
16/12/2023
रान पेटलंय 🤒हवामान बदलाच्या अभूतपूर्व विनाशाच्या उंबरठ्यावर आपण आलोत. आता तरी कवडी दमडीच्या मागे न लागता स्वतःला वाचवा. जागे व्हा! अशी आर्त हाक नुकत्याच दुबई येथे पार पडलेल्या कोप-२८ आंतरराष्ट्रीय परिषदेत ऐकायला मिळाली.
आम्ही दोघे 'बाप-ल्योक' या परिषदेचे साक्षीदार होतो.
मला 'व्हेगननिझम' विषयासंदर्भात पेनलिस्ट म्हणून बोलायची संधी मिळाली.. तर माझ्या मुलाला 'ऍग्री-फूड' प्रकल्पासंबंधी 'युथ पवेलियन' मध्ये ७ मिनिटं बोलायला वेळ दिला गेला. बापलेकांचे परिषदेतील योगदान हे अनेकांच्या कुतूहलाचा विषय होता.
'सद्गुरू' नी आमच्या पाठीवर ठेवलेला हात, माझ्या आयुष्याची 'शिदोरी' ठरला!
COP28 UAE Ved Narayan