Life With Rasika

Life With Rasika नमस्कार मंडळी , या पेज च्या माध्यमातून मी तुम्हाला जवळून अमेरिका कशी आहे ते दाखवणार आहे.

Please support my YouTube channel Link below

https://youtube.com/?si=-SRcsse_paEEeung


Instagram:

09/07/2026

एका मराठी माणसाच्या स्वप्नाला तुम्ही दिलेलं हे भरभरून प्रेम पाहून खरंच मन भरून आलं! 🥹❤️ तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार! 🙏

Food Truck पासून सुरू झालेला आमचा प्रवास आज Qissa पर्यंत येऊन पोहोचलाय… आणि या संपूर्ण प्रवासात तुम्ही दिलेली साथ आमच्यासाठी खूप खास आहे. ❤️

📍 Qissa
146 Applegarth Road, Monroe Township, New Jersey 🇺🇸

New Jersey मध्ये असाल तर Qissa ला नक्की भेट द्या. तुमची वाट पाहतोय! 🥰



IndianRestaurantNJ IndianFoodNJ MarathiInUSA FoodTruckToRestaurant

09/04/2026

एका छोट्याशा Food Truck पासून सुरू झालेला आमचा किस्सा… आज स्वतःच्या Restaurant पर्यंत येऊन पोहोचलाय! 🥹❤️

Qissa च्या नव्या प्रवासाची सुरुवात आम्ही सत्यनारायणाच्या पूजेने केली 🙏 आणि संध्याकाळी आमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणी आणि आप्तेष्टांसोबत झालं Qissa चं Soft Opening. ✨

आमचा Food Truckचा प्रवास, त्यामागची धडपड आणि मेहनत जवळून पाहिलेली हीच माणसं आज Qissa मध्ये उभी राहून आमचं आणि आमच्या foodचं भरभरून कौतुक करत होती… तो क्षण खरंच खूप खास होता. ❤️

आज वाटतंय—इतक्या वर्षांची मेहनत सार्थकी लागली! 🙏

हा तर फक्त Qissa चा पहिला अध्याय आहे…
आता पुढचे अनेक सुंदर किस्से तुमच्यासोबत अनुभवायचे आहेत. ❤️
Qissa Indian Cuisine



Indian restaurant in USA , new restaurant opening, grand opening ,food truck, burgers for u, Indian food , restaurant journey

08/28/2026

आज थोडंसं मनातलं… ❤️

आज रक्षाबंधन… आम्ही आमच्या माणसांपासून हजारो मैल दूर आणि मला सख्खा भाऊही नाही.
पण आयुष्याने मला अशा बहिणी दिल्या आहेत, ज्या प्रत्येक सुख-दुःखात भावासारख्याच खंबीरपणे आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत…

कदाचित म्हणूनच माझ्यासाठी रक्षाबंधनाचा अर्थ फक्त राखीपुरता कधीच मर्यादित राहिला नाही. ❤️



Life with Rasika❤️

08/26/2026

अमेरिकेत आम्ही सुरू केलं आमचं स्वतःचं Indian Restaurant! 🇺🇸🇮🇳❤️

घरातून Catering करण्यापासून सुरू झालेला आमचा प्रवास… त्यानंतर Burgers For U Food Truck आणि आता काही वर्षांपूर्वी पाहिलेलं मोठं स्वप्न प्रत्यक्षात उतरतंय — आमचं स्वतःचं Indian Restaurant, QISSA! 🥹❤️

Qissa म्हणजे कहाणी… आणि आमच्यासाठी ही घरच्या kitchen पासून restaurant पर्यंत पोहोचलेल्या स्वप्नाची कहाणी आहे. ✨

आजवर Food Truck ला जसं भरभरून प्रेम दिलंत, तसंच प्रेम आणि आशीर्वाद आमच्या या नव्या प्रवासालाही द्या. ❤️🙏

एका नव्या Qissa ची ही फक्त सुरुवात आहे! ✨



Indian Restaurant in America, Indian Restaurant in New Jersey, Indian Food in USA, Indian Cuisine in America, Restaurant Opening Announcement, Indian Food Lovers, Indian Business in USA, New Indian Restaurant

08/25/2026

Took Adway for school shopping, there was a 20%discount, and before I could even pull out my phone, he had the final price — and explained the math step by step.

That’s when it hit me: Cuemath’s been teaching him how to think, not just memorize. His coach asks questions until he figures it out himself, builds real understanding. Now he uses it in real life, not just worksheets. No more pushing him to attend class either — he actually wants to go.

✨ Try a free evaluation class 🔗 Link in bio or comment “MATH”

08/23/2026

मुद्दा फक्त एका iPhone चा नाही… मुद्दा आहे आपल्या मुलांना ‘नाही’ ऐकायला, थांबायला आणि स्वतःच्या मेहनतीने काहीतरी मिळवायला शिकवण्याचा.

अमेरिकेत अनेक college-going मुलं summer jobs किंवा part-time jobs करतात. माझ्या मुलाच्या अनुभवातूनही मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली — स्वतः कमावायला लागल्यावर पैशाकडे आणि वस्तूंच्या किमतीकडे पाहण्याची नजर बदलते.

मुलांना सगळं देणं म्हणजेच प्रेम नाही… कधी कधी त्यांना स्वतःच्या मेहनतीने काहीतरी मिळवू देणं, हेसुद्धा तितकंच मोठं प्रेम असतं. ❤️



तुम्हाला काय वाटतं? मुलांना लहान वयापासून part-time काम करण्याची सवय असावी का?

08/22/2026

NRI = Not Returning Immediately 😂🇮🇳🇺🇸

“येनाराय...येनाराय … लवकरच भारतात येनाराय !”
असं म्हणता म्हणता वर्षं निघून गेली…
आणि म्हणून आम्ही NRI झालो! 😂

08/21/2026

आमच्या वॉशिंग्टन ट्रिपची सांगता अशी होईल याची आम्हाला कल्पना पण नव्हती😱

08/21/2026

Happy 15th Birthday, Adway! 🎂❤️

आज तुझ्या वाढदिवशी स्वामींकडे एवढीच प्रार्थना — तुझी सगळी मोठी स्वप्नं पूर्ण होवोत, तू खूप यशस्वी हो आणि कायम असाच प्रेमळ आणि संवेदनशील राहा. 🙏❤️

08/18/2026

दीड वर्षांनी आई पुन्हा अमेरिकेत आल्या. 🇮🇳✈️🇺🇸
इतक्या लांबचा प्रवास, तोही या वयात एकट्याने करण्यासाठी लागणारा त्यांचा आत्मविश्वास आणि धैर्य खरंच कौतुकास्पद आहे.
आणि Carla चा आनंद तर बघण्यासारखा! 🐾❤️
हे मुके जीव बोलू शकत नाहीत, पण आपलं माणूस कोण आहे, त्याची किती दिवसांनी भेट होतेय… हे त्यांना अगदी बरोबर कळतं.

काही भेटी फक्त आनंद देत नाहीत…
त्या घराला पुन्हा ‘घरपण’ देतात. ❤️

Address

New York, NY

Alerts

Be the first to know and let us send you an email when Life With Rasika posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Life With Rasika:

Shortcuts

Share