08/09/2026
बारामतीत रविवारी दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडली. बारामती विमानतळ परिसरात आपत्कालीन लँडिंग करताना एक शिकाऊ विमान शेतात कोसळल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
विमान नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. दुर्घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.
बारामती विमानतळावर यापूर्वीही विमान दुर्घटनांच्या घटना घडल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांत तिसऱ्यांदा विमान अपघाताची घटना घडल्याने बारामती विमानतळावरील विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Baramati: Another plane crash was reported in Baramati on Sunday afternoon after a trainee aircraft reportedly crashed into a field while making an emergency landing near Baramati Airport.
The exact cause of the crash is not yet known. Authorities rushed to the spot following the incident, and an investigation into the cause of the accident is underway.
The incident has once again raised concerns over aviation safety at Baramati Airport, as this is reportedly the third plane accident in the area in the past eight months.