08/02/2023
जुगार अड्ड्यावर छापा; पोलिसांची १९ जणांवर कारवाई
वैजापूर लोकरत्न प्रतिनिधी
वैजापूर शहरातील पाटिल गल्ली येथे चालू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर वैजापूर पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यात १९ जणावर कारवाई करण्यात आली असून रोख रक्कमेसह एकूण १ लाख ३४ हजार ७९० रुपये किमतींचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगणकावर ऑनलाईन चक्री/झन्ना मन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापुर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोलीस उप निरीक्षक पवन राजपुत यांच्या पथकाने दिनांक ०६ फेब्रुवारी रोजी पाटिल गल्ली येथील सप्तश्रृंगी कृषी सेवा केंद्र या दुकानात जाऊन छापा मारला असता तेथे उमेश पदमसिंग राजपूत, व रामभाऊ घुले यांच्या सांगण्यावरुन शाहरुख रफीक शेख व बाबासाहेब कचरु पेटारे हे संगणकावर विना परवाना बेकायदेशीररित्या स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी ऑनलाईन चक्री/झन्ना मन्ना नावाचा खेळ खेळवितांना व दर्शन सतीश वाकळे, वय १९ वर्षे, रा. दत्तनगर वैजापुर, किरण सुनील थोरात, वय २५ वर्षे, रा. रोटेगाव, ता. वैजापुर, अक्षय भिमराज त्रिभुवन, वय ३० वर्षे, रा. इंगळे वस्ती, वैजापुर, सूर्यकांत भुजंगराव साळुंके, वय ५७ वर्षे, रा. पाटील गल्ली, वैजापुर, योगेश बाळासाहेब पठारे, वय २२ वर्षे, रा. बोरसर, ता. वैजापुर, अजय सुनील थोरात, वय १९ वर्षे, रा. रोटेगाव, ता. वैजापुर,, खालेद जमील शहा, वय २८ वर्षे, रा. हलदी गल्ली, वैजापुर, दिनेश कचरु गावडे, वय २२ वर्षे, रा. येवला रोड, वैजापुर, दिपक राजेंद्र थोरात, वय 24 वर्षे, रा. रोटेगाव, ता. वैजापुर, अरुण लक्ष्मण मोकळे, वय 24 वर्षे, रा. रोटेगाव, ता. वैजापुर, परवेज नसिरुद्दीन शेख, वय 30 वर्षे, रा. गवंडी गल्ली, वैजापुर, सचिन मुकीदराव चव्हाण, वय 27 वर्षे, रा. पाटील गल्ली, वैजापुर, सौरभ किरण चव्हाण, वय 21 वर्षे, रा. पाटील गल्ली, वैजापुर, रोशन कचरू थोरात, वय 22 वर्षे, रा. रोटेगाव, ता. वैजापुर असे ऑनलाईन चक्रो झन्ना मन्ना नावाचा खेळ खेळतांना मिळुन आले. तसेच बाबासाहेब वाणी यांनी चक्री झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळ खेळण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. या सर्वांच्या ताब्यातून रोख रक्कम ७७९०/- रुपये असे एकुण १,३४,७९०/- रुपये किमंतीचा मुद्देमाल ज्यात ११ मोबाईल हॅन्डसेट, संगणक असा ऐवज जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कालवनिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवर, सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पो नि संजय लोहकरे, पो उप नि काळे, पो उप नि राजपूत, नायक पोलीस सिंगल, पो. का. पाडळे, पोका नरोडे,मापोका गाडेकर,चालक गणेश पठारे, चालक जगताप यांनी केली.अधिक तपास वैजापूर पोलीस करित आहे.