माझे माहेर पंढरी Maze Maher Pandhari

माझे माहेर पंढरी Maze Maher Pandhari #किर्तन #भजन #प्रवचन #अभंग #भक्तीगीते #माझेमाहेरपंढरीmazemaherpandhari

18/09/2025

बरोबर आहे ना....?

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*    *गुरुवार दि- १८ सप्टेंबर २०२५*            *🌹काकडा आरती🌹*       ...
18/09/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*गुरुवार दि- १८ सप्टेंबर २०२५*
*🌹काकडा आरती🌹*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
https://amzn.to/4lMELyy

पदोपदीं निजपद गेलें वो ।कर्म संचित सकर्म जालें वो ॥१॥तेथें आपुलें नाठवे कांहीं वो ।आपाआपणा न संपडे डाईवो ॥२॥श्रीगुरुप्रस...
17/09/2025

पदोपदीं निजपद गेलें वो ।
कर्म संचित सकर्म जालें वो ॥१॥
तेथें आपुलें नाठवे कांहीं वो ।
आपाआपणा न संपडे डाईवो ॥२॥
श्रीगुरुप्रसादें ज्ञान बोधु झाला वो ।
नव्हे तें ठाउकें पडिलें माय वो ॥३॥

अर्थ:-

क्षणोक्षणी परमात्मचिंतनाचा ध्यास घेतल्यामुळे. मी परमात्मपदाला प्राप्त झाले. व त्या बोधाने माझे बरेवाईट सर्व संचित कर्म सत्कर्मच झाले.त्या परमात्म्याचा यथार्थ बोध झाल्यामुळे माझ्या ठिकाणचा देहात्मभाव नाहीसा होऊन गेला. इतकेच काय देहात्मभाव नष्ट झाला याचीही आठवण मला राहिली नाही.याला कारण श्रीगुरु निवृत्तिरांयाची कृपा त्या कृपेनेच मला ब्रह्मात्मबोध झाला. त्यामुळे आतापर्यंत माहित नसलेला परमात्मा मला कळला. असे माऊली सांगतात.

17/09/2025

फक्त आणि फक्त... 🙏🙏

17/09/2025

सांगा.....

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*       *बुधवार दि- १७ सप्टेंबर २०२५*            *🌹काकडा आरती🌹*     ...
17/09/2025

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*बुधवार दि- १७ सप्टेंबर २०२५*
*🌹काकडा आरती🌹*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
*🌹इंदिरा एकादशी🌹*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
https://amzn.to/41SnVHu

व्यक्ताव्यक्त दिठी घालूनि कल्पांताकल्पना नुरोचि तेथें आतां ॥१॥पाहाणियाचा प्रपंचु पाहता ।निमाला कवणा बोलु ठेऊं आतां ॥२॥दु...
16/09/2025

व्यक्ताव्यक्त दिठी घालूनि कल्पांता
कल्पना नुरोचि तेथें आतां ॥१॥
पाहाणियाचा प्रपंचु पाहता ।
निमाला कवणा बोलु ठेऊं आतां ॥२॥
दुजें ह्मणो जाय तंव मी माजी हारपे ।
नवर्णवे तुझी सत्ता रया ॥
गोडियेचें गोडपण गोडि केविं मिरवे ।
तुजमाजी असतां ते वेगळीक रया ॥३॥
निशीं जागरणीं निमाला कीं तंतुचि तंतीं आटला ।
रसीं रसु दुणावला तुझ्या ठाई ॥४॥
तेथें कल्पनेसि मूळ विरोनियां पाल्हाळ ।
तैसें उभय संदीं तूं विदेहीरया ॥५॥
या लागीं बापरखुमादेविवरु विठ्ठलु
उदारु दिठीचे दिठीं माजी अंजन ।
सुखीं सुख दुणावलें चौघा पडिले मौन्य ।
येणें निवृत्तिरायें खुणा दाऊनियां सकळ ।
डोळ्यांविण दिठी प्रबळ रया ॥६॥

अर्थ:-

व्यक्ताव्यक्त अशा परमात्मस्वरुपावर पुष्कळ वेळ दृष्टि ठेवली असता त्याठिकाणी कल्पनाच उरत नाही? विचार करता करता पाहाणाऱ्याचा प्रपंचच नाहीसा होऊन जातो. आता त्याचा बोल कोणावर ठेवावा. परमात्मा आपल्याहून निराळा आहे. असे म्हणायला जावे तर आपला मीपणाच तेथें हरपून जातो. अशा परमात्म्याची सत्तेच वर्णन करता येत नाही. आनंदरुप असलेल्या परमात्म्याला मी आनंदरुप आहे असे कसे सांगता येईल? अशा परमात्म्यामध्ये मी लय पावलो असल्यामुळे मी तरी त्याचे वर्णन कसा करु शकेल. ज्याप्रमाणे पटांत तंतू आटतात. त्याचप्रमाणे जागृत, स्वप्न, सुषुप्ति आदि भाव तुझ्यामध्ये आटून गेले. त्यामुळे रसस्वरुप तुझ्या ठिकाणी रसरुप आनंद दुणावला आहे.कल्पनेचे पाल्हाळ तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी समूळ आटून गेले. त्यामुळे जीव परमात्म्याच्या ऐक्य बोधांत तूं विदेही आहेस? माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते उदार आहेत. त्यांनी जर आपल्या ज्ञानाचे अंजन भक्ताच्या डोळ्यांत घातले. तर ब्रह्मसुख दुप्पट होऊन जाईल. याचा अर्थ सुखस्वरुप स्थिती होईल. ज्याच्या स्वरुपाविषयी चारी वेदांना मौन धरावे लागते. अशा परमात्मस्वरूपाविषयी निवृत्तिरायांनी सर्व खूण दाखवून चर्मचक्षु वांचून माझी ज्ञानदृष्टि प्रबल केली.असे माऊली सांगतात

Address

Pandharpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझे माहेर पंढरी Maze Maher Pandhari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share