Trimbakeshwar Nashik

  • Home
  • Trimbakeshwar Nashik

Trimbakeshwar Nashik News updates, photos and videos from Trimbakeshwar, Nashik.

पाऊस नसल्याने पर्यटकाचा हिरमोड.अंजनेरी गडावर एक पर्यटक जखमीत्र्यंबकेश्वर ता.20 जुलै 2025.पाऊस नसल्याने शनिवार रविवारी ये...
20/07/2025

पाऊस नसल्याने पर्यटकाचा हिरमोड.
अंजनेरी गडावर एक पर्यटक जखमी
त्र्यंबकेश्वर ता.20 जुलै 2025.
पाऊस नसल्याने शनिवार रविवारी येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा मोठा हिरमोड झाला. पाऊस नसल्याने धबधबे नद्यांना पाणी नव्हते. त्यामुळे फक्त हिरवीगार व श्री पाहून पर्यटक माघारी फिरले.
दरम्यान अंजनेरी गडावर पाय दगडात अडकून पडल्याने एक महिला पर्यटक जखमी झाली.
महिला सुखरूप असून तिचा एक पाय फॅक्चर झाला
सुनिता गुप्ता वय 40 मुंबई असे सदर महिलेचे नाव
त्या नातेवाईका समवेत गडावर.आल्या होत्या.
वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने वनविभाग कर्मचाऱ्यांनी सदर वन विभागाकडील स्ट्रेचरवर उचलित
खाली डोंगर उतरून आले. महिलेस रुग्णालयात दाखल केले हनुमान पाय तलाव येथे ध्यान मंदिर तेथे हा अपघात
झाला.

संत निवृत्तीनाथ मंदिराच्या कामाला गती. त्र्यंबकेश्वर ता.20 जुलै 2025संत निवृत्तीनाथ मंदिराच्या दगडी सभामंडपाच्या कामाला ...
20/07/2025

संत निवृत्तीनाथ मंदिराच्या कामाला गती.
त्र्यंबकेश्वर ता.20 जुलै 2025
संत निवृत्तीनाथ मंदिराच्या दगडी सभामंडपाच्या कामाला कामाला गती देण्यात आले आहे अशी माहिती श्री संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्ट कडून देण्यात आली आहे.
भाविकांच्या देणग्यांमधून मंदिराचा सभा मंडप काळ्या पाषाणात बनवण्याचे काम मध्यंतरी थांबले होते त्याला आता गती देण्यात आली आहे. चार कोटी रुपये खर्च करून हे काम होणार आहे.
वरील माहिती श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष अड सोमनाथ घोटेकर तसेच विश्वस्त नारायण
मुठाळ यांनी दिली.या यावेळी पुजारी गोसावी उपस्थित होते.
शासनाच्या प्रसाद योजनेतून संत निवृत्तीनाथ मंदिर परिसर विकासाचे काम सुरू होते यासाठी ऑक्टोबर25 अखेर हे काम पूर्ण होईल असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. आता निधीची अडचण भासणार नसल्याचे समजते.
दरम्यान संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूर वरून त्रंबकेश्वर नगरीत 27 जुलैला सकाळी अकरा वाजता परतणार आहे.दरम्यान संत निवृत्तीनाथ पालखी रथाच्या मार्गात(आषाढी वारी पंढरपूर )मंदिर ट्रस्टला दानपेटी आणि कळशी मध्ये साडेआठ लाख रुपये दान मिळाले आहे. तर संत निवृत्तीनाथ मंदिरातील दानपेटीतून
साडेपाच लाख असे दान मिळाले.
अशाप्रकारे दानपेढ्यातून 14 चौदा लाख रुपयांचे उत्पन्न ट्रस्टला मिळाले आहे. दरम्यान श्रावण महिन्यात संत निवृत्तीनाथ मंदिराकडे मोठी गर्दी राहणार आहे त्यामुळे या परिसरात भाविकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने देखील प्रश्न लक्ष घालावे अशी मागणी आहे. वरील परिसरात स्वच्छता गृहे ठेवावी अशी मागणी आहे.

20/07/2025

श्रावण मास नियोजन
25 जुलै पासून श्रावण मासाला प्रारंभ, चार सोमवार.
श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर ता.20जुलै 2025. प्रतिनिधी
25 जुलै शुक्रवारपासून सर्वांचा आवडता असा धार्मिक सण उत्स्वाचा श्रावण मास सुरू होत आहे. श्रावण मासाचे नियोजन कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासकीय पातळीवर श्रावण मासाचे नियोजन केले जाते. उत्तर भारतीयाचा श्रावण मास देखील सद्या सुरू आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर मध्ये इतर राज्यातील भाविकांची मोठी गर्दी आहे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या श्रावणासाठी महाराष्ट्रातील भावीक आणि प्रदक्षणार्थी यांची येथे गर्दी होणार आहे.
पहिला सोमवार 28 जुलै
04 ऑगस्ट दुसरा सोमवार,
11 ऑगस्ट तिसरा सोमवार
18 ऑगस्ट चौथा सोमवार असे सोमवार आहेत. प्रत्येक रविवार आणि सोमवारी त्रंबकेश्वरी प्रदक्षणार्थींची मोठी गर्दी राहणार आहे. तिसरा श्रावण सोमवार 11 तारखेला आहे. प्रत्येक शनिवार रविवार सोमवार मिळून येथे लक्षावधी भाविकांची प्रदक्षणार्थींची उपस्थिती राहणार आहे.
29 जुलैला मंगळवारी नागपंचमी आहे.
आठ 8 ऑगस्ट तारखेला नारळी पौर्णिमा
तर 9 ऑगस्टला तारखेला रक्षाबंधन
16 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती
22 ऑगस्टला पोळा
तर 23 ऑगस्टला श्रावण महिना संपेल.
यात 15 16 17 18 ऑगस्ट शुक्रवार शनिवार
रविवार सोमवार या तीन दिवसांचा सुट्टीचा काळ धरून लाखोच्या संख्येने भावीक येथे असतील येतील
विशेष म्हणजे प्रदक्षणा मार्गावर नियोजन अभाव असतो राहतो ते करणे गरजेचे आहे. त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट जिल्हा प्रशासन त्रंबक नगरपालिका पोलीस यंत्रणा काय नियोजन करते याकडे नागरिकांचे यात्रेकरू भाविकांचे प्रदक्षणार्थींचे लक्ष लागले आहे.

गुरुवारी : दीप अमावस्या !काही साठी  गतहारी अमावस्या !!त्र्यंबकेश्वर ता.20 जुलै 2025.आषाढ मासाची समाप्ती म्हणजे दीप अमावस...
19/07/2025

गुरुवारी : दीप अमावस्या !
काही साठी गतहारी अमावस्या !!
त्र्यंबकेश्वर ता.20 जुलै 2025.
आषाढ मासाची समाप्ती म्हणजे दीप अमावस्या होय. या दिवशी दिप आमावस्या दिवे धुणे अमावस्या आहे. निरांजनी, समई ,नंदादीप, कुबेर दिवा, नवरात्र दीप, समई, लामण दिवा असे विविध अंधकारात प्रकाश निर्माण करणारे दिवे, दिवे घासून धुवून पूजन करणे म्हणजे दीप अमावस्या होय. आषाढ मासाची समाप्ती करतानाच आषाढाच्या पूर्वसंध्येला पवित्र शुभ श्रावण मासाची ( 25जून) सुरुवात दीपप्रज्वलनाने करावी असा या मागचा संकेत आहे.त्र्यंबक नगरित घरोघरी दीपपूजा होते. गोड पुऱ्या खिरीचा नैवेद्य प्रसंगी भजे दिव्याला दाखवतात. हा आखाडतळणचाचा शेवटचा दिवस आहे.
तेल वात, तूप वात, कोणत्या दिशेला कसला दिवा लावायाचा ,कोणत्या वेळेस दिवा लावायचा याचे शास्त्र आहे. काळाच्या ओघात रॉकेल नाही चिमणी ,कंदील हे जुने दिवे काल बाह्य झाले आहे. त्रंबक नगरीत गोड नैवेद्य दाखवला जातो. बाजारात विविध प्रकारचे दिवे उपलब्ध आहेत. यात महागड्या आणि कलात्मक दिवे ही भाविक खरेदी करतात.
* विशिष्ट पूजेत प्रसंगी सूर्य आणि चंद्राकडे पहात निरंजन ओवाळले जाते. यामागे उपकार करणाऱ्याला विसरू नये असा संकेत आहे.
*चूक करणाऱ्याला तु मोठे दिवे लावले असे म्हणणे मागे काही उद्देश असतो टोमणा असतो.गटारी जोरात !
* ग्रामीण भागात याला गतहारी पुढे गटारी अमावस्या असे म्हणतात. श्रावण मास लागणार असल्याने त्रंबकच्या ग्रामीण भागात गटारी साजरी करण्याची खेड्यापाड्यात पद्धत जोरात साजरी केली जाते खटियाया खटी होय. श्रावण मासात मांसाहार खाणे पिणे मदिरा अवश्य टाळले जाते.
भाजीपाला महाग असल्याने खेड्या पाड्यातून भाजीपाल्याकडे दुर्लक्ष करीत तिखट मसाले बाजाराला प्राधान्य दिले जाते असे दिसते.

** घोटकरसर नाबाद 82.त्र्यंबकेश्वर शिवसेनेचे पहिले शाखाप्रमुख ;त्रंबकेश्वर मध्येप्रथम क्रिकेटचे स्टंप रोवले!वाढदिवस शुभेच...
19/07/2025

** घोटकरसर नाबाद 82.
त्र्यंबकेश्वर शिवसेनेचे पहिले शाखाप्रमुख ;
त्रंबकेश्वर मध्ये
प्रथम क्रिकेटचे स्टंप रोवले!
वाढदिवस शुभेच्छा ; अभिष्टचिंतन !!
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ता.19 जुलै 2025.
येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते , तालुक्यातील
उत्तम शेतीतज्ञ, त्र्यंबकेश्वर शिवसेनेचे संस्थापक, ज्योतिष शास्त्रातील अभ्यासक रत्नाकर गणेश जोशी उर्फ घोटकर सर 82 व्या वर्षात पदार्पण करत आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अभिष्टचिंतन ! घरगुती पद्धतीने त्यांचा वाढदिवस रविवारी 20 जुलै रोजी साजरा होत आहे.
#घोटकर सर यांचा अल्प परिचय #
मूळचे घोटी येथे राहणारे आणि 20 जुलै 1944
मध्ये जन्म झालेले घोटकर सर तीन पिढ्यापासून त्रंबकेश्वरमध्ये राहत आहे. त्रंबकेश्वरच्या नूतन त्रंबक विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढे इगतपुरीत शिक्षण घेऊन बीएससी झाल्यानंतर ज्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी केला शेतीत विविध प्रयोग करीत कमोद आंबेमोहर यासारख्या सुवासिक तांदळा पिकवले. नाशिक जिल्हा परिषद कडून आदर्श शेतकरी पारितोषिक मिळवले. प्रत्यक्ष गोलदरी या भागात प्रत्यक्ष शेती कामे केली.सद्या शेतात चिमणसाळ इंद्रायणी यांची पिके घेतात. अवनी निंदनी करण्यासाठी राबवत असतात. त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पद भूषवले. शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडल्या.ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे सोबतीने शेतकरी समस्या शासन कडे मांडल्या.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन 1986 मध्ये सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर मध्ये त्यावेळी म्हणजे छगन भुजबळ ( शिवसेनेत असताना) यांचे हस्ते त्रंबकेश्वर शाखाप्रमुख म्हणून सुरुवात केली. आज तागायत ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत.त्या काळात शिवसेनेचे प्रमुख नेते प्रमोद नवलकर गणेश नाईक यांचा यांच्याशी घोटकरसर यांचा जवळचा संबंध आला.स्वर्गीय सुधाकर भाई हे त्यांचे जुने सहकारी.
अलीकडे खासदार राजाभाऊ वाजे यांचा देखील त्यांच्याशी परिचय झाला. 1968 मध्ये त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ मैदानासमोरील पटांगणात ( आताचे बचत भवन)
ज्यांनी सर्वप्रथम क्रिकेटचे स्टंप रोले रोवले. त्यावेळेस त्या काळी दिलदार क्रिकेट टीम देखील अस्तित्वात होती.त्र्यंबकेश्वरच्या व्यायाम क्षेत्रातले प्रसिद्ध दिवंगत डॉ नानासाहेब शुक्ल यांच्यासोबत राहत घोटकर सर यांनी व्यायामा बरोबर क्रीडा खेळ भरवले. विभागीय युवक शिबिरात यशस्वी सहभाग ठेवला.येथोल विख्यात राजा शिवछत्रपती व्यायाम शाळा याचे ते स्थापनेपासून तर आजतागायत ते आजीवन आजीव सदस्य आहेत. 1971 मध्ये राज्य पातळीवरील हौशी कलाकारांची नाट्य स्पर्धा देखील त्रंबकेश्वर मध्ये भरवण्यात त्यांच्या सहभाग होता. शिक्षण सहाय्यक समिती स्थापन करून त्यांनी सर हे सार्थक केले.
1968 ते 1975 पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांचे इंग्लिश गणित क्लास घेतले. तेव्हापासून त्यांचे नाव नावापुढे सर लागले. पुरोहित असल्याने धार्मिक विधी सोबत ते जोडले गेले. त्यांना ज्योतिष शास्त्राची ईश्वरीय देणगी मिळाली. 2014 मध्ये तीन गुंठे जमीन त्यांनी संस्कृत वेद पाठ शिकणाऱ्या शाळेला भेट देत दानशूरता दाखवली.मधुर जोशी गुरुजी हे त्यांचे सहकारी होय.
आजही त्यांच्या घरी व्यायामाचे साहित्य असून शरिरयष्टी ते राखून आहे . त्र्यंबक नगरीत सर्वपरिचित असल्याने तरुण तुर्क, हसतमुख , शिस्तप्रियआजाद शत्रू अशी घोटकर सर यांची त्रंबकेश्वर मध्ये ख्याती आहे.त्रंबकेश्वर मधील आजी-माजी दिवंगत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांना देखील घोटकर सर यांच्या कार्याची प्रचिती आलेली आहे. आजही त्यांच्या स्टडी रूम मध्ये अनेक ग्रंथ पुस्तके आहेतं. आत्तापर्यंत त्यांनी सहा सिंहस्थ कुंभमेळे बघितले आहेत. देव आहे पण तो तुमची कसोटी बघतो.असा अध्यात्मिक अनुभव देखील त्यांनी कथन केला. वाढदिवस शुभेच्छा, अभिष्टचिंतन !
शुभेच्छुक # घोटकर सर मित्रपरिवार श्री क्षेत्र त्रंबकेश्वर.

19/07/2025

विश्रांतीनंतर ब्रेक नंतर पाऊसाची हजेरी.
त्र्यंबकेश्वर 19 जुलै 2925. येथे गेले पाच-सहा दिवसानंतर आज पावसाची हजेरी लागली. काही दिवस ब्रेक घेत पाऊस झाला. वातावरणात मोठा उष्मा जाणवत होताक कडक ऊन पडत होते पावसाने नाtगरिकांना हायसे वाटले. रात्री सव्वा नऊच्या सुमारास पाऊस झाला.

त्रंबकेश्वर पंचायत समिती गण गट कोणत्या पक्षाला अनुकूल वातावरण.? त्र्यंबकेश्वर 19 प्रतिनिधी  जिल्हा परिषद आणि पंचायत समित...
18/07/2025

त्रंबकेश्वर पंचायत समिती गण गट कोणत्या पक्षाला अनुकूल वातावरण.? त्र्यंबकेश्वर 19 प्रतिनिधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्र्यंबक तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांची प्रारूप प्रभागरचना अधिसूचना जाहीर झाली आहे यात फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणेच रचना कायम राहिली आहे. जि. प.चे ३, तर पंचायत समितीचे ६ गण यावेळीदेखील कायम आहेत.त्र्यंबक पंचायत समितीची निर्मिती झाली तेव्हा म्हणजेच २००२ पासून गण-गटरचना यावेळीही कायम राहिली आहे. जिल्हा परिषदेसाठी अंजनेरी, हरसूल आणि ठाणापाडा गट, तर पंचायत समितीसाठी अंजनेरी, देवगाव, वाघेरा, हरसूल, ठाणापाडा व ओझरखेड असे सहा गण आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अलीकडच्या कालावधीत बदललेल्या राजकीय समीकरणांचा प्रभाव मोठ्या जाणवणार आहे. २०१७ नंतर बरीच मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.संपूर्ण तालुक्यात वर्चस्व असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ( इंदिरा काँग्रेस) पक्षला सोड चिठ्ठी देणारे अनेक जण आहेत.त्या मुळे जवळपास इंदिरा काँग्रेस पक्ष परिस्थिती खूपच केविलवाणी झाली आहे. काँग्रेस पक्ष कमालीचा मागे पडल्याने इतर सर्वच पक्षांचे फावत चालले आहे फावणार आहे .माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करत थेट प्रदेश उपाध्यक्ष झाले आहेत. पूर्वी काँग्रेसचे असलेले आमदार हिरामण खोसकर आता राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर पुन्हा आमदार झालेत आहेत. दोन पंचवार्षिक आमदार असलेल्या निर्मला गावित यांनी काँग्रेस सोडून आता शिंदे गटाच्या शिवसेनेत आहेत. मागच्या काही दिवसांत शिवसेनेचे काही पदाधिकारी भाजपात, तर काही राष्ट्रवादीत गेले आहेत. भाजपाला २० वर्षांत एकही जागा मिळवता आलेली नव्हती. येथे आघाडी न करता निवडणूक लढवायची झाल्यास त्र्यंबकेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पुढे ?जाणार असे दिसत आहे. त्यामुळे काहींनी चालत्या गाडीत जाणे बसणे पसंत केले आहे. प्रस्थापित पक्षांची मोठी पडझड झालेली असताना माकपने मात्र आपली पकड सोडलेली नाही. तालुक्यात ठाणापाडा भागात असलेले माकपचे वर्चस्व आजही कायम आहे.14 मार्च 2002 ला त्रंबकेश्वर पंचायत समितीची स्थापना झाली. थोडक्यात आता त्र्यंबक पंचायत समिती निर्मितीस 23 वर्ष संपून चोविसाव्या वर्षी लागलेले आहे. पदार्पण आहे. आत्तापर्यंत तीन टर्म पंचायत समितीच्या झाल्या आहेत त्यामुळे 18 लोकांनी पंचायत समितीत सदस्य पद भूषेवले आहे यातूनच सभापती निवडले जातात. मात्र गट निवडणुकीत कोणत्या पक्षाला अनुकूल वातावर राहील हे
सांगता येणार नाही .

त्र्यंबकेश्वर तालुक्यात माती परीक्षण करून वृक्षारोपण करण्याची गरज !प्रदक्षणा मार्गावर वृक्षारोपण करण्याची गरज.तुळस, बेल,...
18/07/2025

त्र्यंबकेश्वर तालुक्यात माती परीक्षण करून
वृक्षारोपण करण्याची गरज !
प्रदक्षणा मार्गावर वृक्षारोपण करण्याची गरज.
तुळस, बेल, यांची रोपे लागवड करावी
त्र्यंबकेश्वर ता.18 जुलै प्रतिनिधी.
तालुक्यात व त्र्यंबकेश्वर पर्वतरांगात माती परीक्षण करून वृक्षारोपण करावे अशी मागणी होत आहे. काही हौशी मंडळी देखील वाढदिवस निमित्ताने वृक्षारोपण त्रंबकेश्वरमध्ये व त्रंबकेश्वरच्या बाहेर पर्वतरांगात , परिसरात करतात. परंतु वृक्षारोपण करताना त्र्यंबकेश्वरची भौगोलिक परिस्थिती तसेच या भागात जगू शकतील अशी रोपे लागवड करावी अशी सूचना करण्यात आली आहे. जागरूक निसर्गप्रेमींनीही सूचना केली आहे.
त्र्यंबकेश्वर भागात यासारखे उंबर आंबे वड पिंपळ यासारखी ऑक्सिजन देणारी झाडे पुर्वी मोठ्या प्रमाणावर होती. विविध शासन व खाजगी स्तरावर त्रंबकेश्वर मध्ये होणारा विकास यामुळे वरील प्रकारचे वृक्ष आता नष्ट झाले आहेत अथवा थोडक्यात संख्यने आहेत. पूर्वी त्रंबकेश्वरच्या अंजनेरी गडावर संजीवनी नावाची वनस्पती मिळत होती अशी आख्यायिका आहे. तर ब्रह्मगिरी डोंगरा लगत पंचलिंग डोंगरावर रात्री चमकणारी वनस्पती देखील मिळत होती अशी देखील वाच्यता आहे.
पूर्वी त्रंबकेश्वर मध्ये काष्टीचे मोठे जंगल होते काष्टीचे जाळे होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांबू त्रंबकेश्वर मधून मिळत असत. इतर राज्यातून येणारे लोक देखील पिंपळ सारखे रोपे मिळत नसल्याने वरील वर काही संशोधन करून अशी रोपे पर्यायी रोपे मिळतात का याचे चौकशी करताना दिसतात. औषधी वनस्पतींचे पूर्वी भांडार होते आता औषधी वनस्पती जवळपास दिसत नाही.
विशेषता रुद्राक्ष माळा ,कमळ काकडी माळा ,विविध प्रकारच्या तुळशी माळा , 27 नक्षत्र वनस्पती
तसेच औषधी वनस्पती यांची त्र्यंबकेश्वर तालुक्यात लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्यास लोकांना रोजगार मिळण्यास हातभार लागेल. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रावर जप् तप पूजेसाठी विविध प्रकारच्या वरील माळा वापरल्या जातात. भाविक देखील तीर्थक्षेत्र म्हणन अशा माळा खरेदी करतात. परंतु इतर राज्यातून नाशिक जिल्ह्यात अशा मळा विक्रीस येतात. त्रंबकेश्वर मध्येच असा कच्चामाल मिळाल्यास भाविकांना देखील स्वस्तामध्ये वरील माळा मिळू शकतात तसेच परिसरातील लोकांना रोजगार देखील उपलब्ध होऊ शकतो प्रायोगिक तत्त्वावर या दृष्टीने वनविभाग कृषी विभाग वृक्ष संशोधन विभाग यांनी लक्ष घालून प्रायोगिक तत्त्वावर लागवड करून यशस्वी केल्यास सर्वांनाच त्याचा फायदा होऊ शकेल.
शासन पातळीवर नगरपालिका वनविभाग वृक्षारोपण करत असते केले. त्रंबकेश्वर भागात बेल देखील वृक्ष कमी असल्याने जिल्ह्याच्या इतर भागातून आणला जातो. त्र्यंबकेश्वरच्या प्रदर्शना मार्गावर वृक्षारोपण करण्याची नितांत गरज आहे.

अंजनेरी गाजरवाडी डोंगरावर वृक्षरोपण !त्र्यंबकेश्वर ता 18 जुलै 2025.दि १६ जुलै २०२५ रोजी अंजनेरी ता त्र्यंबकेश्वर येथे वन...
18/07/2025

अंजनेरी गाजरवाडी डोंगरावर वृक्षरोपण !
त्र्यंबकेश्वर ता 18 जुलै 2025.
दि १६ जुलै २०२५ रोजी अंजनेरी ता त्र्यंबकेश्वर येथे वनविभाग मार्फत गाजरवाडी महादेव डोंगर येथे वृक्षरोपन करण्यात आले. वन विभाग पश्चिम अंतर्गत वनविभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक यांनी वृक्षारोपण केले शालेय विद्यार्थ्यांचा देखील सहभाग घेण्यात आला. यावेळी अंजनेरीतील वनप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होतेm

24 जुलैला गरूपुष्यामृत योग.पूर्वीच्या मनगट्या आता झाले बेसलेट.त्र्यंबकेश्वर ता.17 जुलै 2025.24 जुलै रोजी गरूपुष्यामृत यो...
17/07/2025

24 जुलैला गरूपुष्यामृत योग.
पूर्वीच्या मनगट्या आता झाले बेसलेट.
त्र्यंबकेश्वर ता.17 जुलै 2025.
24 जुलै रोजी गरूपुष्यामृत योग आहे.दुपारी 4.44 नंतर हा योग आहे. विशेष म्हणजे दीप पूजन दर्श आम्वस्या आहे.गुरुपुष्यामृत योग 2025 मध्ये २४ जुलै, २१ ऑगस्ट आणि १८ सप्टेंबरला गुरुपुष्यामृत योग आहे.
गुरुपुष्यामृत योग हा एक महत्वाचा ज्योतिषीय योग आहे, जो धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. या दिवशी सोने, चांदी, रत्ने रत्न रिंग ब्रेसलेट
खरेदी करणे शुभ मानले जाते.
# गुरुपुष्यामृत योग 2025 च्या तारखा:
२४ जुलै, २१ ऑगस्ट, १८ सप्टेंबर.
या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अधिक फलदायी मानले जाते. त्यामुळे, ज्यांना सोने, चांदी किंवा इतर वस्तू खरेदी करायच्या आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या दिवशी केलेले धार्मिक पूजन फलदायी ठरते.
राशी रत्न, राशी रत्न रिंग, ब्रेसलेट.
रास,हस्तरेषा ज्योतिष कुंडली पाहून ज्योतिषाच्या सल्ल्याने अंगुठी,रिंग रत्ने ब्रेसलेट वापरावीत. कमी ग्रेड असलेले कमी किंमत असलेले परंतु गुणकारी रत्ने वापरावी. रखडलेली कामे मार्गे लागतात, नजर लागत नाही यासाठी पूर्वी विशिष्ट मनगट्या वापरल्या जायच्या हल्ली ब्रेसलेट वापरले जाते परंतु तेही दर्जेदार अथवा शास्त्रानुसार वापरणे योग्य ठरते.
पुढे हाय क्वालिटी रत्न देखील खरेदी करू शकतात.
सुवर्णकार, सराफ, सोनार, रत्न व्यावसायिक यांच्याकडून
विश्वास पात्र ठिकाणावरून रत्न खरेदी करावीत.
संकलन 96 231 88 431 त्रंबकेश्वर.

विषमुक्त शेतीसाठी एकत्र येऊन काम करायला हवे : राहीबाई पोपरे त्र्यंबकेश्वर 17 (प्रतिनिधी) : "मी अडाणी बाई, पण मला इतकं कळ...
17/07/2025

विषमुक्त शेतीसाठी एकत्र येऊन काम
करायला हवे : राहीबाई पोपरे
त्र्यंबकेश्वर 17 (प्रतिनिधी) : "मी अडाणी बाई, पण मला इतकं कळतं की, मातीला जपलं तर माती तुम्हाला जगवते. म्हणून विषमुक्त शेतीसाठी सारे एकत्र येऊन काम करत राहायला पाहिजे. कॅन बायोसिसचे हे उत्पादन आधुनिक शेती करायला खरचं उपयुक्त आहेत." असे मत पद्मश्री बिजमाता राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केले. कृषी क्षेत्रातील कॅन बायोसिसच्या इम्पोर्टेड वॉटर सोल्युबल रोफा तसेच नीम प्रणालीतील विविध १५ उत्पादनांचे लोकार्पण अलीकडेच करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. तसेच यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून मातीचे स्वास्थ्य व आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख उद्याच्या भविष्याला करून दिली.
यावेळी फार्म डीएसएस ॲग्रीटेक प्रा. लि. संस्थापक डाळिंबरत्न बाबासाहेब गोरे, आदिनाथ चव्हाण, पुण्याचे प्रिंसिपल सायंटीस्ट डॉ. सुजॉय साहा, डी सँगोजचे मुख्य समुह माहिती अधिकारी जेफ फ्रान्को , पंकज पेठे यांचे सह नाशिक तसेच महाराष्ट्रातील अनेक शेतकरी मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी बोलतांना कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालीका संदीपा कानिटकर म्हणाल्या, " रोफा म्हणजे रिअल ऑप्टिमाईज्ड फर्टिलायझर अप्लिकेशन असलं तरी, माझ्यासाठी आर म्हणजे शेतकऱ्यांचा रिस्पेक्ट (आदर) आहे." रोफा हे फ्रान्स मधील तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करून देण्यासाठी कॅन बायोसिसने डी सँगोज कंपनी सोबत करार केला असून या श्रेणीतील १२ उत्पादने पूर्णतः पाण्यात विरघळणारी, सर्व फळबागा व भाजीपाला पिकांसाठी कुठल्याही हवामानात प्रभावी आहेत. नीम श्रेणीतील सर्व गुणवत्तापूर्ण उत्पादने विषमुक्त कृषी क्षेत्रात क्रांती आणणारी आहेत. त्यामुळे कॅन बायोसिसने आता जगाला शाश्वत शेतीचा खात्रीशीर पर्याय उपलब्ध करून दिला असल्याची भावना मंचावरील उपस्थित तज्ज्ञांनी व्यक्त केली.

*जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन – न्यायासाठी जागतिक बांधिलकीचा दिवस !                        # सत्य लपून राहत नाही ! सत्...
17/07/2025

*जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन – न्यायासाठी जागतिक बांधिलकीचा दिवस !
# सत्य लपून राहत नाही ! सत्यमेव जयते !!
प्रत्येक वर्षी १७ जुलै रोजी जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन (World Day for International Justice) साजरा केला जातो. या दिवशी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय व्यवस्था आणि गंभीर गुन्ह्यांवरील दंडमुक्ततेविरुद्ध लढा यावर लक्ष केंद्रित केले जाते.
या दिवशी गंभीर गुन्ह्यांचे आरोपी जबाबदार धरले गेले पाहिजेत हा संदेश जागतिक पातळीवर दिला जातो. कोणताही व्यक्ती कायद्याच्या वर नाही, ही संकल्पना दृढ केली जाते.
गुन्ह्यांचे बळी ठरलेल्यांना न्याय मिळावा, त्यांचे हक्क जपले जावेत, आणि त्यांना भरपाई मिळावी – हे ICC चे एक मूलभूत ध्येय आहे.
**सर्व न्याय प्रेमीना , वकील बांधवांना जागतिक न्याय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Address


Telephone

+919011964380

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trimbakeshwar Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Trimbakeshwar Nashik:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share