25/05/2025
पगार ₹१.२५ लाख/महिना ते आयुष्य जगण्याची भ्रांत..
ही गोष्ट माझ्या जेवणापेक्षा मोठी होती.
ती एक जीवनाची शिकवण होती.
काल मी Subway वरून जेवण ऑर्डर केलं – एक पनीर टिक्का सॅंडविच, बिंगो चिप्स, आणि ओट-रेझिन कुकीज.
जेव्हा ऑर्डर आली, तेव्हाच पॅकेट पाहून समजलं – सॅंडविच आलंय, पण चिप्स आणि कुकीज गायब आहेत.
मी डिलिव्हरी रायडरला सांगितलं, “भाऊ, चिप्स आणि कुकीज नाहीयेत.”
तो थोडा अडखळत म्हणाला, “सर, कृपया रेस्टॉरंट किंवा Zomato ला कॉल करा.”
मी Subway ला फोन केला. त्यांनी चूक मान्य केली आणि सांगितलं, “रायडरला परत पाठवू शकता का? आम्ही त्याला ₹२० देऊ.”
पण इथे ट्विस्ट आहे — नियमाप्रमाणे रायडर परत जायला बांधील नाही, कारण त्याला पगार Zomato कडून मिळतो, Subway कडून नाही.
पण त्या माणसानं, त्या हिर्यानं, अगदी नम्रतेनं म्हटलं:
“सर, ग्राहक समाधानी असला पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे.”
तो मला ग्राहक म्हणून पाहत नव्हता.
तो फक्त 'योग्य ते' करणं महत्त्वाचं मानत होता.
तो परत गेला, हरवलेली वस्तू घेऊन आला, हसत आला आणि Subway कडून मिळणारे ₹२० सुद्धा नाकारले.
तो म्हणाला:
“देवाने मला खूप काही दिलंय. दुसऱ्याच्या चुकीसाठी मी पैसे का घ्यावे?”
मग त्याने त्याची कथा सांगितली... आणि अंगावर शहारे आले.
तो एकेकाळी Shapoorji Pallonji मध्ये कंस्ट्रक्शन सुपरवायझर होता, व्यवस्थापक पदाकडे प्रगती करत होता –पगार ₹१.२५ लाख/महिना.
पण एका कार अपघातानं सगळं बदलून टाकलं.
त्याचा डावा हात आणि पाय अधू झाले.
नोकरी गेली.
चालणं अशक्य झालं.
आणि काही काळ आशा सुद्धा हरवली.
मग Zomato आयुष्यात आलं.
त्यांना नवी संधी दिली. नवजीवन दिलं.
तो म्हणाला:
“Zomato मुळे माझं कुटुंब जिवंत आहे.
मी अपंग आहे, पण मला काम मिळालंय. संधी मिळालीय.
Zomato चं नाव मी कुठेही खाली जाऊ देणार नाही.”
त्याची मुलगी आज दंतवैद्यक (dentistry) शिकतेय.
तो केवळ उत्पन्नासाठी नाही, तर तिचं स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी गाडीतून फिरतो.
त्याने आयुष्याला दोष दिला नाही.
तक्रार केली नाही.
पळवाट शोधली नाही.
फक्त हसला...
स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला...
आणि म्हटलं: “देव आहेच माझ्यासोबत. मग चिंता कशाला?”
Deepinder Goyal आणि Zomato टीमला सलाम!
तुम्ही फक्त नोकरी देत नाही, आयुष्याला अर्थ देता.
Persons with Disabilities साठी घेतलेला हा निर्णय खरंच जीवन बदलतो.
आज मला सॅंडविच मिळालं,
पण मनात राहिलं – कृतज्ञता, चिकाटी आणि आशा.
अशा कथा जगासमोर यायला हव्यात.
श्रीपाल गांधी यांची मूळ इंग्रजी पोस्ट