Marathi Fakt

Marathi Fakt Marathi Fact Channel
Any Copyright issues please contact - [email protected]

BJP आयेगी, जेब खाली होगी पण बीवी खुश नजर आयेगी!इचलकरंजीचा विकास साहेबांच्या पाठीवर!
08/09/2025

BJP आयेगी, जेब खाली होगी
पण बीवी खुश नजर आयेगी!

इचलकरंजीचा विकास साहेबांच्या पाठीवर!

जेव्हा आपण प्रवासी विमानात बसतो, तेव्हा ते साधारणपणे १० ते १२ किलोमीटर (म्हणजेच ३५,००० ते ४०,००० फूट) उंचीवर उडत असते.या...
08/09/2025

जेव्हा आपण प्रवासी विमानात बसतो, तेव्हा ते साधारणपणे १० ते १२ किलोमीटर (म्हणजेच ३५,००० ते ४०,००० फूट) उंचीवर उडत असते.
यालाच क्रूझिंग आल्टिट्यूड म्हणतात.

👉 इतक्या उंचीवर हवेचा दाब कमी असतो, त्यामुळे विमान दाब नियंत्रित केलेले असते, जेणेकरून प्रवाशांना श्वास घेण्यात अडचण होऊ नये.

हवेची घनता कमी असल्यामुळे विमानाला गती (स्पीड) टिकवणे सोपे जाते आणि इंधनाची बचतही होते.

आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये द्या... 😆
08/09/2025

आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये द्या... 😆

दिवस-रात्र एक करून काम करणारा नोकरदार वर्ग एकाच गोष्टीची आतुरतेने वाट बघत असतो, ते म्हणजे पदोन्नती आणि पगारवाढ. अशावेळी ...
08/09/2025

दिवस-रात्र एक करून काम करणारा नोकरदार वर्ग एकाच गोष्टीची आतुरतेने वाट बघत असतो, ते म्हणजे पदोन्नती आणि पगारवाढ. अशावेळी पदोन्नती नाकारल्यानंतर अनेकजण निराश होतात. पण, एका महिलेने याचा असा काही बदला घेतला, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. बॉसने पदोन्नती नाकारल्यानंतर या महिलेने थेट कंपनीच विकत घेतली आणि ज्या बॉसने कधी तिला सीईओ बनवण्यास नकार दिला होता, त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवून धडा शिकवला.

बॉसला धडा शिकवणारी ही महिला अमेरिकेतील व्यावसायिक ज्युलिया स्टीवर्ट आहे. एकेकाळी त्या 'Applebee's' या कंपनीच्या अध्यक्ष होती. त्यावेळी त्यांना वचन देण्यात आले होते की, जर त्यांनी कंपनीचा नफा वाढवला, तर त्यांना सीईओ बनवले जाईल. यानंतर, ज्युलियाने एक टीम तयार केली आणि रात्रंदिवस मेहनत करून तीन वर्षांत कंपनीला तोट्यातून फायद्यात आणले.

मात्र, कंपनीने जेव्हा वचन पूर्ण करण्याची वेळ आली, तेव्हा ज्युलियाच्या बॉसने तिला दिलेले वचन मोडले आणि त्यांना पदोन्नती देण्यास साफ नकार दिला. या फसवणुकीमुळे निराश होऊन ज्युलिया यांनी 'Applebee's'मधून राजीनामा दिला. कंपनी सोडल्यानंतर ज्युलियाने 'इंटरनॅशनल हाऊस ऑफ पॅनकेक' (IHOP) कंपनीत काम करायला सुरुवात केली. येथे त्यांनी पाच वर्षे काम केले आणि कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

जेव्हा IHOPचे संचालक मंडळ नवीन कंपनी खरेदी करण्याचा विचार करत होते, तेव्हा ज्युलियाने त्यांना आपली जुनी कंपनी 'Applebee's' खरेदी करण्याचा सल्ला दिला. नंतर 'Applebee's' कंपनीला २.३ बिलियन डॉलर्समध्ये (म्हणजे सुमारे २०,२४३ कोटी रुपये) खरेदी करण्यात आले. अशा प्रकारे ज्युलिया पुन्हा आपल्या जुन्या कंपनीच्या बॉस बनल्या. आपल्या जुन्या कंपनीच्या बॉस बनल्यानंतर ज्युलियाने सर्वात आधी त्यांनी जुन्या बॉसला म्हणजेच सीईओला बाहेरचा रस्ता दाखवला

साधारणपणे एखादा किरकोळ वादसुद्धा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतो आणि काही वेळा तर गोळीबारासारख्या घटनाही घडतात. पण उत्तर प्रद...
08/09/2025

साधारणपणे एखादा किरकोळ वादसुद्धा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतो आणि काही वेळा तर गोळीबारासारख्या घटनाही घडतात. पण उत्तर प्रदेशात एक असं गाव आहे, जिथे गेल्या तब्बल ३७ वर्षांपासून कोणताही वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेलाच नाही. इथं प्रत्येक वाद-विवाद किंवा मतभेद गावातील लोक आपसात चर्चा करून, परस्पर सामंजस्याने सोडवतात. ही अनोखी मिसाल शाहजहांपूर जिल्ह्यातील सिधौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नियामतपूर गावाने घालून दिली आहे.

नियामतपूर ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या सुमारे १,४०० आहे. या गावात मजरा गाव, बिजलीखेड़ा आणि नगरिया बहावही समाविष्ट आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १९८८ पासून आजतागायत गावातून कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. जे काही वाद झाले, ते गावातील ज्येष्ठ मंडळी आणि पंचायतीच्या मदतीने सोडवले गेले.

आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेणे. फक्त आणि फक्त भगवंताला डोळे भरून पाहण्यासाठी ऊन, पावसाची तमा न बाळगता वारकरी वारी ...
06/09/2025

आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेणे. फक्त आणि फक्त भगवंताला डोळे भरून पाहण्यासाठी ऊन, पावसाची तमा न बाळगता वारकरी वारी करतात. अशीच वारकऱ्यांच्या भक्तीची गाथा दर्शवणारा ‘पंढरीची वारी’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलंच. अतिशय सुपरहिट अशा या सिनेमाची ‘शापित सिनेमा’ अशी ओळख आहे. त्याचे कारण काय ते जाणून घेऊया.

1988 साली रिलीज झालेला हा सिनेमा आजही आषाढी एकादशीला आवर्जून टीव्हीवर दाखवला जातो. यामध्ये बाळ धुरी, जयश्री गडकर, राजा गोसावी आणि अशोक सराफ यांसारख्या मातब्बर कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. कधीकाळी सुपरहिट ठरलेला हा सिनेमा अनेकांसाठी शाप ठरला. माहितीनुसार, या सिनेमाच्या शुटिंगवेळी टीमला आर्थिक तसेच मानसिक नुकसान सहन करावे लागले होते.

या सिनेमात पंढरीची वारी दाखवण्यासाठी आळंदी ते पंढरपूर असे वारीचे खरेखुरे शूटिंग करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातही शूट केले गेले. या सिनेमात बाळ धूरी मुख्य भूमिकेत झळकले होते. पण मुळात ही भूमिका अरुण सरनाईक साकारणार होते. धक्क्याची बाब अशी की, शूटिंगच्या पहिल्याच दिवशी अरुण सरनाईक यांचा अपघाती मृत्यू झाला. सिनेमाचे शूटिंग रखडले.. पण तेव्हा वारी चुकली असती तर शूटिंगसाठी वर्षभर थांबावे लागले असते आणि म्हणून या भूमिकेसाठी आधी श्रीकांत मोधेंना विचारण्यात आले. आधी होकार देऊन नंतर काही कारणांनी त्यांनी हा सिनेमा नाकारला. मग ही भूमिका बाळ धुरी यांच्या पदरात पडली.

असेच काहीसे जयश्री गडकर यांच्या भूमिकेबाबतही झाले. त्यांच्याआधी ही भूमिका रंजना देशमुख साकारत होत्या. सिनेमाचं 70 टक्के शूटिंगही झालं. पण दुर्दैवाने एका अपघातात रंजना यांनी आपले पाय गमावले. त्यामुळे या भूमिकेत जयश्री गडकर यांना घेऊन सिनेमा रि- शूट झाला. या सगळ्यात सिनेमाच्या निर्मात्यांना तब्बल 18 लाखाचे नुकसान झाले. पण त्यांनी हार न मानता ‘पंढरीची वारी’ आणि सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. थिएटरमध्ये अभूतपूर्व यश मिळवूनही घडलेल्या घटनांमुळे आजही या सिनेमाला बरेच लोक शापित मानतात.

राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरातून तब्बल 1 कोटी रुपयांचा सोने आणि हिर्‍यांनी सजवलेला कलश चोरीला गेल्याची खळबळजनक घटन...
06/09/2025

राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरातून तब्बल 1 कोटी रुपयांचा सोने आणि हिर्‍यांनी सजवलेला कलश चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

अखेरच्या क्षणी लाईक करायला स्वतःला थांबवू नका. बाप्पा चाललास पण मन तयार होत नाही गुडबाय म्हणायला!
06/09/2025

अखेरच्या क्षणी लाईक करायला स्वतःला थांबवू नका.
बाप्पा चाललास पण मन तयार होत नाही गुडबाय म्हणायला!

बिहारमधील एका शिक्षिकेने तिच्या पहिल्या पगारातून झोपडपट्टीत राहणाऱ्या १२० मुलांना स्कूल बॅग्ज वाटले, पण सोशल मीडियावर अर...
06/09/2025

बिहारमधील एका शिक्षिकेने तिच्या पहिल्या पगारातून झोपडपट्टीत राहणाऱ्या १२० मुलांना स्कूल बॅग्ज वाटले, पण सोशल मीडियावर अर्धनग्न झाल्याशिवाय लाईक मिळत नाही.

बॉम्ब हल्ल्याची धमकी देणाऱ्या आरोपीला २४ तासांत अटकमुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाईनवर संदेश पाठवून मुंबईला ब...
06/09/2025

बॉम्ब हल्ल्याची धमकी देणाऱ्या आरोपीला २४ तासांत अटक

मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाईनवर संदेश पाठवून मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस मुंबई पोलिस गुन्हे शाखेने नोएडा, उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे.

कृपया नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, मदतीसाठी थेट पोलिसांशी संपर्क साधावा.

06/09/2025

अजित पवारांना फ़ोन करणारे हेच ते तालुका प्रमुख बाबाराजे जगताप आहेत का?
ह्यांच्या हातात काय आहे ? अश्या लोकांसाठी अजित पवारानी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावले?

- Mrs Anjali Damania

मराठा आरक्षणावर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया...
06/09/2025

मराठा आरक्षणावर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया...

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Fakt posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share