SSD LIVE

SSD LIVE https://www.youtube.com/
सांप्रदायिक,सामाजीक,शैक्षणीक तसेच राजकीय क्षेत्रातील व विविध कार्यक्रमाचे प्रसारण SSD LIVE

🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली 🕯️पत्रकार श्री रमेश मुलगीर यांचा एकुलता एक मुलगा रवि रमेश मुलगीर यांचे हैदराबाद येथील फार्मास्यु...
19/08/2026

🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली 🕯️

पत्रकार श्री रमेश मुलगीर यांचा एकुलता एक मुलगा रवि रमेश मुलगीर यांचे हैदराबाद येथील फार्मास्युटिकल कंपनीमध्ये वायूगळतीच्या दुर्घटनेत रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.

रवि यांच्या अकाली निधनाने मुलगीर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा एकुलता एक मुलगा गमावल्याने परिवारावर मोठे दुःख ओढवले आहे.

रवि यांच्या आत्म्यास चिरंतन शांती लाभो आणि मुलगीर परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही श्री महाविष्णु चरणी भावपूर्ण प्रार्थना. 🙏

🕯️ अंत्यविधी

गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी
सकाळी ८.०० वाजता
शेळगाव येथील स्मशानभूमी येथे अंत्यविधी होईल.

शोकाकुल 🙏

समस्त मुलगीर परिवार
शेळगाव महाविष्णु, ता. सोनपेठ, जि. परभणी

ॐ शांती 🙏🕯️

पावसासाठी भस्मासुरास वेदमंत्रोच्चारात अभिषेक; लापसीचा नैवेद्य!SSD LIVE : शेळगाव महाविष्णुसह परिसरात तसेच सर्वत्र चांगला ...
16/08/2026

पावसासाठी भस्मासुरास वेदमंत्रोच्चारात अभिषेक; लापसीचा नैवेद्य!

SSD LIVE : शेळगाव महाविष्णुसह परिसरात तसेच सर्वत्र चांगला पाऊस पडावा, शेतशिवार हिरवेगार व्हावे आणि बळीराजाच्या पिकांना पावसाची साथ मिळावी, यासाठी शेळगाव महाविष्णु येथील श्री भस्मासुर भगवंताच्या मंदिरात रविवारी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी श्री भस्मासुर भगवंताची श्री विश्वंभर देव लोंढे यांच्या मंत्रोपचारात विधिवत पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर भस्मासुर देवाला लापसी म्हणजेच गव्हाची खीर व कढीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.

या धार्मिक विधीदरम्यान शेळगाव महाविष्णुसह परिसरात आणि सर्वत्र पाऊस पडावा, शेतकरी बांधवांच्या पिकांना पाण्याची मुबलक साथ मिळावी, यासाठी श्री भस्मासुर भगवंतास मनोभावे आर्त विनंती करण्यात आली.

अभिषेक, पूजा व आरतीनंतर शेळगाव महाविष्णु येथील श्री महाविष्णु व श्री महारुद्र भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भजनाच्या माध्यमातूनही पर्जन्यवृष्टीसाठी भस्मासुर भगवंताकडे आर्त साकडे घालण्यात आले.

या धार्मिक कार्यक्रमास भजनी मंडळातील सदस्यांसह गावातील लहान गोपाल, ज्येष्ठ नागरिक व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिभावपूर्ण वातावरणात पूजा-अर्चा व भजनाचा कार्यक्रम पार पडला.

यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत लापसी म्हणजेच गव्हाची खीर व कढी या महाप्रसादाचे पंगती बसवून भाविकांना वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमातून पाऊस बरसावा, शेतीपिकांना जीवदान मिळावे आणि बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी यावी, अशी सामूहिक भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

🌧️🌾 पाऊस बरसू दे, बळीराजा हसू दे; भस्मासुराला लापसीचा नैवेद्य! 🙏शेळगाव महाविष्णु परिसरासह सर्वत्रचांगला व समाधानकारक पाऊ...
16/08/2026

🌧️🌾 पाऊस बरसू दे, बळीराजा हसू दे; भस्मासुराला लापसीचा नैवेद्य! 🙏

शेळगाव महाविष्णु परिसरासह सर्वत्रचांगला व समाधानकारक पाऊस पडावा, शेतशिवार हिरवेगार व्हावे आणि बळीराजाच्या पिकांना भरभरून पाणी मिळावे, यासाठी शेळगाव महाविष्णु येथील श्री भस्मासुर मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी श्री विश्वंभर देव लोंढे यांच्या वेदवाणी मंत्रोच्चाराने भस्मासुरास अभिषेक, पूजा व आरती करण्यात येत आहे, त्यानंतर लापसी अर्थात गव्हाची खीर व कढी यांचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात येणार आहे.

या धार्मिक उपक्रमातून शेळगाव महाविष्णुसह परिसरात चांगला पाऊस पडावा, शेतशिवार हिरवेगार व्हावे आणि बळीराजाच्या कष्टाला पावसाची साथ मिळावी, यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात येणार आहे.

या निमित्ताने गावातील सर्व लहान-थोर, ज्येष्ठ मंडळी, महिला व भाविक भक्तांनी श्री भस्मासुर मंदिर येथे उपस्थित राहून अभिषेक, पूजा, आरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, तसेच पर्जन्यवृष्टीसाठी मनोभावे प्रार्थना करावी, ही नम्र विनंती.

वेळ : दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत

स्थळ : श्री भस्मासुर मंदिर, शेळगाव महाविष्णु

मेघराजा बरसू दे भरभरून, शिवार हिरवेगार होऊ दे आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलू दे, अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात येणार आहे.

विनीत : समस्त गावकरी मंडळ, शेळगाव महाविष्णु

शेळगाव महाविष्णूत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजराशेळगाव महाविष्णू : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शेळगाव महाविष्णू येथे ...
15/08/2026

शेळगाव महाविष्णूत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शेळगाव महाविष्णू : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शेळगाव महाविष्णू येथे विविध शासकीय, सहकारी व शैक्षणिक संस्थांच्या कार्यालयांत तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच गावात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

ध्वजारोहणापूर्वी गावातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीपर घोषणांसह देशभक्तीपर घोषणा देत गावातून प्रभात फेरी काढली. ‘भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गावात सकाळपासूनच देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

शेळगाव ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, महाराष्ट्र ग्रामीण बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, अंगणवाडी केंद्र तसेच कै. बाजीराव देशमुख विद्यालय आदी ठिकाणी संबंधित अधिकारी, पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्रत्येक ठिकाणी ध्वजारोहणापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर श्रीफळ फोडुन ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. उपस्थितांनी तिरंगा ध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे गायन केले.

ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहणास ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत चेअरमन व संचालक मंडळाच्या उपस्थितीत, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत संबंधित बँक अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखान्यातही संबंधित अधिकाऱ्यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक मदन साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे गायन करण्यात आले. त्यानंतर तिरंगा ध्वजाला सलामी देत ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. यानंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताने वातावरणात देशभक्तीचा उत्साह निर्माण झाला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, कै. बाजीराव देशमुख विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’, ‘जन गण मन’ तसेच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतांचे गायन केले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

गावातील विविध शाळा, शासकीय कार्यालये व संस्थांमध्ये तिरंगा ध्वज डौलाने फडकत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘वंदे मातरम्’, ‘जन गण मन’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतांच्या गायनाने परिसरात देशभक्तीचा उत्साह संचारला होता. विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीपासून ते ध्वजारोहणापर्यंत संपूर्ण गावात देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याचा उत्साह दिसून आला. विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

#शेळगाव_महाविष्णू
#स्वातंत्र्यदिन
#१५ऑगस्ट
#स्वातंत्र्यदिन2026
#भारतीयस्वातंत्र्यदिन


#देशभक्ती
#वंदेमातरम्
#जनगणमन
#जयजयमहाराष्ट्रमाझा
#भारतामाता
#महात्मागांधी
#डॉबाबासाहेबआंबेडकर
#प्रभातफेरी



स्व.विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाजीराव देशमुख विद्यालयात विनम्र अभिवादनशेळगाव महाविष्णु : महाराष्ट्र राज्य...
14/08/2026

स्व.विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाजीराव देशमुख विद्यालयात विनम्र अभिवादन

शेळगाव महाविष्णु : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांच्या १४व्या पुण्यतिथीनिमित्त शेळगाव महाविष्णु येथील कै.बाजीराव देशमुख मा.उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी स्व. विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी दर्शन घेत भावपूर्ण आदरांजली वाहिली. आपल्या कार्यकर्तृत्वाने, सर्वसमावेशक नेतृत्वाने आणि जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याने स्व. विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या निधनाला आज १४ वर्षे पूर्ण झाली असली, तरी त्यांच्या कार्याची आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वाची आठवण आजही जनमानसात कायम आहे.

स्व. विलासराव देशमुख यांचे १४ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाला अनेक वर्षे लोटली असली, तरी त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे ते आजही आपल्यातच असल्याची भावना अनेकांच्या मनात कायम आहे. हेच त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे आणि कर्तृत्वाचे मोठेपण आहे.

या अभिवादन कार्यक्रमास पंचायत समितीचे उपसभापती पद्मसिंह देशमुख, मुख्याध्यापक राजकुमार धबडे, अभय दादा देशमुख, देविकांत देशमुख, प्रविण काळे, बुरान सय्यद, ज्ञानेश्वर तळेकर, विष्णुकांत बागवाले, अंकुश धबडे, बाळू कांदे, खॉजा कुरेशी,गणेश निरस यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद भक्तराज गांगर्डे, महेश जाधव, ओंकार जाडे, सत्यशील खंदारे, ओमप्रकाश लष्करे, धमानंद खंदारे, शिवाजी पाटील, संतोष म्हेत्रे, प्रल्हाद शिंदे, रमेश हेंडगे तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

स्व. विलासराव देशमुख यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन! 💐🙏

13/08/2026

‘देवाच्या गाभाऱ्याची स्वच्छताही भक्तीच!’; श्रावणाच्या प्रारंभी श्री सोमेश्वर मंदिरात स्वच्छता सेवा

भोलेबाबांच्या भक्तांचे श्रमदान; खांद्यावर पाणी वाहून नवतरुणांनी स्वच्छ केला श्री सोमेश्वराचा गाभारा

शेळगाव महाविष्णु : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि भगवान शिवभक्तांसाठी विशेष महत्त्व असलेल्या श्रावण मासाला गुरुवार, दि. १३ ऑगस्टपासून प्रारंभ झाला. श्रावण मासाच्या प्रारंभाचे औचित्य साधून तीर्थक्षेत्र शेळगाव महाविष्णु येथील श्री सोमेश्वर मंदिरात स्वच्छता सेवा करण्यात आली. मंदिरातील गाभारा, हेमाडपंथी मंदिराचा आतील भाग तसेच परिसर स्वच्छ पाण्याने धुऊन काढण्यात आला.

पंचायत समितीचे उपसभापती श्री. पद्मसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रल्हाद लोखंडे,गणेश निरस,तसेच लहान गोपाल चि.युवराज यमगर, दत्ता ठोंबरे, करण ठाकूर, माऊली शेंद्रे, गणेश पांचाळ, अक्षय निरस आदी गोपाळांनी या स्वच्छता सेवेत मनोभावे सहभाग घेतला. तब्बल दोन ते तीन तास श्रमदान करत या तरुणांनी टाकीतील पाणी खांद्यावरून वाहून आणले आणि मंदिरातील आतील संपूर्ण गाभारा स्वच्छ पाण्याने धुऊन काढला. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी श्री सोमेश्वराच्या चरणी स्वच्छतेच्या माध्यमातून सेवा अर्पण करण्याचा हा उपक्रम भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर संगम ठरला.

अभिषेकाबरोबर स्वच्छतेची सेवाही श्रेष्ठ

श्री सोमेश्वराला दुधाचा अभिषेक असो, दह्याचा अभिषेक असो किंवा केवळ एक लोटा जल अर्पण करणे असो, प्रत्येक भक्तीभावाला विशेष महत्त्व आहे. मात्र, ज्या भगवंताच्या चरणी आपण माथा टेकतो, त्या भगवंताचा गाभारा आणि मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील एक श्रेष्ठ भक्तीसेवा आहे.

पूजा, अभिषेक आणि आरती करणारे असंख्य भाविक असतात; मात्र भगवंताच्या गाभाऱ्याची स्वच्छता स्वतःच्या श्रमाने करणारे सेवाभावी भक्त मोजकेच असतात. या सेवेत कोणताही दिखावा अथवा अपेक्षा नसून, श्रद्धा, श्रम आणि निस्वार्थ भक्तीचा भाव असतो. त्यामुळे अशा भक्तांची सेवा थेट भगवंताच्या चरणी पोहोचते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात मंदिराच्या स्वच्छतेसाठी स्वतःहून पुढाकार घेत या नवतरुणांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. देवापुढे नतमस्तक होणे ही भक्ती; पण देवाच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यासाठी स्वतःच्या हाताने श्रम करणे ही सेवाभक्ती! या भावनेतून करण्यात आलेली ही सेवा निश्चितच कौतुकास्पद ठरली.

श्रावणाच्या पवित्र प्रारंभी झालेल्या या स्वच्छता सेवेतून ‘स्वच्छ देवस्थान, पवित्र गाभारा आणि निर्मळ भक्ती’ असा सुंदर संदेश देण्यात आला. श्री सोमेश्वर मंदिराचे पावित्र्य आणि स्वच्छता जपण्यासाठी नवतरुणांनी घेतलेला हा पुढाकार इतर भाविकांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.

श्री संत दर्शन SSD LIVE Ganesh Niras Padmasinh Deshmukh
#श्रीसोमेश्वर #श्रावणमास #श्रावण #भोलेबाबा #महादेव #हरहरमहादेव #शिवभक्त #सोमेश्वरमंदिर #शेळगावमहाविष्णु #शेळगाव #भक्तीसेवा #स्वच्छतासेवा #सेवाभाव #श्रमदान #मंदिरस्वच्छता #श्रावणसोहळा

🎂🌹 कर्तृत्वाला नवी दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹🎂संत गजानन पतसंस्थेचे सचिव तसेच नवनि...
13/08/2026

🎂🌹 कर्तृत्वाला नवी दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹🎂

संत गजानन पतसंस्थेचे सचिव तसेच नवनियुक्त केंद्रप्रमुख
श्री. संदीप लष्करे सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎉

ज्ञान, कर्तृत्व, शिस्त आणि सेवाभावी वृत्ती यांचा सुंदर संगम असलेल्या आपल्या व्यक्तिमत्त्वातून विद्यार्थ्यांना प्रेरणा, सहकाऱ्यांना विश्वास आणि समाजाला सकारात्मक दिशा मिळत राहो, हीच मनापासून सदिच्छा.

नवीन जबाबदारीच्या या टप्प्यावर आपल्या अनुभवाला कर्तृत्वाची जोड, विचारांना यशाची साथ आणि प्रत्येक प्रयत्नाला समाधानाचे फळ लाभो. 🌺

आपल्या आयुष्यात सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, यश, कीर्ती आणि आनंदाची सदैव बरसात होत राहो. प्रत्येक नवे वर्ष आपल्या जीवनात नवीन संधी, नवे यश आणि नवी उंची घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏🌸

🎂 सर, आपल्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐

शुभेच्छुक : गणेश निरस, शेळगाव महाविष्णु

Address

SHREE MAHAVISHNU DEVASTHAN SHELGAON
Parbhani

Telephone

+918605542555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SSD LIVE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SSD LIVE:

Shortcuts

Share