07/09/2017
माहेरची साडी या सिनेमाने अलका कुबल ह्या प्रत्येक गृहिणीच प्रतिबिंब झाल्या . हा सिनेमा म्हणजे प्रत्येक घराघरातील कथा व अलका कुबल म्हणजे प्रत्येक सासुरवाशीण अस चित्र निर्माण झालं होतं . पण त्यानंतर पुन्हा माहेरची साडी सारखा सिनेमा पाहायला मिळाला नाही, पण ती जागा आता भरून निघणार . अगदी कौटुंबिक अशी व आपली आपलीशी वाटणारी प्रत्येक घराघरात घडणारी कथा व स्त्रीच्या आपल्या संसार प्रती त्यागाची कहाणी म्हणजेच, जय सींग निर्मीत व पॅरेलाल शर्मा दिग्दर्शित ," प्रेमाचे नाते ", हा सिनेमा .स्त्री ही अनेक रूपात पाहायला मीळते ती कधी मुलगी असते, तर कधी पत्नी असते , तर ती कधी आई असते , जर तिने तिचे रौद्ररूप धारण केले तर ती चंडिका असते . स्त्रीची ही सर्व रूपे आपल्याला :: प्रेमाचे नाते :: या सिनेमात निशा परुळेकर यांच्या रूपाने पाहायला मिळतील. पती पत्नी यांच्यातील नाजूक धाग्याने बांधलेले प्रेमाचे नाते कसे आतूट ठेवता येईल हे या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल .प्रत्येक कुटुंबाने अगदी सहपरिवार पाहावा असा हा सिनेमा आहे स्त्रीच्या त्यागाची कहाणी म्हणजेच :: प्रेमाचे नाते :: :::तुमच्या भेटीस तुमच्या जवळच्या सिनेमागृहात येत्या आठ सप्टेंबरला येत आहे एक कौटुंबिक सिनेमा * प्रेमाचे नाते * तर जरूर बघा :" प्रेमाचे नाते .":::::::::
कुंदन म्यूजिक प्रस्तुत मराठी चित्रपट प्रेमाचे नाते। ON 08 SEPTEMBER 2017 IN CINEMA