07/11/2020
पाहिल्या दिवशी हरगड - मुल्हेर - मोरा सर करून आल्यावर आम्ही मांगी व तुंगी च्या पायथ्यापाशी असलेल्या गावत जाऊन एकनाथ जी सुर्यवंशी ह्यांच्या घरात जाऊन मस्त जेवलो व मांगी तुंगी च्या पार्किंग लॉट मध्ये जाऊन झोपलो.
सकाळी पाच वाजता उठून आवारा आवारी केली व सहा वाजता उठून मांगी व तुंगी असे दोन शिखर सर करायला सुरवात केली. मांगी शिखर सकाळच्या मस्त गारव्यात गाठता आलं पण तुंगी शिखर सर करताना कडक उन्ह होतं. तसेच खाली उतरता उतरता साधारण 11 वाजले होते. त्या नंतर वाघामबे ला येऊन जावळ पास 10 किलो वजन असलेली बॅग घेऊन भर दुपारी साल्हेर सलोटा गड चढायला सुरवात केली. पुढच्या 2 तासात आम्ही साल्हेर सलोटा च्या खिंडीत पोचलो आणि जेवलो. नंतर मात्रा सलोटा ची खड़ी चढ़ाई होती. पायर्या फारच मोठ्या होत्या. त्यात आम्हाला अंधाराच्या आत साल्हेर किल्ल्यावर ही चढायचे होते. त्यामुळे आरामात गड चढण्याचा पर्याय नव्हता. एकंदर गडाच्या माथ्यावर पोचता पोचता चांगलीच दमछाक झाली.
बालेकिल्ल्यावर जाऊन 10 मि. पडलो. ह्या दहा मिनिटांच्या डुलकेने दिवसभराचा सगळा थकवा गेला आणि पुन्हा साल्हेर पटापट चढण्यासाठी उत्साह दिला 😊
हीच खरी जादू आहे सह्याद्री डोंगर रांगेची, तुम्हाला थकवेल पण पुन्हा उभा ही करेल.
#सह्याद्री
in