HP Live News

HP Live News HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Mah

20/07/2025

वसई – भाजपचे नेते आणि आमदार प्रविण दरेकर आज एका कार्यक्रमासाठी वसईत आले असताना मोठा प्रकार घडला. लिफ्टमध्ये दरेकर यांच्यासोबत दोन आमदारही होते आणि लिफ्ट ओव्हरलोड झाल्याने ती अचानक थांबली.

🕒 सुमारे २० मिनिटं ते लिफ्टमध्ये अडकून राहिले.
📍 घटना स्थळ: वसईतील एका खासगी सभागृहात
👥 सोबत: दोन इतर आमदार आणि स्थानिक कार्यकर्ते
🚨 प्राथमिक माहिती: लिफ्टमध्ये अधिक वजन झाल्यामुळे तांत्रिक बिघाड

वसई: भाजपचे प्रविण दरेकर २० मिनिटं लिफ्ट मध्ये अडकले; २ आमदारांन सहित लिफ्ट ओव्हरलोड!

19/07/2025

वसईत घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा काळाबाजार उघड
राजोडी परिसरात सहारा जीवन केंद्राजवळ पुरवठा विभागाने कारवाई करत ५२ सिलेंडर, इलेक्ट्रिक मोटार, वजन काटा आणि टेम्पो असा सुमारे ६.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

🛑 घरगुती गॅस चोरून व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून विक्री केली जात होती, यामध्ये दोन डिलिव्हरी बॉय सहभागी होते. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

🚨 गॅसचा असा काळाबाजार नागरिकांच्या जीवाशी खेळणारा असून, स्फोटाची शक्यता आणि ग्राहकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते.

वसईत गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड! ५२ सिलेंडर जप्त


#गॅसकाळाबाजार



#गॅसघोटाळा



19/07/2025

मी कडवट मराठी आहे, हिंदी सक्ती करून दाखवा!"
असाच सणसणीत इशारा दिला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी!

📍 मिरा-भाईंदरमध्ये मराठी अस्मिता जागवणाऱ्या सभेत, हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे यांनी थेट शब्दांत आपली भूमिका मांडली.
त्यांनी म्हटले की, "ही मुंबई आहे, महाराष्ट्र आहे... हिंदी सक्ती सहन करणार नाही!"

🔸 सभा, भाषण आणि मराठी जनतेच्या समर्थनावर आधारित व्हिडीओ जरूर बघा आणि आपलं मत कमेंटमध्ये नोंदवा

#राजठाकरे
#मराठीअस्मिता




#मिराभाईंदर
#राजकारण
#मराठीजनतेचा_आवाज

18/07/2025

हिंदी मिडियाही पाया खालची ढेकणं!”
– मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरा रोडच्या सभेत हिंदी मिडियावर तीव्र शब्दांत टीका केली.

📺 राज ठाकरे म्हणाले की, हिंदी मिडिया मराठी जनतेविरोधात खोटं पसरवत आहे, आणि महाराष्ट्रात मराठी अस्मितेवर अतिक्रमण करत आहे.

🔥 त्यांच्या या भाषणाने सभास्थळी प्रचंड जल्लोष झाला आणि सोशल मिडियावरही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

📍 ही फक्त टीका नाही, तर हिंदीसक्ती आणि उत्तर भारतीय वाढीव प्रभावावर राज ठाकरेंचा राजकीय इशारा आहे

#राजठाकरे







#मनसे
#मीडिया_झाकलं

18/07/2025

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा धडाकेबाज आरोप!

🗣️ “मीरा-भाईंदर ते पालघरपर्यंतचा संपूर्ण मराठी पट्टा गुजरातला जोडण्याचा डाव आखला जातोय,” असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी मिरा रोड येथील सभेत केला.

🛑 हिंदीसक्ती वाढवून, मराठी लोकांना हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे सांगत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवरही सडकून टीका केली.

📍 मराठी जनतेच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, राज ठाकरेंच्या या भाषणाने राजकीय वातावरण तापलं आहे

#राजठाकरे







#मनसे

18/07/2025

राज ठाकरेंची आगपाखड | निशिकांत दुबेंवर जोरदार टीका!

🔴 मुंबईत येऊ नकोस, अन्यथा ‘दुबे-दुबे’ समुद्रात नेऊ – अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना थेट इशारा दिला आहे.

🗣️ हे वक्तव्य त्यांनी मिरा रोड येथे झालेल्या मराठी जनतेच्या सभेत केलं.

🎯 राज ठाकरे यांच्या या शब्दांनी सभेत उपस्थित नागरिकांमध्ये प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला.

📌 मराठी अस्मिता, भूमिपुत्र आणि बाहेरून आलेल्या राजकारण्यांबद्दलचा रोष पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भाषणातून समोर आला आहे

निशिकांत दुबे मुंबईत ये, समुद्रात ‘दुबे दुबे’ के मारेंगे राज ठाकरेंचा इशारा

#राजठाकरे




#मनसे



#मराठीबाणा

18/07/2025

मिरा रोड | १५ जुलै २०२५

✅ ८ जुलै रोजी मिरा भाईंदरमध्ये पार पडलेल्या मराठी मोर्चाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मिरा रोडवर मराठी जनतेचे आभार मानण्यासाठी सभा घेत आहेत.

📍 सभा स्थळ: नित्यानंद नगर, मिरा रोड
📢 ही सभा मराठी अस्मितेच्या लाटेचं प्रतिक ठरेल, असं मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी म्हटलं आहे.

🎤 याच दिवशी मिरा भाईंदरचे विधानसभा अध्यक्ष संतोष शिंगोडे यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटनही राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

#राजठाकरे

#मराठीमोर्चा






#मनसे

M.M.Suryawanshi (IAS:SCS:2010) Managing Director, Maharashtra Tourism Development Corporation, Mumbai has been posted as...
17/07/2025

M.M.Suryawanshi (IAS:SCS:2010) Managing Director, Maharashtra Tourism Development Corporation, Mumbai has been posted as Municipal Commissioner, Vasai-Virar Municipal Corporation, Vasai.

17/07/2025

वसई – उमेळमान गावात अनधिकृत चाळींचं वाढतं प्रमाण प्रशासनासाठी डोकेदुखी ठरतंय!

वसईसारख्या ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न शहरात बेकायदेशीर बांधकामाचा सुळसुळाट होत आहे. उमेळमान गावात अनेक अनधिकृत चाळी उभारल्या जात असून, त्यावर कारवाईचं नाव नाही.

📍 ठिकाण: उमेळमान, वसई
📌 प्रश्न:
• वाढती चाळी – कचरा, पाणीटंचाई आणि वाहतूक कोंडी
• शहरी नियोजन धोक्यात
• स्थानिक रहिवाशांचा विरोध
• प्रशासनाचे दुर्लक्ष?

17/07/2025

ओला-उबेरसारख्या ॲप आधारित कॅब कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ४६ वर्षीय सनोज सक्सेना यांनी काल संध्याकाळी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली.

➡️ मृत व्यक्ती: सनोज सक्सेना
➡️ वय: 46 वर्षे
➡️ ठिकाण: नालासोपारा पश्चिम
➡️ उपचार: तुळिंज रुग्णालय, पण उपचारादरम्यान मृत्यू

🗣️ मित्रांचे म्हणणे –
त्याच्यावर कर्ज होते, ओला-उबेर कंपन्यांकडून वेळेवर पेमेंट मिळत नव्हते. आर्थिक अडचणीतून मानसिक तणाव वाढल्यामुळे त्याने

नालासोपाऱ्यात Ola-Uber कंपनींच्या अनागोंदी व्यवस्थेमुळे ड्रायव्हरने संपवलं जीवन

17/07/2025

पालघर जिल्ह्यात मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

🔍 मात्र पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे की,
हा प्रकार कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ जुलै रोजी घडलेल्या घटनेच्या संदर्भात चुकीचा मेसेज पसरवला जात आहे.

🚨 स्कॉर्पिओ गाडीत मुखवटा घातलेले लोक आणि मुलांशी संवादाचा प्रयत्न – हे सगळं अफवांच्या जोरावर पसरवण्यात आले आहे.
👉 पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचं आणि अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

👮 “पोलिसांवर विश्वास ठेवा, अफवांपासून सावध राहा.”

पालघरमध्ये अपहरणाच्या अफवा! पोलीस अधीक्षकांचा स्पष्ट इशारा










16/07/2025

विरार – महापालिकेच्या फुटबॉल स्पर्धेत गोंधळाचं वातावरण!

महापालिकेच्या तर्फे आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेत नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसून आला.
👉 मैदानाची तयारी, वेळापत्रक आणि सोयीसुविधांमध्ये घोळ झाल्याने खेळाडू आणि प्रेक्षक नाराज झाले.

📍 या परिस्थितीवर तातडीने आ. स्नेहा दुबे यांनी लक्ष घातले आणि स्पर्धेचे मैदान दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला.
या हस्तक्षेपामुळे खेळाडूंमध्ये दिलासा आणि आयोजकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे










Address

Vasai

Alerts

Be the first to know and let us send you an email when HP Live News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to HP Live News:

Share