Me Ramai

Directions Website

Me Ramai female

🔥 स्वप्न मोठी असतील, तर संघर्षही मोठा करावा लागतो! 💯          # PrakashwaghPhotogrphy
24/11/2026

🔥 स्वप्न मोठी असतील, तर संघर्षही मोठा करावा लागतो! 💯

# PrakashwaghPhotogrphy

17/11/2026

ह्या व्हिडिओतील प्रेक्षकांची गर्दी पहाच!
‘मी रमाई’ या नाटकाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे!
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माता रमाईंचा धाडसी, संघर्षमय आणि प्रेरणादायी इतिहास पोहोचत आहे.
आता आम्ही येत आहोत आपल्या माजलगावमध्ये!
भारतामधील पहिले एकपात्री नाटक – मी रमाई
तारीख : १ डिसेंबर २०२६, मंगळवार

वेळ : सायंकाळी ठीक ५ वाजता
स्थळ : व्यंकटेश मंगल कार्यालय, गढी रोड, माजलगाव.
तिकीट दर :
₹१९९ | ₹४९९ | ₹९९९
तिकीट व अधिक माहितीसाठी संपर्क :
९९६०५१५०५६
लेखन व दिग्दर्शन : प्रियंका उबाळे

निर्मिती : प्रकाश वाघ

अभिनय : प्रियंका उबाळे
रडणारी नाही, तर लढणारी रमाई!
चला, माता रमाईंचा इतिहास जाणून घेऊया आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया!
सप्रेम जय भीम! नमो बुद्धाय! #

13/06/2026

प्रकाश वाघ निर्मित मी रमाई एकपात्री नाटकास उदंड प्रतिसाद 💙

10/06/2026

गावागावांत रमाईंचा विचार पोहोचवण्याचा संकल्प!

घराघरात जाऊन जनतेशी संवाद साधत,
माता रमाईंच्या त्याग, संघर्ष आणि प्रेरणादायी जीवनाचा संदेश पोहोचवत,
अभिनेत्री प्रियांका उबाळे यांचे प्रेमळ आमंत्रण…

रमाईंचा संघर्ष… स्वाभिमानाची प्रेरणा… आणि समाजजागृतीचा संदेश!
#मीरमाई #समाजप्रबोधन #रमाईंचाविचार 🎭💙🙏

“दैनिक दिव्य मराठी”मध्ये “मी रमाई” एकपात्री नाटकाची झळकली विशेष बातमी! 🎭✨हा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा आहे ...
07/05/2026

“दैनिक दिव्य मराठी”मध्ये “मी रमाई” एकपात्री नाटकाची झळकली विशेष बातमी! 🎭✨
हा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा आहे

रंगभूमीवरील प्रत्येक पावलाला रसिकांनी दिलेल्या प्रेमामुळेच
“मी रमाई” आज घराघरात पोहोचत आहे 🙏

मनापासून धन्यवाद
सर्व पत्रकार बंधू, शुभेच्छुक आणि कला प्रेमी प्रेक्षकांचे ✨

🎬 अभिनेत्री – प्रियांका उबाळे
🎭 निर्माता – प्रकाश वाघ

“मी रमाई” — संघर्ष, स्वाभिमान आणि प्रेरणेचा प्रवास ❤️

#मीरमाई #दिव्यमराठी #मराठीनाटक

लहानपणी झेंडावंदनाच्या कार्यक्रमात मी फक्त बाजूला उभी राहायचे…आज दिनांक  01/05/ 2026 रोजी मात्र बुद्ध जयंतीनिमित्त लातूर...
01/05/2026

लहानपणी झेंडावंदनाच्या कार्यक्रमात मी फक्त बाजूला उभी राहायचे…
आज दिनांक 01/05/ 2026 रोजी मात्र बुद्ध जयंतीनिमित्त लातूर शहरातील इंदिरानगर आणि बालाजी नगर येथे ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला… आणि तोही सिने अभिनेत्री Priyanka Ubale म्हणून माझ्या हस्ते पार पडला… हे माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद क्षण होते. 💙🙏
आजवर मी ‘मी रमाई’च्या माध्यमातून रमाईंचा त्याग, संघर्ष आणि मातृत्व प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे… आणि त्या कामाची समाज दखल घेतोय, प्रेम देतोय, सन्मान देतोय… हीच माझ्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे.
खऱ्या अर्थाने ही माझी नाही, तर रमाईंनी दिलेली ओळख आहे…
रमाईंचं प्रेम आहे…
आणि समाजाने दिलेली कौतुकाची थाप आहे. ✨” 💙💙🔥🔥🔥 #रमाई एकपात्री नाटक मी रमाई

30/04/2026

प्रकाश वाघ निर्मित व प्रियंका उबाळे अभिनीत”मी रमाई” एकपात्री नाटकाला मिळाला स्टँडिंग ओव्हेशनचा मान !
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे “त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी भूमिपूजन समारंभात उदंड प्रतिसाद या नाट्यप्रयोगास नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#पिंपरीचिंचवड

16/04/2026

मी रमाई” एकपात्री नाटक शिर्डीत हाऊसफुल — तुमच्या प्रेमामुळे शक्य 🙏💫
तुमच्या प्रत्येक टाळीने आणि आशीर्वादाने माझा आत्मविश्वास वाढला ❤️
असंच प्रेम आणि साथ कायम ठेवा 🙏

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, शिर्डी (भीम नगर) यांच्या वतीने 12 एप्रिल 2026 रोजी आयोजित ‘मी रमाई’ या नाटकाल...
16/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, शिर्डी (भीम नगर) यांच्या वतीने 12 एप्रिल 2026 रोजी आयोजित ‘मी रमाई’ या नाटकाला शिर्डीत उदंड आणि हाऊसफुल प्रतिसाद मिळाला, याचा मनापासून आनंद आहे! 🙏
या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार तसेच उपस्थित सर्व भीमसैनिकांचेही मनापासून धन्यवाद! ❤️
भारतामधील धाडसी रमाईचा इतिहास सांगणारे हे पहिले एकपात्री नाटक आज देशभरात प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे—हीच आमच्यासाठी सर्वात मोठी पावती आहे.
प्रकाश वाघ निर्मित आणि अभिनेत्री प्रियंका उबाळे लिखित ‘मी रमाई’ या नाटकाचे देशभरात हाऊसफुल प्रयोग सुरू आहेत.
शिर्डीतील 31वा नाट्यप्रयोगही उदंड प्रतिसादात यशस्वीपणे पार पडला—आपल्या प्रेमामुळेच हा प्रवास अधिक प्रेरणादायी होत आहे! 🙌✨ 💙

सोलापूरनंतर आता वाशिम शहरातही प्रकाश वाघ यांनी काढलेल्या फोटोला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त माना...
15/04/2026

सोलापूरनंतर आता वाशिम शहरातही प्रकाश वाघ यांनी काढलेल्या फोटोला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मानाचे स्थान मिळाले—ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे 🙏
या जयंती समितीचे अध्यक्ष तसेच सर्व सदस्यांचे मनापासून खूप खूप आभार, की तुम्ही या भव्य देखाव्यामध्ये आमच्या कामाला स्थान दिलं 🙌
वाशिमकरांचे प्रेम, सन्मान आणि आपुलकी मनाला भिडणारी आहे. सोलापूरकरांनंतर वाशिमकरांनी दिलेलं हे कौतुक आमच्यासाठी प्रेरणादायी आहे 🔥
या देखाव्याचे फोटो माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, अनेक वर्षांपासून आमच्यासोबत एकनिष्ठपणे काम करणारे विशाल बुलबुले आणि त्यांच्या परिवाराचे मनापासून खूप खूप आभार 🙏
तसंच, प्रकाश वाघ यांच्या फोटोग्राफीबद्दल खास सांगावंसं वाटतं—ते अनेक मोठ्या कलाकारांसोबत फोटोशूट करणारे एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. पण “मी रमाई” या नाटकाच्या कार्यामुळे त्यांनी अनेकदा मोठी कामं बाजूला ठेवली. आज त्यांच्या कलेचं जे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे, ते त्यांच्या मेहनतीचं आणि समर्पणाचं फलित आहे 💙
मनापासून धन्यवाद!
जय भीम! ✊💙 📷 🌍💙🔥

Address

Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Me Ramai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby media companies