26/10/2025
आज यवतमाळ येथे जिल्हा शिवसेना आयोजित “शिवसंकल्प” पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराला शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथराव शिंदे साहेबांनी ऑनलाईन पद्धतीने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता ही शिवसेनेची संपत्ती आहे. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना नेहमी महत्त्व द्यावे. सर्वसामान्यांना पक्ष आपुलकीचा, त्यांचा हक्काचा आधार वाटेल असे कार्य पदाधिकाऱ्यांनी करावे.
शिवसेना ही कार्यकर्त्यांची संघटना आहे. इथे कोणीही मोठा नाही, फक्त कार्यकर्ता मोठा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवा, तो संकटात असताना त्याला मदत करा. सर्व खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख यांनी कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे आणि त्यांना मजबूत केले पाहिजे.
राज्यातील शेतकरी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या सरकारने बळीराजाला कधीच वाऱ्यावर सोडले नाही. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. दसरा मेळाव्यात केलेल्या घोषणांची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांच्या घरात लग्नकार्य आहे, त्यांची यादी तयार करा, त्यांच्या लग्नाची जबाबदारी शिवसेना खांद्यावर घेणार असून ती पूर्ण केली जाईल.
शिवसेना ही रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना आहे. लोकांना रस्त्यावर काम करणारा शिवसैनिकच आवडतो, त्यामुळे रस्त्यावर उतरून काम करा. सर्वांनी “एकनाथ शिंदे” म्हणून गावोगावी काम करायचे आहे. वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आपल्यावर आहे; त्यांचे स्वप्न आपण पूर्ण करायचे आहे.
आपल्या सरकारने थांबलेले विकासप्रकल्प मार्गी लावले आहेत. लोकाभिमुख आणि कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. "लाडकी बहीण" यांसारख्या योजना सुरू केल्या आहेत. “काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
येणाऱ्या निवडणुका नियोजनबद्ध पद्धतीने जिंकायच्या आहेत. याद्यांचा अभ्यास करा, मतदार शोधा, त्यांच्यावर सातत्याने काम करा आणि मतदान कसे वाढेल यावर लक्ष केंद्रित करा. विजय आपलाच आहे, पण गाफील राहू नका. जिथे पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका राहिल्या असतील त्या तातडीने करा. सर्वांना विश्वासात घेऊन काम करा. घराघरात शिवसेना पोहोचविण्याचे ध्येय ठेवून काम करा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मा. ना. प्रतापराव जाधव आणि पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढविले.
या कार्यक्रमाला शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी मंत्री जगदीश गुप्ता, डॉ. राजर्षीताई अहिरराव, विश्वनाथ केळकर, माजी आमदार सहसराम कोरोटे, संजय रायमूलकर, डॉ. शशिकांत खेडकर, लोकसभा समन्वयक विश्वास नांदेकर, यवतमाळ जिल्हा निरीक्षक तथा माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, पश्चिम विदर्भ समन्वयक परागभाऊ पिंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधरकाका मोहोड, ज्येष्ठ नेते जीवनदादा पाटील, विष्णू बंबाळे, यवतमाळ-वाशीम लोकसभा समन्वयक उमाकांत पापीनवार, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, जिल्हाप्रमुख राजुदास जाधव, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कालिंदाताई पवार, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशालीताई मासाळ, दर्शनाताई इंगोले, ज्योतीताई वाघाडे, प्रीतीताई बंड, युवासेना लोकसभा अध्यक्ष विशाल गणात्रा, उपाध्यक्ष सुमित खांदवे, युवासेना जिल्हाप्रमुख आकाश राठोड, संजय हातगावकर, सुदाम पवार, सुरेश चिंचोळकर, माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल तसेच उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Shivsena - शिवसेना