AgriCoss farmer

AgriCoss farmer निखिल चव्हाण (M.Sc.

Agri - किटकशास्त्र)
📚 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
🎥 YouTuber | 🔬 Research | 🌾 Crop Consultant
📺 YouTube: 153K+ | 📸 Instagram: 93K+
📩 [email protected]

10/02/2026

जोड घाट्याचा 2 genotype, हरभरा वाण,
अधिक माहिती लवकरच Agricoss Farmer youtube channel वर देण्यात येईल
#हरभरा

09/02/2026

नवीन हरभरा वाण तयार करण्याची पद्धत #हरभ

19/12/2025

sprinkler मधील कचरा मोटर बंद न‌ करता फक्त 1 मिनटात काढा,

टिप:- हि ट्रिक काही शेतकऱ्यांना माहिती असू शकते, पण ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे,

#शेतीमाहिती #शेतकरी #सोयाबिन #हरभरा

16/12/2025

पराटी कचरा पासुन बायोचार कसा तयार करावा,
सध्या बहूतांश जमीनीत सेंद्रिय कर्ब खूप झाल आहे,

कारण
१) शेणखत उपलब्ध नाही
२) पिक अवशेष जाळल्या जाते
३) शेतातील तण बांधावर फेकल्या जाते,

सेंद्रिय कर्ब कमी असण्याचे नूकासन
१) जमिनीची सुपीकता घटते,
२) पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते,
३) पिकांना आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत,
४) सूक्ष्मजीवांची संख्या घटते,
५) मातीची रचना बिघडते,
६) पिकांची वाढ खुंटते, ज्यामुळे उत्पादनात घट येते,

त्यामुळे हा कर्ब वाढविणे अंत्यत आवश्यक झालेला आहे,
यासाठी कापूसाच्या पराटीचा चांगला वापर होवू शकतो

म्हणून शेतातील पराटी cotton shredder ने बारीक करुन शेतात टाकू शकता पण यामध्ये बुरशी आणि अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो,‌ (याला नियंत्रण करण्यासाठी ट्रायक़डर्मा बायो मिक्स टाकावे)

किंवा पराटी पासून बायोचार तयार करू शकता
बायोचार तयार करतांनी काडीकचरा वरील बुरशीचे बिजाणू आणि अळी नष्ट होतात आणि शेतात टाकल्यावर यावर बुरशी वाढत नाही,

त्यामुळे हा पराटी पासून बायोचार तयार करन एक चांगला पर्याय आहे

पण या बायोचारचा pH जास्त आहे म्हणून याचा वापर करण्याआधी हा pH कमी करण आवश्यक आहे

यासाठी समप्रमाणात शेणखत गांडूळ खत किंवा
सल्फर किंवा gypsum टाकू शकता आणि हा pH कमी करू शकता

16/12/2025

स्वच्छ दिसाणरी जमिन बिमार असते आणि काडीकचरा असलेली जमीन निरोगी असते सुपिक असते,

ज्या जमिनीत कुठलाच काडी कचरा नाही त्या जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी असतो, सेंद्रिय कर्ब जिथ कमी तिथ वेगवेगळ्या समस्या येतात,

प्रगत देशातील शेतकरी शेतातील कचरा पिक अवशेष जाळत नाही, तसाच शेतात ठेवतात व पूढच्या पिकाची पेरणी करतात,

किंवा SRT पद्धतीत सुद्धा पिक अवशेष तसेच शेतात ठेवले जातात,

काडीकचरा ने डवरणी करायला समस्या येवू शकते, बुरशी प्रमाण वाढू शकते तो महत्त्वाचा मुद्दा नाही, त्याला ट्रायकोडर्मा, सूडोमोनस बायो मिक्स टाकून नियंत्रण करू शकतो,

पण सेंद्रिय कर्ब आताची सगळ्यात मोठी समस्या आहे त्याला सोडविण्यासाठी हा काडीकचरा मातीमध्ये टाकाव लागणार आहे,
#शेतीमाहिती #शेतकरी #शेती #हरभरा #सोयाबिन
पण

12/12/2025

कापूस कुट्टी लवकर कूजवण्यासाठी उपाय,
कापूस कुट्टी लकवर कूजवण्याच कारण म्हणजे C:N Ratio 20-30:1 पेक्षा जास्त आहे,

त्यामुळे हा लवकर कूजत नाही,
याला कूजवण्यासाठी
1) बारिक बारिक तुकडे करा, जेणेकरून surface area वाढेल,
2) मशागत करून माती आड करून घ्यावे
3) मातीमध्ये ओलावा टिकवून ठेवावा
4) युरीया चा वापर करावा एकरी ३० किलो
५) काही दिवसांनी डिकंपोजर वापरावे
6) ट्रायकोडर्मा मेटारायझिअम ब्यूवेरीया वापरावे जेणेकरून रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढणार नाही

#शेती #शेतकरी #शेतीमाहिती

12/12/2025

शेती विकायची नसते आणि पराटी जाळायची नसते,

कारण पराटी मध्ये शेणखताच्या तूलनेत जास्त प्रमाणात carbon आहे,
त्यामुळे या पराटीला न जाळता याचा शेतात जर वापर केला तर आपल्या मातीचा सेंद्रिय कर्ब वाढयाला मदत होईल, आणि 2-3 वर्षात आपला सेंद्रिय कर्ब सुधारेल,

पण शेणखतातील कर्ब लवकर उपलब्ध होतो
बायोचार मधील कर्ब उशीरा ने हळुहळू उपलब्ध होतो,

पराटी कुट्टी करून गाडले तर बोंड अळी आणि हुमणी चा प्रादुर्भाव वाढू शकतो पण तो महत्त्वाचा मूद्दा नाही,
त्याला आपण नियंत्रण करू शकतो

पण पराटी टाकल्याने जो कर्ब वाढणार आहे,
जी सुपिकता वाढणार आहे तो महत्त्वाचा भाग आहे,
कारण आज सेंद्रिय कर्ब वाढविणे अंत्यत आवश्यक आहे,

बायोचारचा pH जास्त असतो त्याला सामान्य करण्यासाठी सम प्रमाणात शेणखत टाकावे किंवा 50-75 gm sulphur wdg प्रती किलो बायोचार टाकावे
किंवा
gypsum 8 किलो प्रति किलो बायोचार टाकावे (चुनखडी जमीन सोडून)

बायोचार कसा तयार करावा
https://youtu.be/QL3HMOBQUfM

निखिल चव्हाण MSc Agri
[email protected]

#हरभरा #शेतकरी #शेती #

06/12/2025

हरभरा 12-15 क्विंटल टारगेट ठेवल आहे ?
मग फक्त मुख्य अन्नद्रव्य देवून साध्य होणार नाही
पिकाला सुक्ष्मअन्नद्रव्ये micronutrients सुद्धा देणे आवश्यक आहे,
शक्यतो हि फवारणी स्वतंत्र करावी,

पहिली वाढ अवस्थेत
दुसरी फुल सुरू होतांनी

#शेतकरी #शेती #हरभरा

01/12/2025

नवीन हरभरा तणनाशक उगवण पुर्व तणनाशक उगवण पश्चात तणनाशक,
कोणत्या तणनाशकाचा हरभरा काय परिणाम होतो

हरभरा पिकात पेंडामिथिलिन सोडता कोणत्याही तणनाशकाची शिफारस नाही,
पण शेतकरी स्वतःच्या जबाबदारीवर काही तणनाशकाचा वापर करतात.

हरभरा तण नियंत्रण करण्याची चांगली पद्धत
१) पेरणी आधी जमिन ओलवून सोयाबीन व ईतर तणाची उगवण करून घेणे व वखरणी करून पेरणी करने
याने हरभरा उगवण सुद्धा चांगली होते

२) डवरणी आणि निंदन करने, जमिनीची मशागत झाल्याने पिकाची वाढ चांगली होते

#शेतकरी #शेती

29/11/2025

Sprinkler मधून ट्रायकोडर्मा NPK जिवाणू सोडतांनी मोटर प्रेशर ने पाणी वापस पंपात येतो का
पंप बंद असला तरी sprinkler पाईप च पाणी परत पंपात येत नाही,
#शेतकरी #शेती

27/11/2025

हरभरा पहिली फवारणी, मर रोग उपाय जबरदस्त बुरशीनाशक #शेतकरी #शेती

26/11/2025

आता शेतात जाण्याची गरज नाही,
कारण आता आपण देशातील कोणत्याही कोपऱ्यातून
फक्त मोबाईलनेच शेतातील मोटर आणि valve चालू किंवा बंद करू शकतो, पिकाला पाणी आणि पाण्याबरोबर खत नियोजन करू शकतो,

यासाठी सतत फोन करण्याची सूद्धा गरज नाही
फक्त एकदा autofarm App वर पाणी कधी आणि किती मिनिट द्यायच हे schedule करा (उदा. 20 मिनट)
त्यांनतर त्यावेळेवर मोटर आणि valve Automatic चालू होईल, आणि schedule वेळेपर्यंत पाणी देईल (उदा. 20 मिनट)

जर Schedule वेळेआधी विज गेली (उदा. 15 मिनट)
तर परत विज आल्यावर मोटर आणि valve Automatic चालू होणार आणि राहिला वेळ पूर्ण करणार,(राहिलेला 5 मिनट)
आणि यासाठी परत मोबाईल App उघडण्याची गरज नाही,


📱 7391 08 2400
#शेतकरी #शेती #द्राक्ष #आंबा #पेरूउत्पादक🍐👑

Address

Yavatmal
445201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AgriCoss farmer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AgriCoss farmer:

Shortcuts

Share

Category