहा'त जोडले गेले.

अशाप्रकारे महाराष्ट्र राज्यात तसेच राष्ट्रीय स्तरावरही प्रसारमाध्यम क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या 'विवेक'ने काळाची गरज ओळखून नव्या 'स्मार्ट' माध्यमांमध्येही पदार्पण करत ठाम व आश्वासक वाटचाल सुरू केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रखर राष्ट्रवादाचा विचार अधिकाधिक वाचक-दर्शकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही अखंडपणे कार्यरत आहोत. या वाटचालीला आपणासारख्या राष्ट्रवादाशी व सामाजिक समरसतेशी बांधिलकी असलेल्या, जागरूक व कृतीशील कार्यकर्त्यांच्या अधिकाधिक पाठबळाची आवश्यकता आहे. तेव्हा साप्ताहिक विवेकच्या सोशल मीडियावरील विचारयात्रेत डिजीटली सहभागी व्हा..!! Website : www.evivek.com
Facebook : https://www.facebook.com/Viveksaptahik/
Youtube : https://youtube.com/c/Viveksaptahik
Twitter : https://twitter.com/viveksaptahik?s=09
Instagram : https://instagram.com/viveksaptahik?utm_medium=copy_link

10/08/2025

केदारनाथ मंदिराशी आहे पांडवांचा संबंध...

09/08/2025

राजा मांधताच्या तपश्चर्येतून निर्माण झाले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग

मूलनिवासी दिवसाचे भारतात औचित्यच काय? @महेश काळे भारतात राहणारे आपण सर्व भले कुठल्या जाती-पंथाचे वा धर्माचे असू, पण आपण ...
09/08/2025

मूलनिवासी दिवसाचे भारतात औचित्यच काय?
@महेश काळे
भारतात राहणारे आपण सर्व भले कुठल्या जाती-पंथाचे वा धर्माचे असू, पण आपण सारे जण या देशाचे ‘मूलनिवासी‘ आहोत, एकाच गौरवशाली परंपरेचे, संस्कृतीचे घटक आहोत आणि मुख्य म्हणजे ‘आपण सारे भारतीय आहोत’. जगाच्या इतिहासात घडलेल्या मूलनिवासींवरील अन्यायाबाबत आपण सहवेदना व्यक्त करू शकतो किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगू शकतो, पण भारताचा या मूलनिवासी दिवसाशी कुठलाही संदर्भच नसताना भारतात हा दिवस स्वतःवर लादून घेण्याचे कुठलेही औचित्य दिसत नाही.
https://www.evivek.com/Encyc/2025/8/8/what-is-the-relevance-of-indigenous-peoples-day-in-india.html
#मूलनिवासी

भारतात राहणारे आपण सर्व भले कुठल्या जाती-पंथाचे वा धर्माचे असू, पण आपण सारे जण या देशाचे ‘मूलनिवासी‘ आहोत, एकाच गौ.....

08/08/2025

'खालिद का शिवाजी'
इतिहासाची मोडतोड म्हणजे फेक नरेटीव्हचा प्रकार आहे..
लिंक कमेंटमध्ये

08/08/2025

खालिद का शिवाजी - इतिहासाचे विद्रुपीकरण
खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनेक चुकीचे दावे करण्यात आले आहेत. इतिहासाची मोडतोड म्हणजे फेक नरेटीव्हचा प्रकार आहे.. हे दावे कसे चुकीचे आहेत याविषयी इतिहास अभ्यासक आणि व्याख्याते निलेश भिसे यांच्याशी केलेली चर्चा..

मालेगावचा निर्णय...भगव्या दहशतवादाच्या कपटाचे विसर्जन@ अभिजित जोग नांदेड येथील वर्कशॉपमध्ये झालेला स्फोट, समझौता एक्सप्र...
08/08/2025

मालेगावचा निर्णय...भगव्या दहशतवादाच्या कपटाचे विसर्जन
@ अभिजित जोग
नांदेड येथील वर्कशॉपमध्ये झालेला स्फोट, समझौता एक्सप्रेसमधील स्फोट व मालेगाव स्फोट या प्रत्येक स्फोटातील आरोपीची कहाणी थोड्याफार फरकाने एकच आहे, भगव्याचा टोकाचा द्वेष हाच या सगळ्या घटनांना जोडणारा दुवा होता. हिंदू दहशतवादाचा आरोप सिद्ध होईल अशी जबानी देण्याची जबरदस्ती झाल्याचा आरोप फक्त या प्रकरणातील आरोपींनीच केला असे नाही तर काही तपास अधिकार्‍यांनीही याला दुजोरा दिला आहे. आता हे सगळे आरोपी निर्दोष सुटले म्हणजे न्याय झाला असे नाही. भगव्या दहशतवादाचा खोटा बागुलबुवा उभा करून निर्दोष देशभक्तांना नरकयातना भोगायला लावणार्‍या प्रत्येकाला कायद्यासमोर आणून शिक्षा ठोठावल्याशिवाय खरा न्याय झाला असे म्हणता येणार नाही.
https://www.evivek.com/Encyc/2025/8/8/malegaon-bomb-blast-2008.html

नांदेड येथील वर्कशॉपमध्ये झालेला स्फोट, समझौता एक्सप्रेसमधील स्फोट व मालेगाव स्फोट या प्रत्येक स्फोटातील आरोपी...

08/08/2025

महाकालेश्वर: एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग
महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतल्याने मनातील अज्ञात भीती दूर होते.. काय आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा...

07/08/2025

सध्या कबूतर खूप चर्चेत आहेत.. मुंबई महापालिकेने दादरचा कबूतर खाना बंद केल्याने वाद निर्माण झाला... राज्य सरकारने यात लक्ष घातलं.. त्या वादात न पडता कबुतरांमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे. घराजवळ कबूतर असणं हे मानवी आरोग्यासाठी घातकच आहे.. आरोग्यासाठी कबूतर जा जा जा म्हणण्याची वेळ आली आहे.
याविषयी सुप्रसिद्ध फुफ्फुसविकारतज्ञ डॉ. समीर गर्दे यांच्याशी केलेली खास चर्चा

07/08/2025

शिव आणि पार्वती एकत्रित विराजमान असलेले मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा जाणून घेऊया

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथुनिया नुठवूं माथा@प्रा. डॉ. ज्ञानेश्वर भामरेतुकोबांची अभंगगाथा ज्या देहू मावळ परिसरात लिहिली...
06/08/2025

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथुनिया नुठवूं माथा
@प्रा. डॉ. ज्ञानेश्वर भामरे
तुकोबांची अभंगगाथा ज्या देहू मावळ परिसरात लिहिली गेली त्या परिसरात असणारा श्रीक्षेत्र भंडारा डोंगर म्हणजे तुकोबांचे साधनास्थान. आजही या डोंगरावर ती गुहा आहे. या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर ज्या ठिकाणी पांडुरंगाचा चरणस्पर्श झाला. तेथेच महाराष्ट्रातील वारकरी, समाजातील दानशूर व्यक्ती व विविध संस्था यांच्या आर्थिक मदतीने भव्य असे मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला होता. आज या मंदिराचे 80 टक्के काम झाले आहे. येत्या दोन वर्षात मंदिर पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा आहे. हे मंदिर कसे उभारले जात आहे याची माहिती देणारा लेख..
https://www.evivek.com/Encyc/2025/8/5/bhandara-dongar-sant-tukaram-maharaj-mandir-.html

तुकोबांची अभंगगाथा ज्या देहू मावळ परिसरात लिहिली गेली त्या परिसरात असणारा श्रीक्षेत्र भंडारा डोंगर म्हणजे तुको...

06/08/2025

रक्षाबंधन विशेष!
रंगीबेरंगी राख्यांनी सजली दादरची बाजारपेठ!
सिल्व्हर कोटिंग, चांदीच्या राख्या, लहान भावांसाठी कार्टून्स राख्यांनी दादरची बाजारपेठ सजली आहे.. यंदा कोणत्या राख्यांची चलती आहे पाहूया...

06/08/2025

बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आहे गुजरातमधील सोमनाथ.. पुराण कथेनुसार सोमनाथ मंदिराची स्थापना चंद्रदेवांनी केली.. ती कथा काय आहे समजून घेऊया..

चंद्रदेवांनी अशी केली सोमनाथ मंदिराची स्थापना

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivek saptahik - साप्ताहिक विवेक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vivek saptahik - साप्ताहिक विवेक:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share